Skip to main content

पापणी का फडफडते?

लेखक रविंद्र गायकवाड यांनी बुधवार, 16/11/2011 14:47 या दिवशी प्रकाशित केले.
गेले (४-५)काही दिवस झाले माझ्या डाव्या डोळ्याची पापणी थोड्या थोड्या वेळाने सतत फडफडते. म्हणजे अगदी आपोआप हालायला लागते (पुर्णपणे बंद होत नाही, डोळे मारतोय असे समजू नये.) कुणी अपशकुन म्हटले कुणी शकुन म्हणते. तसे असेलच तर पापणी फडफडण्याचे शकुण अपशकुन फले काय आहेत? या मागचे शास्त्रिय कारण काय? आणि एखाद्या विशिष्ठ व्यक्तीची आठवण आल्यावर किंवा नाव ऐकल्यावरच का फडफडते?

सी- सॅट..!!

लेखक सुहास झेले यांनी बुधवार, 16/11/2011 12:08 या दिवशी प्रकाशित केले.
टेक्निकल किंवा कस्टमर सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये "सी- सॅट" आणि "डी- सॅट" हे नेहमीच्या वापरातले शब्द. थोडक्यात सांगायचं झालं तर, "डी- सॅट = कस्टमर डिस सॅटिस्फॅक्षन (Cx Dis-Satisfaction )" आणि "सी- सॅट = कस्टमर सॅटिस्फॅक्षन (Cx Satisfaction)" प्रत्येक कॉलवर ही रेटींग फॉलो केली जाते. जर कुठला ईश्यू आपण लगेच सोडवला किंवा कस्टमरला चांगल्या प्रकारे मदत केली, तर आपल्याला सी- सॅट मिळवता येतो फीडबॅक फॉर्ममधून. त्यासाठी अनेकवेळा काही गोष्टींवर पाणी सोडावे लागते, जसं की शिफ्ट ब्रेक्स, जेवण वगैरे वगैरे. कोणाशी कसं बोलावं, असं कोणी बोलल्यावर आपण कसं बोलावं हे सगळं सगळं ठरलेलं असतं.

मी- एक शून्य

लेखक सन्जोप राव यांनी बुधवार, 16/11/2011 09:34 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणांचा सध्या सुकाळ आहे. विसुनानांच्या शब्दांत सोपे फुलटॉस. घड्याळ थोडे हळू झाले आहे आणि हाताशी अखंड आंतरजाल आहे. असे आउटसाईड दी ऑफस्ट्म्प चेंडू मिळाले की रावसाहेबांच्या शब्दांत 'कसं आवरायचं हो मन?' धनंजय, माफ करा शून्य खांद्यावरचा पदर काढला, की काय होते? पदर होतो वेगळा - आता तो पदर असला काय आणि नसला काय. महत्त्वाचा राहातो तो गड्डा म्हणजे खांदा. 'पिंजरा' मध्ये संध्या म्हणते तसा 'अटकर बांधा, गोरा गोरा खांदा, पदर वार्‍यावरी' खांदा ही कल्पना पदराशिवाय शिल्लक राहाते.

.(नेत्रपटलावरील चित्रांवेगळे)

लेखक राजेश घासकडवी यांनी बुधवार, 16/11/2011 09:04 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द म्हणजे चिह्न - जगाचं ज्ञान करून घेण्यासाठी वापरलं जाणारं. ते कधी पांढऱ्यावर काळ्या रेषा म्हणून येतं, तर हवेत उमटणाऱ्या ध्वनिलहरींतून जाणवतं. पण जग जाणण्यासाठी आपण केवळ शब्दच वापरत नाही. चित्रंही वापरतो. कोणीतरी म्हटलं आहे की एक चित्र हजारो शब्दांइतकं महत्त्वाचं असतं. आपण प्रत्येकच अशी चित्रं वापरतो. ती वारंवार आपल्या नेत्रपटलावर उमटत असतात. म्हणून मी यशवंत कुलकर्णी यांच्या लेखात 'शब्द' या शब्दाच्या जागी 'नेत्रपटलावरील चित्र' वापरून हा लेख लिहिलेला आहे. खरं तर त्यांचाच सल्ला वापरून मी त्यांचा लेख अधिक व्यापक केला आहे असं म्हणता येईल.

एक हे विश्व, शून्य हे विश्व

लेखक धनंजय यांनी बुधवार, 16/11/2011 02:06 या दिवशी प्रकाशित केले.
विश्व आहे कांद्यासारखे. त्याचा अर्थ आणि गाभा शोधता-शोधता मोठेच आश्चर्य होते. शून्य कांद्याचा बाहेरचा पदर काढला, की काय होते? पदर होतो वेगळा - तो कांदा नाही. असला काय आणि नसला काय. राहातो तो गड्डा म्हणजे कांदा. कांदा ही कल्पना पदराशिवाय शिल्लक राहाते. "कांदा" हा शब्द त्या कल्पनेसाठी उपयोगी राहातो. एक एक पदर काढता-काढता शेवटी असे होते - शेवटचा पदर बाजूला केल्यावर काहीच शिल्लक राहात नाही. गाभा शोधायला गेले, तर कांदा असा नसतोच. म्हणजे "कांदा" कल्पनेसाठी आवश्यक काय? हाती येते शून्य. शून्य कल्पनेकरिता असलेला शब्दही शून्य. कांद्यासारखी कुठलीही गोष्ट घेतली, तरी असेच दिसते.

पेपर प्लेट पासून बनवलेले वॉल हेन्गिंग!!

लेखक पूनम ब यांनी बुधवार, 16/11/2011 01:58 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य: २ चौरस आकाराच्या पेपर प्लेट व्हाईट स्कूल ग्लू रद्दी पेपर टिश्यू पेपर सेलो टेप अक्रालिक कलर कृती: रद्दी पेपर घेऊन त्याचे बारीक रोल करून घ्यावे. ते सेलो टेप ने प्लेट च्या मागच्या बाजूला काठावर चिटकवून घ्यावे. पेपर रोल वापरून हवे तसे डिझाईन करून घ्यावे. व्हाईट स्कूल ग्लू पाण्यामध्ये घालून मिक्स करावे. टीश्यु पेपर चे छोटे छोटे तुकडे करून ते ग्लू च्या सहाय्याने प्लेट वर चिटकवून घ्यावे.

बिगारी

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 16/11/2011 00:57 या दिवशी प्रकाशित केले.
बिगारी
रोज सकाळी बांधून भाकर कामावर निघतो सायकलीवर उचलूतो खडी रेती डबर माती शिमीटाची डोक्यावर पाटी उघडं डोकं तापून जातं उन्हातान्हानं सडकून निघतं रचतो मालात विटेवर विट भिंतीत चिणतो मलाच निट बांधले बांबू वासे लाकडी फळ्या जगतो झालंय लोखंडाच्या सळ्या कांक्रीट मिक्सर गोल फिरतं मातीधुळीतच आयुष्य जायचं बाकीचे एखादंच घर बांधतात गरीब बिगारी घरं बांधतो - पाषाणभेद