Skip to main content

सायकल चोर

लेखक तिमा यांनी बुधवार, 22/09/2010 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या लहानपणी, साधारण सात-आठ वर्षांचा असताना एक इटालियन चित्रपट पाहिला होता 'द बायसिकल थिव्हज' ! तेंव्हा तो फारसा समजलाही नव्हता पण घरी आल्यावर आईने त्याची गोष्ट सांगितली होती. नुकतीच त्या सिनेमाची आठवण झाली व प्रकर्षाने तो पुन्हा पहावा असे मनाने घेतले. मग मुलाच्या मदतीने तो नेटवर शोधला, त्याची सबटायटल्स शोधली आणि बघितला. एक अविस्मरणीय अनुभव घेतल्याचे समाधान मिळाले. या चित्रपटाला ऑस्कर व इतर अनेक पुरस्कार मिळाले आहेत व जगभरातल्या समीक्षकांनी तो अद्वितीय असल्याचे मान्य केले आहे.

पुण्यातले माजोरी , xyz..... xyz...रिक्षावाले..!

लेखक जाई अस्सल कोल्हापुरी यांनी बुधवार, 22/09/2010 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
.....ओठांवर अ़क्षरशः वाट्टेल त्या शिव्या येतायत. काल काही तातडीच्या कामासाठी कोल्हापुर oneday trip मारावी लागली.६-३० शिवनेरी...पोचल्या पोच्ल्या कामे उरकायची घाई..धावपळ. आपल्या लोकांचा ढिसाळ कारभार्...अर्धवट राहिलेली कामं.फुकट,व्यर्थ ठरलेली दगदग .परत ९ च्या आत घरात्!चं tension! अक्षरशः काव आला होता! त्यात परतीच्या प्रवासात "मिळेल ती" बस घेण्याच्या नादात पांढर्‍या जांभळ्या बसमध्ये बसले. खबडक खबडक घोडोबा करीत ८.३० -८.४५ वाजता बस पुणे मुक्कामी पोचती झाली. काय त्या ड्रायव्हरला कोण चावलं होतं देव जाणे काल! निव्वां........त चालु होतं. इथे थांब्..तिथे थांब. हात दाखवा बस थांबवा सारखं! .....

लाटा

लेखक राजेश घासकडवी यांनी बुधवार, 22/09/2010 12:03 या दिवशी प्रकाशित केले.
उगवले चंद्र माझे सांज झाकोळली जरी माझ्या अवखळ लाटा आल्या तुझ्याच किनारी चंद्रबळे उचंबळ तारांबळ लहरींची पाचूगर्भात बळावे हुरहूर ओळखीची लाभे लाटांना किनार सोनसळी किरणांची मंद गुलाबी प्रेमाची, शुभ्र धवल मायेची झाकोळली सांज झाली सखी कातळ रात्रीची माझे चांदभरे डोळे वाट पाहती उद्याची... नव्या सुवर्ण प्रभेची

अग्रलेख कसा असावा/नसावा

लेखक चेतन यांनी बुधवार, 22/09/2010 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
अग्रलेख कसा लिहावा आणि कसा लिहु नये याची उत्तम उदाहरणे लोकसत्ताच्या आजच्या एकाच आव्रुत्तीत बघायला मिळाली. पर्यावरणाय नम: या अग्रलेखाचा विषय तसा सोपा अथवा दुसरी बाजु थोडिशी कमकुवत असलेला आहे.

चिकू मोदक

लेखक पिंगू यांनी बुधवार, 22/09/2010 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
आज बाप्पाला निरोप द्यायचा आहे आणि त्यासाठी आहे खास नैवेद्य चिकू मोदक..

गणपती विसर्जन

लेखक शिशिर यांनी बुधवार, 22/09/2010 10:03 या दिवशी प्रकाशित केले.
आज अनंत चतुर्दशी दुपारी १२.२९ पर्यन्त आहे. त्यानंतर पॉर्णिमा सुरु होते. गणपती विसर्जन १२.२९ च्या आत करावे की संध्याकाळी केलेले चालेल? जाणकारांनी मार्गदर्शन करावे....

जीवन एक महामार्ग

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी बुधवार, 22/09/2010 09:10 या दिवशी प्रकाशित केले.
जीवनमार्ग असो वा वाहतूकमार्ग चढ आणि उतार ठरलेलेच. कधी कधी इतकी धोकादायक वळणे येतात की मनाला उत्तम ब्रेक असेल तरच कवटी शाबूत राहते. अन्यथा वाहनही बेकाबू होऊन सर्व सर्व ब्रेक अप होण्याचा संभव असतो. अंधारी बोगदे पार केल्याशिवाय सुखाचा प्रकाश संभवत नाही. कधी कधी तर इतका गुळमुळीत अन् मोकळा ढाकळा महामार्ग गवसतो की स्पीडचं थ्रिल अनुभवावंसं वाटतं. परंतु मध्येच येणाऱ्‍या ब्रेकरमुळे मनाला, तनाला अन् वाहनालाही वेसण बसल्याने थ्रिलचं किल मध्ये रुपांतर होत नाही. काही मार्ग निसरडे व ओलसर लागतात. अशाठिकाणी कोणताही सैलसरपणा अंगावर चमडी ठेवत नसतो. वळणदार घाटरस्त्याने झोकदार वळण घ्यायचे मनात घाटत असते.

आख्खा मसूर !!!!

लेखक निवेदिता-ताई यांनी बुधवार, 22/09/2010 07:49 या दिवशी प्रकाशित केले.
http://img1.orkut.com/images/chhota/1283586494/1285121832158/546100837/… साहित्य:- एक वाटी आख्खा मसूर, एक कांदा, पाच-सहा लसूण पाकळ्या,एक छोटा तुकडा सुके खोबरे,एक चमचा जिरे,गोडा मसाला एक चमचा, कांदा लसूण मसाला अर्धा चमचा, तेल, फ़ोडणीचे साहित्य, कोथींबीर. कॄती :- प्रथम आख्खा मसूर निवडून घ्या.कुकरला शिजवुन घ्या. खोबरे,जिरे,लसुण एकत्र वाटण करा, कांदा बारीक चिरा, कोथिंबीर बारीक चिरा.

अळीवाचे लाडू

लेखक अजबराव यांनी बुधवार, 22/09/2010 04:00 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य: १) दोन नारळ खोवलेले २) ५० ग्राम अळीव ३) २ वाटया गुळ चिरलेला ४) १/२ वाटि साखर ५) जायफळ पुड ४ चिमुट कृति: १) एका पातेल्यामध्ये खालि खोवलेले खोब्र्याचा एक थर लावा. त्याच्यावर अळीवाचा थर लावा. आणी त्यावर परत गुळाचा .त्यावर परत खोब्र्याचा थर द्यावा. म्हणजे सर्वात खालि आणी सर्वात वर खोब्र्याचा थर असावा.