जालस्थ
नमस्कार मंडळी!
येनार येनार येनार! असे अनेक दिवस ऐकत असलेले "गुगल प्लस" जालावर अवतरले. काय मस्त आहे म्हणून सांगू त्या फेसबुकापेक्षा! कारण काय म्हणता? अहो, असे बघा, त्याफेसबुकावर फक्त मित्र करू शकतो आणि मग त्या मित्रांच्या (आणि आपल्या) भिंती रंगवत बसू शकतो. पण प्रॉब्लेम असा आहे की त्यात एकच गोष्ट सगळ्याच कनेक्शन्सना समजू शकते. मात्र, आमच्या गुगल प्लसचे तसे नाही बरंका! त्यात तुमच्या आवडीनिवडीप्रमाणे वेगवेगळी वर्तुळे अथवा मराठी जालीय भाषेत कट्टे करू शकता. मग अ, ब, क, ला पार्टीस बोलावलेले ड, इ, फ, ला समजत नाही! वगैरे वगैरे.
आता मी असे माझ्या नवीन कोर्या गुगल प्लसच्या वर्तुळात आनंदाने लिहीले.
मिसळपाव