खुप दिवसांपासुन कुठे डोंगरात फिरायला जायचा योग आला नव्हता. रवीवारी संगमनेरवरुन डोंबिवलीला येता येता, अचानक, मामाच्या गावी, राजुरला जाणं झाल. राजुरला पोहचायलाच रात्र झाली होती. शेवटी पहाटे लवकर निघु म्हणत, मुक्कमाचा बेत ठरला. जेवण झाल्यावर सहज, मामेभावाबरोबर बोलता बोलता, दुसर्या दिवशी कुठेतरी भटकायला जायचा प्लॅन ठरला, ऑफीसच कस मॅनेज करता येईल, हे कोड पाच मिनीटात सुटल.
राजुरसारख्या ठीकाणी असल्याने प्रचंड चॉईस होता. पाबरगड, कात्राबाई, अस्वल्या डोंगर, कुमशेत, आजोबा, हरिश्चंद्र, रतनगड व सांदण असे मस्त पर्याय होते (कळसुबाई मला फारसं नाही आवड्त उन्हाळ्यात ;-) ).