चिकू मोदक
आज बाप्पाला निरोप द्यायचा आहे आणि त्यासाठी आहे खास नैवेद्य चिकू मोदक.. तर चला तयारीला लागू या.
साहित्यः
६ चिकू, २०० ग्राम साखर, १ खवलेला ओला नारळ, कोको पावडर २ चमचे, दुध १ वाटी, खवा २०० ग्राम, चांदी वर्ख सजावट करायला..
प्रथम चिकूचा गर काढून घ्यावा.
दुध, कोको पावडर, चिकूचा गर व खवलेला नारळ एकत्र करून मिक्सरमधून फिरवून घ्यावे.
नंतर त्यात खवा मोडून घालावा आणि साखर घालून एका भांड्यात काढून घ्यावा.
मिश्रण विस्तवावर ठेवून आटवून घ्यावे आणि कडेने सुटू लागल्यावर भांडे उतरवून मिश्रण घोटत राहावे.
मिश्रण किती घट्ट झाले आहे ते बघून मोदक साच्यात टाकून मोदक बनवावेत.
वरून चांदीचा वर्ख लावून सजवावेत...


वाचने
5321
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
वाह्....वाह.........
वा!
वा...
छान छान छान.
वेगळीच आहे पाकृ. करुन बघेन.
मस्त बाप्पाला जाता जाता
करायचा विचार करतोय पण बाजारात
मोदक (चविला सुंदरच असेलच पण)
वेगळीच पाकृ आहे. आम्हाला
आज पासुन पाककृती पाहण्यास