सुटलेली सुटकेस
खूप वर्षांपुर्वी घडलेली एक सत्यघटना-
चित्राच्या लहान बहिणीचे लग्न ठरल्याचे कळले, आणि आमची नागपूरला जाण्याची जोरदार तयारी सुरू झाली. मुले त्या वेळी साधारणत: सोळा आणि बारा वर्षे वयाची होती. त्यामुळे त्यांचे आपापले लग्नात धमाल दंगामस्ती करण्याचे प्लान्स होते. हा सगळा उत्साह पाहून मी लगेच चांगली दोन आठवड्यांची सुट्टी घ्यावी लागणार असे सुतोवाच ऑफ़ीसमधे करून ठेवले. बॉसने आंबट चेहऱ्याने, तोंडातल्या तोंडात पुटपुटत संमति दाखवल्यासारखे केले होते. तीच पडत्या फ़ळाची आज्ञा मानून मी लगेच मुंबईची चार तिकिटे बुक करून टाकली. ताबडतोब त्याला तसे सांगून देखील टाकले.
मिसळपाव