चिव चिव चिमणी छतांत ...
ऑफिसमधून संध्याकाळी मी घरी आलो. दारावरची बेल वाजवली. दार माझ्या मुलीनं - वल्लरीनं उघडलं. बाहेरच्याच खोलीत ती अभ्यास करंत बसलेली असावी कारण दिवाणावर पुस्तकं, वह्या अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या. तिची दहावीची बोर्डाची परीक्षा जवळ आलेली होती. परीक्षेच्या अभ्यासाची सुट्टी कधीच चालू झालेली होती. मला बघितलं तशी हिरमुसला चेहरा केला.
मी विचारलं " काय झालं ?".
"आजही बाबा एकसुध्दा चिमणी आली नाही."
"त्यात काय झालं. येतील उद्या-परवा. फिडर आणून तीन तर दिवस झालेयत".
बुर्हाणी फौंडेशनने काही हजार बर्ड फिडर्स वाटायचे ठरविले होते.
येस ,वी आर ...
MIT ,Symboysis किंवा अशाच एखाद्या कॉलेजचा कॅंपस.. देन तीन पोरे नेसकॅफे वर कॉफी पीत फाडफाड इंग्लिश बोलताना दिसतात. आपण, सहज जवळ जाऊन नाव विचारतो.. तर ते असतात जोशी, कुलकर्णी आणि पाटील .. दॅटस इट .. मराठी येत असूनही इंग्लिश बोलणारा, चांगल्या निदान बर्या घरातून आलेला.हाताशी मोबाईल आणि गाडी असणारा.. शरीराने भारतात आणि मनाने इंडियात राहणारा हा आमचा तरूण वर्ग.. अख्ख्या महाराष्ट्रभर पसरलेली ही आमची जनरेशन..सुशिक्षित,मॉडर्न असा हा वर्ग .. संख्येने कमी पण ब्युरोक्रॅट्स प्रमाणे मोस्ट इफेक्टिव्ह ...
शिवराज्याभिषेक सोहळा ६ जून २०११
रायगडावर ६ जून रोजी हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा ३३८ वा राज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.जबरदस्त पावसात आणि धुक्यात सोमवारी पहाटे मुख्य सोहळ्याला सुरुवात झाली.
मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर कुलदेवतेला स्मरून शिवरायांच्या सुवर्णमूर्तीवर श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते राज्याभिषेक संपन्न झाला.यावेळी महाराजांच्या जयजयकाराने सारा आसमंत दणाणून गेला होता.
पोवाडे, ललकारी,तुतारी च्या आवाजाने वातावरण भारुन गेलं होतं.
यावेळी नितीन देसाई यांनी पुढील वर्षी सोहळा आणखी दिमाखदार आणि भव्य होणार असल्याचा सांगितलं....तसंच रायगड,राजगड आणि सिंधुदुर्ग
राष्ट्रवादी काँग्रेसचा ब्राह्मणद्वेष की विसरभोळेपणा..?! :)
मिपावरील माझ्या सर्व जातीधर्माच्या मित्रमैत्रिणींनो,
सप्रेम नमस्कार वि वि,
आज तुमच्या-आमच्या आणि सर्वांच्याच लाडक्या राष्ट्रवादी काँग्रेसचा १२ वा वर्धापनदिन. आपली राष्ट्रवादी १२ वर्षांची झाली हो..! त्यानिमित्ते शरदमामा पवारांचे अभिनंदन बर्र का! :)
या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आज मुंबैत राष्ट्रवादीने 'सामाजिक हक्क परिषद..' या नावाने एक रॅली भरवली आहे. गेले काही दिवस रस्त्यावर काही ठिकाणी त्या संबंधीचे फलक पाहण्यात येत होते.
दोन लेकांमधील अंतर
भारतातील शहरी मध्यमवर्गीय सध्या आम्ही दोन, आमचे एक ह्या मोडवर आहेत. परंतु, कुटुंब नियोजनाच्या सुरुवातीच्या काळात "हम दो हमारे दो" किंवा "पहला जल्दी नही, दुसरा अभी नही, तीसरा कभी नही" अशा जाहिराती प्रसिद्ध होत.
दोन मुलांमध्ये किती अंतर ठेवावे ह्याची चर्चा करणारा एक रोचक लेख नुकताच वाचनात आला.
आदिमानवदेखिल आपल्या अपत्यांत ३-४ वर्षांचे अंतर ठेवी, हे कळून आश्चर्य वाटले.
आज पहाटे
आज पहाटे, आळसावल्या मनात सखये उरला तुझाच बंध
आज पहाटे, सुकल्या राताराणीस सखये उरला तुझाच गंध ...
आज पहाटे, सोडले शरीर अन भिरभिरले मन तुझ्याच मागे
आज पहाटे, संपला शिशिर, फुलवितो वसंत नवस्वप्नांचे थवे
आज पहाटे, सरला काळोख, उजळले मन्मनात सोनेरी रंग
आज पहाटे, झालो वैरागी, अन झालो पुन्हा मोहरानात दंग
आज पहाटे, पुन्हा एकदा, बोलले किती एरवीचे तुझे नयन मुके
आज पहाटे, पुन्हा एकदा, दाटले डोळ्यासमोर वास्तवाचे धुके
- विश्वेश
घाव
लोक्स चारोळीचे धागे बनवताहेत.
म्हटले आपण पण न लाजता (कोण हसतोय रे तो? आहे. आहे मला थोडीशी का होईना लाज) जे काही आहे ते प्रकाशावे.
वादसंवाद करताना निर्मिती झालेली आहे त्यामुळे श्रेय अर्थातच मला नाहीये.
प्रस्तावना पुरे झाली.
तर सादर आहे माझे शेरोशायरीतले पहिले अपत्य.
घाव तो होता जुना पण वर्मी नव्याने लागला
पुसटल्या जखमांना जणू आज स्पर्श कुणाचा जाहला
आली अशी कळ उरी, आली उरी कळ अशी
जणू अंत मी स्वतःचा, आज जवळ पाहिला
स्पंदन
वर्षे सुकली गुच्छ बांधले काडी एक तयातिल चंदन
वळून मागे शोधू पाहे; गंध मंडली; शापित मन
उगाळली आयुष्ये परि ना वात सरे ना ऋतुमंथन
काळावरती ठसे अबाधित; तलम रेशमी हे बंधन
घटअमृतसय निराकार; उभयांना विरहाचे प्राक्तन
शोध निरागस क्षतापलिकडे; रोज सागराचे स्पंदन
.............................अज्ञात
काव्यरस
मिसळपाव