Skip to main content

चुकीचे हिशेब

लेखक यश पालकर यांनी शुक्रवार, 11/11/2011 13:51 या दिवशी प्रकाशित केले.
मी मांडले हिशेब नेहमी ते सारे चुकीचे होते ढाळले अश्रु ज्यांसमोर त्यांना हे नेहमीचे होते सोसले घाव सारे ते तर माझ्या ओळखीचे होते ना कळले सागर जे तळ तयांचे खोलीचे होते आर्त स्वर माझे हे कधीतरी तुझ्या अंगणीचे होते दुख कधी ना कळले कुणाला कारण सारे हे माझ्या मनीचे होते यशवंत

केक- अफलातुन

लेखक किचेन यांनी शुक्रवार, 11/11/2011 13:36 या दिवशी प्रकाशित केले.
'एशिया कलिनरी चालेंजेस'२०११' मालादिव्स येथे झालेल्या स्पर्धेतील केक विभागातले काही उत्तम केक. या स्पर्धेमध्ये अनेक आंतरराट्रीय शेफचा समावेश होता.

खोपा

लेखक जागु यांनी शुक्रवार, 11/11/2011 11:59 या दिवशी प्रकाशित केले.
अर खोप्यामंदी खोपा सुगरणीचा चांगला तिचा पिलामंदी जीव जीव झाडाले टांगला खोपा म्हणजे सुगरणीचे घरटे दिसले की बहीणाबाई चौधरींच्या वरील पंक्ती आठवल्या शिवाय राहत नाहीत. खरच मानवी जीवनालाही किती सार्थक ओळी आहेत ह्या.

ती...........

लेखक लीलाधर यांनी शुक्रवार, 11/11/2011 08:30 या दिवशी प्रकाशित केले.
ती..... ती आहे हलकी, ती आहे फुलकी, ती नाही परकी अन् ती नाही बोलकी, पण तरीही तीची आपल्यावर असते मात्र मालकी..... अशी ती तुम्हा आम्हा सर्वांची लाडकी हलकी फुलकी डुलकी.............. तुम्ही कुठेही असा तीचा हाच आहे वसा, कारण तीला लागत नाही व्हीसा, ती ठसवते तीचा आपल्यावर ठसा, अशी ती तुम्हा आम्हा सर्वांची लाडकी हलकी फुलकी डुलकी कारण ती नाही तुम्हा आम्हाला परकी........... एक डुलकी एक डुलकी, करते वेळ हलकी फुलकी एक डुलकी! (चालः एक झोका एक झोका चूके काळजाचा ठोका)

अफलातून केक्स

लेखक किचेन यांनी गुरुवार, 10/11/2011 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
'एशिया कलिनरी चालेंजेस'२०११' मालादिव्स येथे झालेल्या स्पर्धेतील केक विभागातले काही उत्तम केक. या स्पर्धेमध्ये अनेक आंतरराट्रीय शेफचा समावेश होता. . वरील फोटो मधील गुलाबाची फुले खरी नसून ती क्रीमची आहेत. . .

चांदण्यात फिरतांना.....

लेखक विनीता देशपांडे यांनी गुरुवार, 10/11/2011 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
चांदण्यात फिरतांना........ १)अक्षरचांदण ती : इतक्या दूर आलास माझ्या अक्षरवेलीला धरुन, बघ माझ्या नभातलं लखलखणारं अक्षरचांदण. तो: या चांदण्यात न्हाहातांना डोळाभरुन पाहायच होत तुला. तू अनेक अक्षरांच टिपूर टिपलं असेल आजवर मी माझा टिपूर साठवतोय मनात-डोळ्यात-सार्‍या देहात. २) गुलाबी छटा ती: बघ या चांदण्या हळुहळु संधिप्रकाशात विरु लागल्या जणु काही त्याने चांदण्यांना गुलाबी मिठीत कोंडुन ठेवलय त्याची छटा सार्‍या आसमंतात विखुरली आहे.. तो: संधिप्रकाश चोरपावलांनी तुझा गोरा रंग चोरुन नेतोय आणि तू चांदण्यात भिजुन अंग निथळत बसलीस क्षितीजाच्या क

मारुती अल्टो -Petrol Verson

लेखक नितिनभालेराव यांनी गुरुवार, 10/11/2011 16:04 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, माझ्याकडे मारुती अल्टो -Petrol Verson आहे. मला ती Gas वर convert करायची आहे. CNG आणी LPG पैकी कुठला पर्याय चालेल. दोहो पैकी फायदेशीर आणी सुरक्षीत कुठला ? माहिती पाहिजे.

कोकण दर्शन मदत हवी आहे.

लेखक मानस् यांनी गुरुवार, 10/11/2011 15:16 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रात राहून कोकण पाहिलं नाहीस? असं आजपर्यंत बर्‍याच लोकांकडून ए॓कून घेतलय्...पण आता डिसेंबरमधे मिळणार्‍या सुट्टी व संधीचा फायदा घ्यावा म्हणतोय. मी माझ्या कुठुंबासह २३ ते ३१ डिसेंबर कोकण दर्शनाचा प्लान करतोय. कोकणात ही माझी पहिलीच ट्रिप आहे,इथे बरेचजण कोकणातले असल्याने/ कोकणात जाऊन आले असल्याने मदत करु शकतील असे वाटले. ८ दिवसात काय काय पहाता येइल? साधारण टूर प्लान कसा करावा? रहाण्यासाठी/जेवणासाठी शक्यतो घ्ररगुती चांगली ठिकाणे माहिती असतील तर सुचवाल का प्लीज? मागे एकदा या आशयाचा धागा वाचल्याचे आठवते पण खूप शोधूनही तो धागा सापडला नाही...कोणाला माहिती असेल तर क्रूपया URL द्या. धन्यवाद.