आजोबांच पेन
नमस्कार मंडळी,
कधी कधी उन्हाळ्यात एक थंड हवेची झुळुक येते, ऊर भरून आपण श्वास घेतो, थंडावा अंगभर पसरतो. श्वास न सोडावासा वाटतो. पण निसर्गाचा नियम.. श्वास सोडावाच लागतो.
असंच काहीसं सुख आणी दु:ख. ते यावं आणि जावं हेच कदाचित आयुष्य. :)
कॉलेज मधे होतो तेव्हा "मेस"वर जेवायचो. मेसवर एक आजोबा यायचे. खळखळून हसायचे. आम्हाला सामील व्हायचे. वय ८५ आहे असे ते म्हणायचे. दुपारी आणि रात्री भेटायचे. आम्हाला बघून खुप खुश व्हायचे. हसायचे, आमच्याबरोबर विनोद करायचे आणि स्वतःचे तरुणपण आठवून पुन्हा खुश व्हायचे.
आजोबा एकदा जेवणानंतर गप्पा मारताना म्हणाले की त्यांच्या वयाचे त्यांच्याबरोबर कुणीच नाही.
मिसळपाव