लेखकसुवर्णमयीयांनी मंगळवार, 28/09/2010 18:26 या दिवशी प्रकाशित केले.
अमरचे डोळे ' रिसर्च टुडे 'मासिकामधल्या एका बातमीवर खिळले होते-
जुलै २००७
उंदरांना जवळ जवळ ३५ कॉन्सन्ट्रेटेड बाटल्या खास द्राक्षासव पाजले की त्यांचे आयुष्य वाढते असे असे पाहणीत आढळले आहे.
उंदरांची पाहणी केली असता त्या खास द्राक्षासवातील काही घटक विशेषतः 'लाइफसेवर ' हे आयुष्यमान वाढवण्यात सक्रिय असतात असे सुद्धा एका अभ्यासात आढळले आहे.
या ओळी वाचूनच अमर थबकला. त्याच्यापेक्षा अधिक वेगाने कोणीतरी हाच धागा पकडून संशोधन करत होते तर...
लेखकस्वप्निल मनयांनी मंगळवार, 28/09/2010 13:20 या दिवशी प्रकाशित केले.
कधी येशील तू?
मी तुझी वाट बघतोय
आभाळ भरून आलंय
ढगही गडगडताहेत
माझ्या मनातला टाहो
जणू तेच व्यक्त करताहेत
बघ, त्याचा चेहरा कसानुसा झालाय
तु नाही आलीस तर
लवकरच ते रडायला लागेल
त्याच्या अश्रूंनी मलाही भावूक करेल
पण मी रडणार नाही
त्याला साथ देणार नाही
आणि
जर आलच रडायला तर
सरळ पावसात भिजत राहीन
कोणालाच माझे अश्रू दिसू देणार नाही
कारण
माझ्या रडण्याचे बोल तुला लावलेलं
मला सहन होणार नाही
लेखकविनायक प्रभूयांनी मंगळवार, 28/09/2010 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
"दोन चार दिवसाकरता सर्व बाजुला ठेव आणि जाउन ये.
पण करु काय तिकडे जाउन?
"माहीत असलेले काहीही करु नकोस. फक्त जा. जे होइल ते आत्तपर्यंत जे झाले त्यापेक्षा वेगळे असेल."
अरे बाबा, डोक्यावर ४ कलर ब्रोशर ची डिलीवरी आहे. ते सोडुन ३ दिवस....? एक्झिबिशन ची डेड लाइन आहे."
" विझ्युअलायझेशन झाले आहे ना?तु फायनल कॉपी ओके कर. प्रिंटींग मी बघुन घेतो. प्रेस ला अॅडवान्स दे म्हणजे ऐनवेळी नडणार नाहीत".
नंतर गेले तर चालणार नाही का?
"आठ दिवसानी बँगलोर. मग २५ डीसेंबर ला मुंबई. जाणार का तु बॅगलोर ला.?"
नको. च्यायला यायला जायला ३ दिवस. पण..
"आता पण बिण काहीही नाही. हे ठरले. आर्टीस्टला दोनशे रुपये जास्त दे.
लेखकक्लिंटनयांनी मंगळवार, 28/09/2010 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी,
सध्या मिपावर पितृपंधरवड्यावर लेख येत आहेत त्यातच माझीही एक भर. पण विषय केवळ पितृपंधरवड्यात मर्यादित नाही तर कर्मकांडांमध्ये पूर्वीच्या ब्राम्हणांचे हितसंबंध कसे गुंतले होते असे माझ्यासारख्या ’एकारान्ती कोकणस्थ ब्राम्हणाला’ काय वाटते हा आहे. हा लेख ’जातीय तेढ’ वाढविणारा आहे असे वाटल्यास जरूर त्यात बदल करावेत किंवा लेख पूर्णपणे काढावा. त्या परिस्थितीत मी लेख केवळ माझ्या ब्लॉगवरच लिहेन.
मिपावर भिक्षुकी करणारे कोणी आहे का याची कल्पना नाही आणि असले तरीही त्यांच्याशी वैयक्तिक कोणतेही वैर नाही. पण या institution विषयीची माझी मते या लेखात लिहिली आहेतच.