Skip to main content

एक महाप्रवास !

लेखक चाफा यांनी गुरुवार, 17/11/2011 20:34 या दिवशी प्रकाशित केले.
घाटातून गाडी तशी हळूवारच पण ठामपणे गावाकडे प्रवास करत होती. चांगली हसतीखेळती सकाळ एका फोनने उदासवाण्या दिवसात बदलून टाकलेली. गाडीतली शांतता मधेमधे ऐकू येणार्‍या वहिनीच्या हुंदक्यांनी थोडीफ़ार भंगत होती तितकीच. पावसाळा नुकताच रंग उधळायला लागल्याने बाहेरचे निसर्गसौंदर्य नक्कीच नजर वेधून घेणारे होते, पण गाडीतल्या सगळ्यांचीच मनःस्थिती आत्तातरी निसर्गाचा आस्वाद घेण्यासारखी नव्हती. सगळ्याच रविवारांप्रमाणे आजचाही दिवस आमच्या घरात हसतखेळत उगवला होता, थोडासा आळसावत, थोडा सैलावत.

चारोळी... ४ओळी

लेखक दि ग्रेट मराठा यांनी गुरुवार, 17/11/2011 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
बस झाले इंग्रजी आता, मराठी बोल घुमुदे... मुंबईचा कॅलिफोर्निया नको, मराठी मुंबई उरुदे... चांदयापासून बांदयापर्यंत, ऐकच घोष होउदे... मराठी बोल मराठी बोल, शिवराज्याभिषेक होउदे...

प्रेमाचा झुला

लेखक यश पालकर यांनी गुरुवार, 17/11/2011 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेमाचा झुला तू सोडून गेलीस तर जीवन एकाकी आहे तूच सांग मला तुझ्याशिवाय जीवन काय बाकी आहे तुला कसं वाटल की मी तुझ्यावाचून जगेन तुझी सोबत नसताना कशी भविष्याची स्वप्न बघेन दुनियेला नाही समझली तगमग आपल्या मनाची तुला तर कल्पना होती आपण पाहिलेल्या स्वप्नांची तू परत मागे वळ आयुष्य पुन्हा बहरेल तू पुन्हा साथ दे हे दुःख क्षणात सरेल शपथ आपल्या प्रेमाची मी देत आहे तुला ह्या मनातल्या प्रेमाचा परत एकदा झुलव तू झुला यशवंत

अशी कुठली गोष्ट आहे ज्याच्यासाठी माणूस सतत धावतो आयुष्यभर वयाचं भान न राखता?

लेखक एक अनामी यांनी गुरुवार, 17/11/2011 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
अशी कुठली गोष्ट आहे ज्याच्यासाठी माणूस सतत धावतो आयुष्यभर वयाचं भान न राखता? . . . . माणूस आयुष्यभर कशा ना कशाच्या मागे धावतच असतो... . . अशी कुठली गोष्ट आहे ज्याच्यासाठी माणूस सतत धावतो? . . . . पैसा...? प्रसिद्धी...? . नाही पैसा, प्रसिद्धीला वय आड येतं, निरागस बालवयात या दोन्हीचा गंधही नसतो. अन् उतारवयात ह्याचा मोह सुटतो... . . अहो... जास्त गंभीर होऊ नका... आयुष्याभर माणूस ज्याच्यामागे धावतो, अगदी वयाचं (अन् तब्येतीचंही) भान न ठेवता... ती गोष्ट आहे.. . . "Local Train..." . पहा कसे आजी- आजोबाही मुला-नातवंडांसह धावतात ते...! . . अजून काय असू शकेल मिपाकरांच्या मते...?

पतीच्या मालनत्तेत पत्नीला ५०% वाटा - लोकसत्ता

लेखक नेत्रेश यांनी गुरुवार, 17/11/2011 05:49 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या लोकसत्तेतील बातमीनुसार पत्नीला पतीच्या मालमत्तेत ५०% वाटा देणारा कायदा महाराष्ट्र राज्यात करण्याचा प्रस्ताव आहे http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=19… बातमी वरवरची वाटते, फार डीटेल माहीती दीलेली

मिठीत कळी उमलली

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 17/11/2011 04:26 या दिवशी प्रकाशित केले.
मिठीत कळी उमलली
राया तुम्ही प्रेमाची फुलबाग केली तुमच्या मिठीत कळी उमलली वाट कितीक पाहीली थकलं डोळं आज उशीरा का येनं केलं? रुजूवात कराया मोहोर उठवा गाली तुमच्या मिठीत कळी उमलली सजवून माझी काया नखरा केला जवळ घेता तुम्ही गोड गुन्हा झाला नजरेचा तिर मारता अंगी वीज चमकली तुमच्या मिठीत कळी उमलली कमरपट्टा उगा मला का रुतू लागला? शालू अवजड झाला आज का अंगाला? चोळी ऐन्याची नको तिथं उसवली तुमच्या मिठीत कळी उमलली - पाषाणभेद १६/११/२०११
काव्यरस

गाओ गाओ मेरे साधो सभी भुलाऑ गम........

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 16/11/2011 18:01 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या विडंबनाचे पेव फुटले आहे ते बघून मला एक अत्यंत जूने विडंबन आठवले. १९३२ सालचे एक भजन पूरणभगत नावाच्या सिनेमातले... गायक अत्यंत तोलामोलाचा....के सी डे... आपल्या मन्ना डेचे बहुतेक ते काका होते आणि एस डी बर्मन यांचे गुरू. त्यांचे हे गाणे ऐका... हे गाणे त्या काळात खूप म्हणजे खूपच गाजले होते. बरोबर चार वर्षाने या गाण्याचे विडंबन करण्यात आले मिस. फ्रॉन्टियर मेल मधे. त्याकाळातील बोल्ड नटी फिअरलेस नादीया हिचा हा सिनेमा. त्याचा संगित दिग्दर्शक होता मुहम्मद का कोणीतरी.