http://img1.orkut.com/images/chhota/1283586494/1285121832158/546100837/…
साहित्य:- एक वाटी आख्खा मसूर, एक कांदा, पाच-सहा लसूण पाकळ्या,एक छोटा तुकडा सुके खोबरे,एक चमचा जिरे,गोडा मसाला एक चमचा, कांदा लसूण मसाला अर्धा चमचा, तेल, फ़ोडणीचे साहित्य, कोथींबीर.
कॄती :- प्रथम आख्खा मसूर निवडून घ्या.कुकरला शिजवुन घ्या.
खोबरे,जिरे,लसुण एकत्र वाटण करा,
कांदा बारीक चिरा, कोथिंबीर बारीक चिरा.
थोडे तेल घालून फ़ोडणी टाका,त्यावर कांदा गुलाबी रंगावर परतून घ्या,लसूण-खोबरे वाटण टाका,परत चांगले परतून घ्या, त्यात शिजलेले आख्खा मसुर घाला, चवीनुसार मिठ,थोडासाच गुळ घाला.चांगले उकळू द्यात.नंतर वरुन कोथिंबीर घालून गरम गरम सर्व्ह करा.
हे तुम्ही चपाती,ब्रेड, रोटी, बाजरीची भाकरी कशाबरोबरही खाऊ शकता.
जोडीला कांदा..........नुसता हाताने फ़ोडून व आवड्त असल्यास हिरवी मिरची (तळून), घ्या.
मस्त आख्खा मसूर तयार.
हल्ली बर्याच धाब्यावर, होटेलात ही स्पेशल डिश मिळते. जोडीला गोड दही असेल तर मस्तच.
वाचने
7750
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त
फोटो
http://img1.orkut.com/images/
हा घ्या फ़ोटो
वाह वा.
जगात भारी कोल्हापुरी
मोड आलेली अखी मसुरची नुसती
फोटूमुळे पाकृ मस्त दिसते
बरोबर आहे.
In reply to फोटूमुळे पाकृ मस्त दिसते by रेवती
नाही , आम्ही मसूर कधीच भिजवत
In reply to बरोबर आहे. by चिंतामणी
नाही , आम्ही मसूर कधीच भिजवत
मी कालच केला होता मसूर.
ही उसळ अ-प्र-ति-म लागते. मी