जनलोकपाल आल्यानंतर तुम्ही कोणाविरुद्ध पहिली तक्रार कराल?
(चर्चेसाठी आज समजुया की) लोकांच्या प्रचंड पाठींब्यापुढे काहिहि न चालल्याने या (नाकर्त्या, षंढ, माकड वगैरे वगैरे राजकीय पुढार्यांनी) जनलोकपाल जसेच्या तसे संमत केले आहे. मला उत्सुकता आहे की जनलोकपाल (अगदी जसेच्या तसे) आल्यानंतर सामान्य जन कसे वागतील आणि या कायद्याचा उपयोग करुन घेतील?
चर्चेच्या आधारासाठी काहि नोंदी इथे देत आहे
१. जनलोकपालविधेयकातही केवळ केंद्रीय कर्मचारी समाविष्ट आहेत
२. तक्रार करतेवेळी इतपत पुरावा हवा की प्रथमदर्शनी लोकपाल संस्थेला गुन्ह्यात तथ्य वाटले पाहिजे
३. राज्यस्तरावरील तक्रार लोकायुक्ताकडे करता येईल (मात्र त्याला शिक्षा करण्याचे अधिकार नाहित).
मिसळपाव
