सायकल चोर
माझ्या लहानपणी, साधारण सात-आठ वर्षांचा असताना एक इटालियन चित्रपट पाहिला होता 'द बायसिकल थिव्हज' ! तेंव्हा तो फारसा समजलाही नव्हता पण घरी आल्यावर आईने त्याची गोष्ट सांगितली होती.
नुकतीच त्या सिनेमाची आठवण झाली व प्रकर्षाने तो पुन्हा पहावा असे मनाने घेतले. मग मुलाच्या मदतीने तो नेटवर शोधला, त्याची सबटायटल्स शोधली आणि बघितला. एक अविस्मरणीय अनुभव घेतल्याचे समाधान मिळाले. या चित्रपटाला ऑस्कर व इतर अनेक पुरस्कार मिळाले आहेत व जगभरातल्या समीक्षकांनी तो अद्वितीय असल्याचे मान्य केले आहे.
मिसळपाव