Skip to main content

कल्लोळ

लेखक अज्ञातकुल यांनी गुरुवार, 26/05/2011 21:15 या दिवशी प्रकाशित केले.
(सकाळी दूधाला जातांना दारात प्राजक्ताचा बहर पडलेला दिसला आणि...... मे महिन्याचा भर उन्हाळा, पावसाळा लवकर येणार म्हणून किंवा वळवाची चाहूल म्हणून आभाळ भरून आलेलं, वसंताच्या लाटांवर कोकीळा अजून बागडताहेत; अशा वेळी ऋतुमानाप्रमाणे मोगरा-निशिगंध ठीक आहेत पण चक्क श्रावणातला प्राजक्त आज कसा काय फुलला ????..... एखाद्याच्या जीवनवणव्यात जर असा प्राजक्त बहरला तर हुरहूर आणि कल्लोळच येईल वाट्याला ......) मेघाआडुन घुमे कोकिळा विधिवत संसारी क्षितिजावरचे माप लवंडे वसंत दरबारी कसाच फुलला असा अवेळी पारिजात दारी घाट आठवे दाट वनातिल वैशाखविहारी ऋतुमानाचे का उल्लंघन कशास भुलली स्वारी
काव्यरस

कॉफी विथ करन ...भारताचे भूषण ए. आर. रेहमान

लेखक शशिकांत ओक यांनी गुरुवार, 26/05/2011 20:33 या दिवशी प्रकाशित केले.
कॉफी विथ करन ...भारताचे भूषण ए. आर. रेहमान
अशीच एक मुंबईतील सकाळची घाईगर्दीची वेळ. यशराज स्टुडियोच्या गेटजवळ कचकचकच् आवाज करत आलिशान गाड्या एकामागोमाग थांबतात. येणारे पाहुणे उतरतात. आपल्या आवडत्या कलाकाराला बघण्यासाठी सेक्युरिटी गेटवर एकच तोबागर्दी केलेल्या फॅन्समधून वाट काढत, काळ्या कोटातील सूटबुटातील एक व्यक्ती झरझर चालत सेक्युरिटीकडे बघुन हात उंचावत इमारतीमधे लिफ्टकडे वळते.

निओ-अद्वैती पसायदान

लेखक मूकवाचक यांनी गुरुवार, 26/05/2011 20:09 या दिवशी प्रकाशित केले.
आता भासात्मके देवे। येणे वाग्यज्ञे कोपावे| कोपोनी मज द्यावे। कसाबदान हे|| जे सुष्टांची वीरता सांडो। तया निराकारी रती वाढो| दुष्टा अकस्मात जडो। प्रेम शांतीचे|| दुरिताचे जीवित जावो। विश्व अधर्म सूर्ये पाहो| जो जे ढापील तो ते लाहो| प्राणिजात|| गर्जत विकल मंडळी| नश्वरनिष्ठांची मांदियाळी| धडपडत भूमंडळी| भेटतू भूता|| करा हीनबुद्धीचे तांडव| वासनाविकृतींचा ठाव| बोलती हे पुंगव| तर्कट्यांचे|| मानवास जे लांच्छन| मुखंड जे बुद्धिहीन| ते सत्याचे सदा खंडन| करिते होतू|| किंबहुना सर्व सुखी| मत्त होवोनी तिन्ही लोकी| त्याजिजो आदिपुरुषी| अखंडित|| आणि ग्रंथोपजीविये| विशेषी लोकी इये| इष्टानिष्टनकळे| होआवेजी|
काव्यरस

अर्धसत्य..

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 26/05/2011 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
मूळ कविता - दिलिप चित्रे अनुवाद - तात्या अभ्यंकर. अर्ध सत्य.. चक्रव्युहात घुसण्यापूर्वी कोण होतो मी, कसा़ होतो हे मला माहीत नसेल.. चक्रव्युहात घुसल्यानंतर माझ्या आणि चक्रव्युहादरम्यान फक्त एक जवळीक होती जीवघेणी - हे मला कळणारच नाही चक्रव्युहातून बाहेर पडल्यावर भले ही मी मुक्त होईन.. तरीही चक्रव्युहाच्या रचनेत काहीच फरक पडणार नाही.. मरू की मारू?

जात्यावरच्या ओव्या- अहिराणी भाषेतील!

लेखक आर्या१२३ यांनी गुरुवार, 26/05/2011 15:44 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार! जात्यावरल्या अहिराणी भाषेतील ओव्यांचा खजिना आज तुमच्यापुढे खुला करत आहे. खरतर सुमारे २ वर्षापुर्वीच हा माझ्या हाती आला होता. हे मला ज्यांच्याकडुन मिळाले त्यांच्यापैकी सर्वात महत्वाची व्यक्ती म्हणजे माझी मोठी आत्या विमलबाई दुसाने या आता हयात नाही (जाने.२०११ मधेच त्यांचे निधन झाले) दुर्दैवाने त्यांच्या हयातीत हे मला इथे मांडता आलं नाही....काही काही सल आयुष्यभर रहातात. हेच खरं ! दुस-या म्हणजे माझ्या मोठ्या काकु प्रमिला वानखेडे आणि माझी आई विजया वानखेडे यांच्या पाठगुळी बसुन मी हे सगळं लिहुन घेतले होते.

प्रयत्न

लेखक निशान्त यांनी गुरुवार, 26/05/2011 13:45 या दिवशी प्रकाशित केले.
उध्वस्त होने आपल्या हाति, जिवन घडवने आपल्या हाति, उलटलि नाव जरि समुद्रि, पैलतिरि पोहुनि जाने आपल्याच हाति

बुद्धाच्या डोक्यावर

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 25/05/2011 22:41 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या आठवड्यात पुण्याहून मुम्बईला येताना एक चित्रकार सहप्रवासी भेटले. ते कोणाशीतरी फोनवर बोलत होते. बोलताना त्यानी पलीकडल्या माणसाला विचारले की गौतम बुद्धाच्या डोक्यावर जे दिसते ते त्यांचे केस आहेत( बुचडा बांधलेले) की डोक्यावरचा मुकुट आहे. माझ्या मनात जे सहज आले ते म्हणजे बुद्धाच्या डोक्यावर जे आहे ते कुरळे केस आहेत. त्या चित्रकारांचे म्हणणे की तो मुकूट नाही किंवा ते केस देखील नाहीत. बुद्धा प्रमाणेच महावीराची मूर्तीदेखील त्या प्रमाणेच आहे. आणि महावीर आणी बुद्धा यांच्या कालावधीत फारसा फरक नाही. त्या चित्रकाराचे म्हणणे की बुधाने सर्वसंगपरीत्याग केलेला होता.

मी बोर्ड बोलतोय...

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 25/05/2011 18:40 या दिवशी प्रकाशित केले.
मी बोर्ड बोलतोय बोर्ड,बरेच वर्षापुर्वी एका पुढाय्रा कडुन लागलेला...बोर्ड॥ध्रु॥ त्या दिवशी जोरदार सोहळा होता,रंगवलेला शिवाजी आणि शेजारी १मावळाही होता। हार तुरे पेढे अगदी काहिही कमी नव्हतं,पुढाय्राच्या पुढे उभी होती १फोर्डं॥ माझ्यावर काय लिहितात मजकुर,मला माहित नसतो काय?पण १दिवस उलटला की लीहीणारे म्हणतात बायबाय। जसा रंगाचा ब्रश असतो ना,......तसच यांचं मन कोरडं॥ मी दुकानाचा असलो ना,की वाईट वाटत नाही,पण संघटनेचा असलो ना,की खटकतं। बाजार संपताच उठुन जातात........ऊरतं मोकळं मार्केटयार्डं॥ परवाच एका कुत्र्यानी माझ्यावर शू केली,त्या निमित्तानी जमलेली धुळ जरातरी कमी झाली। तुम्हाला अईकताना खिन्नता व
काव्यरस