जुमेरात @ अमेरात
भारतातून ओमान देशात येतो तेव्हा सर्वप्रथम नजरेत भरतात ते येथील सुबक आणि गुळगुळीत रस्ते. आपल्याइथे
एका किलोमीटरमध्ये शेकडो खड्डे असताना इकडे शेकडो किलोमीटर एकही खड्डा नाही. अर्थात कमी वाहने आणि
पाऊस जवळजवळ नाही; ह्यामुळे देखील रस्ते पटकन खराब होत नसावेत. कुठेही जा, फोटो काढावेत इतके सुरेख
रस्ते. काही वर्षांपूर्वी मस्कतमधील 'अमेरात' ह्या उंच डोंगरावर असलेल्या गावात जाण्यासाठी छान नागमोडी घाट
बांधला. घाट चढून वर गेल्यावर खालचे शहर फार सुंदर दिसते. विमानातून दिसतात तशी छोटी घरे आणि
इमारती. विशेषतः रात्री दिव्यांच्या झगमगाटात तर डोळ्याचे पारणे फिटते.
मिसळपाव