Skip to main content

“ घेतला वसा षंढतेचा ”

लेखक निरन्जन वहालेकर यांनी बुधवार, 04/08/2010 या दिवशी प्रकाशित केले.
“ घेतला वसा षंढतेचा ” आपल्याच लेकरांचे रक्त जेव्ह्ना सांडते, मातेचेहि उर तेव्ह्ना आक्रंदतांना फाटते “ सिमेपारचा ” दहशतवाद सोयीची भाषा असे, फोफावतो तो सर्वत्र येथे खंत त्याची आम्हा नसे . पाहतो उध्वस्त घरे, शहरे अन उष्ण रुधीरांचे सडे, तरीहि शिकवतो जगतां आम्ही षंढतेचे नैतिक धडे. पायघड्या पसरुनी अता स्वागत कसाबाचे करा, घेउनी षंढतेचा वसा, लांगुलचालन पाक्यांचे करा. . काय येवढे काश्मिराचे देश आपुला छोटा नसे, एक काश्मीर नाही म्हणोनी काय अडते फारसे ? निरंजन वहाळेकर
लेखनविषय:

वाचने 1511
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

>>काय येवढे काश्मिराचे देश आपुला छोटा नसे, एक काश्मीर नाही म्हणोनी काय अडते फारसे ? छान टोला मारलाय ! >>तरीहि शिकवतो जगतां आम्ही षंढतेचे नैतिक धडे. इथे षंढतेचे नैतिक धडे ह्या ऐवजी नैतिकचे षंढ धडे असे हवे असे वाटते.

नैतिकचे षंढ धडे असे हवे. अगदी योग्य. पण पुनरसम्पादनाचि पुर्विप्रमाणे सोय नाही. मार्गदर्शनाबद्दल आभार.