Skip to main content

ध्रांगध्रा - १०

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 11/01/2022 23:15 या दिवशी प्रकाशित केले.
कुठल्याच घरात काही हालचाल दिसत नाहीये. थोडे पुढे आलोय. समोर एक माणूस , एक बाई आणि त्यांचा हात धरून चालत जाणारे एक लहान मूल पुढे जाताना दिसतय.चला निदान कोणीतरी दिसलं तरी. चला यांना विचारूया. आम्ही भरभर चालत त्या कुटुंबाला गाठतो. नमस्कार दादा..... मागील दुवा ध्रांगध्रा - ९ http://misalpav.com/node/49763 नमस्कार दादा... आम्हाला मंदीरात जायचंय. कसं जायचं हो? मी मागूनच प्रश्न विचारला. त्या तिघांनीही माना वळवल्या. आम्ही दचकतो. त्या पुरुषाचा , त्याच्या बायकोचा आणि त्या लहान मुलीचा तिघांचेही चेहरे हुबेहूब . अगदी साच्यातून काढावेत तसे.

मैत्री

लेखक कर्नलतपस्वी यांनी मंगळवार, 11/01/2022 22:17 या दिवशी प्रकाशित केले.
वेळेवर पाऊस आला की येतात ते आनंदाश्रू. मैत्री होती ढगाची उंच उंच डोंगराशी आंगचटीला आला खोड्या करू लागला म्हणून ...... टोचून टोचून डोंगर बोलला भांडण झाल जोरात म्हणून रडू आल ढगाला धार लागली डोळ्याला कट्टी घेऊन डोंगराशी वसुधेच्या कुशीत घुसला आसवांनी पुसलेले अश्रू बघून मनाशीच हसला मीत्राशीवाय करमेना आई जवळ मन रमेना लवकरच येतो म्हणून डोंगराला भेटायला गेला भेट झाली मीत्रांची दोघा पण खुश झाले अधंळी कोशीबिरीचा खेळ पुन्हा खेळू लागले आंधार पडला धरणीवर गार वारा सुटला पुन्हा भांडण होईल म्हणून बळी वाट बघत बसला १६-१२-२०
काव्यरस

सरकार

लेखक पाटिल यांनी मंगळवार, 11/01/2022 19:41 या दिवशी प्रकाशित केले.
"कुटायस रे ल*ड्या? कार्पोरेशनला ये. 'संगम'ला बसू." सरकारांचा मेसेज. आता तुम्ही म्हणाल की बरं मग? तर मग वगैरे काही नाही. सरकार म्हणजे आमचे जुने हितसंबंधी. या शहरात उगवतात अधूनमधून आणि मग काढतात आमची आठवण. आकस्मिक येऊन चकित करण्याची त्यांची पद्धत आहे. आपणही समजा अशा ऑफरला नाही म्हणत नाही. अर्थात कामं वगैरे नाचत असतातच पुढ्यात. पण त्याचं काय एवढं..! आख्खं आयुष्य त्यासाठीच पडलेलं आहे..! आज नाही केली तर उद्या करता येतील. किंवा परवा करता येतील. किंवा करू करू म्हणता येईल. शिवाय थोडा बदलही पायजेच ना माणसाला..! रोज रोज एकटेच कसे बसणार..! बसणार म्हणजे काही अगदी शब्दश: बसणं असं नाही.

सोनं

लेखक सरिता बांदेकर यांनी मंगळवार, 11/01/2022 18:13 या दिवशी प्रकाशित केले.
सोनं “अरे ए बबन्या,काय खबर मिळाली की नाही?” डुगऱ्यादादाचं डोकं गरम झालं होतं. सालं चार महिने झाले एक पण मोहिम यशस्वी नाही झाली.या लॅाकडाऊनमुळे एक तर ट्रॅफीक बंद.लोक फिरायला बाहेर पडत नाहीत त्यामुळे लूट बंद.लग्नकार्य बंद त्यामुळे बायका नटून थटून मिरवत नाहीत.रोकडा पण नाही आणि सोनं चांदी पण नाही.त्यात बार बंद मग हातभट्टीच्या पहिल्या धारेच्या कडक मालाला उठाव नाही. सालं जगायचं तरी कसं. डुगऱ्यादादा कपाळ बडवत बसला होता.बबन्या धावत धावत आला.त्याला धाप लागली होती. “ए बबन्या कुठून एव्हढा भूत बघितल्यासारखा पळत आलायस?”डुगऱ्यादादाने विचारलं. “दादा त्ये पक्क

*भारतीय चित्रपटात सर्वप्रथम*

लेखक srahul यांनी मंगळवार, 11/01/2022 15:31 या दिवशी प्रकाशित केले.
*भारतीय चित्रपटात सर्वप्रथम* आता पर्यँत जी भारतीय चित्रपटाची वाटचाल झाली त्याला मुकपटा पासून धरलं तर १०० वर्षे पूर्ण होऊन गेली , बोलपटा पासून धरलं तर साधारण ७५ वर्षे पूर्ण होऊन गेली. या काळात प्रतिथयश लोकांनी या क्षेत्रात नवे नवे प्रयोग केले.या अस्थिर व्यवसायात रुळलेली वाट सोडून नवा रस्ता बनवणे हे जोखमीचे काम.पण तरी सुद्धा काही जिद्दी लोकांनी हे आव्हान स्वीकारलं आणि तो धोका पत्करला. काही यशस्वी झाले , काही अपयशी झाले.

एक होता कार्व्हर (ऐसी अक्षरे ...मेळवीन -५)

लेखक Bhakti यांनी मंगळवार, 11/01/2022 00:07 या दिवशी प्रकाशित केले.
एक होता कार्व्हर लेखिका :वीणा गवाणकर १ साधी राहणी उच्च विचारसरणी या उक्तीनुसार जगणारे,वागणारे मानव जातीला वरदान असतात.

सल

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी सोमवार, 10/01/2022 21:26 या दिवशी प्रकाशित केले.
सल - अति लघुकथा ---------------------- मैत्रिणीचा फोन आला . अन ... ती आली . आम्ही दोघी त्याच्या घरी गेलो . त्याला हॉलमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्याला तसं पाहताच डोळ्यांत पाणी साठलं अन मनात आठवणी . आताही तो कित्ती कूल दिसत होता ! ... तो गेला होता . पण आताही तो कसा शांत झोपल्यासारखा वाटत होता ... वाटलं - आत्ता त्याच्या कुशीत शिरावं अन त्याला बिलगून झोपावं . आमच्या ब्रेकअप आधी कितीदा तरी मी ... पण ब्रेकअप झालं नसतं ; तरी ताटातूट ठरलेली होतीच ! नियतीने ठरवलेली .

नाटक परीक्षण! रणांगण!

लेखक kvponkshe यांनी सोमवार, 10/01/2022 18:56 या दिवशी प्रकाशित केले.
या १४ जानेवारी २०२२ ला २६० वर्षे होतील ! गेली २६० वर्षे ही भळभळती जखम घेऊन प्रत्येक मराठा जगतोय. आणि या जखमेच्या वेदना मराठयांच्या पुढील पिढीत वारसा म्हणून आपोआपच येतात. मराठ्यांचा इतिहास जेव्हा पासून लिहिला जात आहे तेव्हा पासून पानिपतच्या रणसंग्रामावर अनेक पोवाडे लिहिले गेलेत, कादंबऱ्या लिहिल्या गेल्यात, अभ्यास लेख लिहिले गेलेत, अगदी अलीकडे मराठ्यांच्या इतिहासाकडे लक्ष देऊन त्यावर चित्रपट काढणाऱ्या बॉलिवूड ने तर एक चित्रपट ही काढलाय. चित्रपट हे कोणतीही घटना प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर जशीच्या तशी उभी करण्याचे अतिशय सक्षम माध्यम आहे.

अहिल्येश्वर मंदिर

लेखक केदार भिडे यांनी सोमवार, 10/01/2022 14:29 या दिवशी प्रकाशित केले.
डिसेम्बर २०२१ मध्ये बहिणीसोबत मध्य प्रदेशचा दौरा झाला. इंदोर, ओंकारेश्वर, महेश्वर, मांडू या ठिकाणांना भेट दिली. त्याचा वृत्तांत लिहायचा आहे. तत्पूर्वी हा एक छोटा लेख. नर्मदेच्या उत्तर तीरावर वसलेले एक छोटे शहर म्हणजे महेश्वर. तिथे विणल्या जाणाऱ्या साड्यांसाठी ते प्रसिद्ध आहे. तसेच नर्मदेवर अतिशय सुंदर घाट तिथे आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी इंदोर संस्थानची राजधानी १७७२ मध्ये महेश्वर येथे हलवली. त्यांच्याच कारकिर्दीत महेश्वर येथे राजवाडा, मंदिरे, नदीवर प्रशस्त घाट बांधले. मराठी इतिहासातील या कर्तृत्ववान राज्यकर्तीने आपला देह ठेवला तोही याच ठिकाणी.

ध्रांगध्रा - ९

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 10/01/2022 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
पाय घसरल्यामुळे पाण्यात पूर्ण उताणा पडलोय. महेशचा हात हातातून सुटलाय. तोंडाच्या वर किमान दोन अडीच फूट तरी पाणी आहे.पडल्यामुळे पाण्याचा तळ डहुळलाय. तसाही अंधार आहे. डोळ्यासमोर काहीच दिसत नाहिय्ये.अंधारलेलं... , गढुळलेलं... हिरवट शेवाळंलेलं ....असं सगळं अस्पष्ट दिसतंय. मागील दुवा ध्रांगध्रा - ८ http://misalpav.com/node/49751 मी चाचपडत तोल सांभाळायचा प्रयत्न करतोय. इकडे यिकडे हात करताना मला महेशचा हात हाताला लागतो. मी कसाबसा उभा रहातो. डोळ्यासमोर अजूनही अस्पष्ट पण मघापेक्षा नक्कीच टळक उजेड जाणवतोय. मी डोळे हाताने चोळतो.