Skip to main content

दिल का रिश्ता

लेखक पाटिल यांनी सोमवार, 21/02/2022 21:43 या दिवशी प्रकाशित केले.
दिल का रिश्ता. इसवी सन- २००३ जय मेहता- अर्जुन रामपाल टीया- ऐश्वर्या रॉय जयचा बाप- परेश रावळ अनिता- ईशा कोप्पीकर टीयाची आई- राखी सुरूवात. जय आफ्रिकेतून आंघोळ वगैरे करून घाईगडबडीत त्याच्या मुंबईतल्या घरी येण्यासाठी निघतोय. आणि त्याचवेळी रावळपापा लंडनहून घराकडे निघालेत. रावळपापा अत्यानंदाने घरात घुसून मीच आधी पोचलो अशी आरोळी ठोकतात. परंतु जय त्यांच्याआधीच पोचलेला असतो. दर वर्षी एका विशिष्ट दिवशी जयच बापाच्या आधी घरी पोचत असतो, हे आपल्याला त्यांच्या संवादातून कळते. दुर्दैवाने रावळपापांची फ्लाईट लंडनला दोन तास लेट झाल्यामुळे पापांचा चान्स याही वेळी हुकलाय..! पण काय हरकत नाय बरं का पापा..

तू माझा कैवारी.

लेखक भागो यांनी सोमवार, 21/02/2022 20:04 या दिवशी प्रकाशित केले.
तू माझा कैवारी. सात साडे सात वाजले असावेत. सावंतांची एस टी फलाटाला लागली होती. पण कंडक्टर ड्रायवर चहा प्यायला गेले होते. साधी लाल गाडीच होती. त्यामुळे कुणाला काही घाई नव्हती. प्रवासी तसे थोडकेच होते. खिडकीपाशी बसायला मिळावे म्हणून सगळ्यांची गाडीत घुसण्याची घाई, पण बसचा दरवाजा काही उघडेना. “दरवाजा लॉक झाला जणू”. कोणीतरी रिमार्क टाकला. “अहो उघडेल की. जरा हैय्या म्हणून जोर लावा.” “सगळा अनागोंदी भोंगळ सरकारी कारभार. साधा एस टीचा दरवाजा...... ” “रायटिंग मध्ये तक्रार करायला पाहिजे. साल्यांना ##त लाथा घालायला पाहिजेत.” “काय उपयोग?

एकाकी

लेखक सागरसाथी यांनी सोमवार, 21/02/2022 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
एकट्याने एकट्याशी बोलले पाहिजे शब्दांनीही भाव वेडे तोलले पाहिजे. कोण वेडे आहे ऐकण्या पुन्हा पुन्हा आपुलकीचे रोप येथे रोवले पाहिजे. दु:खा मध्ये रमून जाणे रोजचेच आहे आनंदाचे झाड मनात वाढले पाहिजे. स्वत: साठी जग जगते त्यात काय मोठे दुसऱ्यासाठी कधीतरी जगले पाहिजे. आपले आपले करता हात रिक्त होती दुसऱ्याच्या आनंदाने मोहरले पाहिजे. आनंदाने जगताना जपले ही पाहिजे जपण्यासाठी कधी दूर झाले पाहिजे.
काव्यरस

राजकारणाचा ढासळला दर्जा

लेखक बाजीगर यांनी सोमवार, 21/02/2022 09:27 या दिवशी प्रकाशित केले.
कविता म्हणजे आसपास घडणाऱ्या घटनाचेच प्रतिध्वनी असतात ना ... उगाच कुठे चांदतारे पहावे. काळ बदलला, "वोह बुराई करे, हम भलाई करे, नही बदले की हो भावना, ऐ मालिक तेरे ब्लाह ब्लाह हम " हे राहिले नाही म्हणून संयमीत प्रतिउत्तर कविता.. किरीट सोमय्यांवर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली; म्हणाले...

संवाद

लेखक श्रीगणेशा यांनी सोमवार, 21/02/2022 00:46 या दिवशी प्रकाशित केले.
तिचं ऑफिस सातव्या मजल्यावर, त्याचं दहाव्या. सकाळचे ८. नवीन नोकरीचा अतिउत्साह. फक्त दोघेच ऑनलाईन दिसत होते ऑफिस गृपवर. दोघांनाही आश्चर्य वाटलं. त्याने मोठ्या उत्स्फूर्तपणे आणि हसून लिहिलं, "माझ्याशी स्पर्धा?" तिचा बराच वेळ रिप्लाय नाही. तो कामात पुन्हा दंग. काही वेळातच ती समोर उभी राहिली, सुंदर हास्य, बोलके डोळे आणि उत्साह घेऊन. त्याचं अर्ध लक्ष कामात. "कॉफी घेऊयात?", ती म्हणाली. त्याला काही सुचेना, "तू पुढे हो, मी आलोच हे थोडंसं काम संपवून." ती मागे वळून पाहत पाहत पोहोचली पँट्री मधे. छान गाणं गुणगुणत होती ती, कॉफी घेता घेता. "छान म्हणतेस तू गाणं. ऐकलं मी थोडावेळ बाहेर थांबून".

कोकण प्रवास: प्रकाशचित्रे: भाग २

लेखक श्रीगणेशा यांनी रविवार, 20/02/2022 23:09 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल्याच भेटीत कोकणानं आपलंसं केलं होतं: कोकण प्रवास: प्रकाशचित्रे: भाग १
२२ व २३ नोव्हेंबर २०१७
कर्दे ते बुरोंडी ह्या आडवाळणाच्या रस्त्याने झालेला निसर्गरम्य प्रवास डोळ्यात साठवत, आम्ही गणपतीपुळेच्या दिशेने निघालो. कर्देहून गणपतीपुळे जेमतेम १२० किमी अंतर. पण कोकणातला प्रवासही निवांत, वेळेचं गणित विसरायला भाग पाडणारा.

आदिमाय

लेखक अनन्त्_यात्री यांनी रविवार, 20/02/2022 21:46 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या पुस्तकांच्या कपाटात मूळाक्षरांशी ओळख झाल्यापासून कुणीकुणी घेऊन दिलेली, मग असोशीने विकत घेतलेली, देहभान विसरून वाचलेली, पुन्हापुन्हा पारायणं केलेली, बहुतांश मुखोद्गत झालेली, वाचून मिटल्याला युगं उलटून गेलेली हारीने मांडलेली जिवापाड जपलेली पुस्तकं आजकाल बघतोय एकेक गायब होतंय अन् कपाटात त्यांच्याजागी... दुसरंच काहीतरी प्रगटतंय कथा-कविता-कादंबर्‍यांच्या जागी भयाण पोकळी चरित्रग्रंथांजागी मुखवटे वैचारिक ग्रंथराजांच्या खणात गुंतवळी विज्ञानग्रंथांच्या जागी बूमरँगची धारदार पाती इतिहासाच्या जागी काटेरी कुंपणतारांची भेंडोळी आज तरीही नेटानं कपाटापाशी गेलो थबकलो भांबावलो ऐकून पानांची फडफड नव्या प

सोशल नेटवर्क

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी रविवार, 20/02/2022 21:42 या दिवशी प्रकाशित केले.
"So are you Indian?" स्पेनच्या उत्तर पश्चिम टोकाला असणार्‍या A Coruña ह्या छोट्याशा शहरातल्या Take Away काउंटर पलिकडे Soledad नावाचा बॅज लावलेल्या त्या मुलीने माझ्या चेहर्‍याकडे बघून मी भारतीय आहे हे ओळखलं ह्यात काय कौतुक? ह्यांना प्रत्येक brown माणूस भारतीय वाटणारच. "Yes Soledad, I am." "व्हॉत पार्त ऑफ इंदिया?" "आय अ‍ॅम फ्रॉम अ सिटी कॉल्ड पूने." (माझा "पूने" उच्चार प्रश्नार्थक असतो) ओSSSह पु"णे"??? (मी चाट!). "एम जी रोड? कोरेगांव पार्क?? दागडूशेट गानापती बाप्पा मोरया!!!" "सो यू'व बीन टू पुणे?" (माझे उच्चार सुधारले!) "येSSस...थ्री मोंथ्स...ब्यूतिफुल प्लेस...

सामना (१)

लेखक नीलकंठ देशमुख यांनी रविवार, 20/02/2022 20:25 या दिवशी प्रकाशित केले.
सामना (विशेष सुचना:या कथेतील सर्व प्रसंग आणि  पात्रे  काल्पनिक आहेत.प्रत्यक्षातील कुण्या व्यक्तीशी  वा प्रत्यक्षात अनुभवलेल्या  प्रसंगांशी कुणाला साम्य आढळल्यास, काय समजायचे समजा.

पुस्तक - ध्वनी प्रदूषण : समस्या व उपाय

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 20/02/2022 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
पुस्तक - ध्वनी प्रदूषण : समस्या व उपाय पुस्तक - ध्वनी प्रदूषण - समस्या व उपाय सर्व सदस्यांना कळविण्यात आनंद होतो आहे की, "ध्वनी प्रदूषण : समस्या व उपाय" हे पुस्तक छापून आले आहे. व्यस्ततेमुळे ( व पुस्तक कोण वाचतो हल्ली??) प्रकाशन सोहोळा केला नाही. ध्वनी प्रदूषण या घातक प्रदूषणाचे उगम काय? आरोग्याच्या नेमक्या कोणत्या समस्या याने निर्माण होतात? त्यावर उपाययोजना काय असाव्यात?