Skip to main content

वैषम्य

लेखक अज्ञातकुल यांनी शुक्रवार, 09/12/2011 10:07 या दिवशी प्रकाशित केले.
मळक्या; उरात जखमा; ते लेकरू अडाणे शामल अशांत वेळी मातेस बिलगलेले माता-कुशीत दूजे त्याचे अकांत रडणे पोटात कोंब तोही; सारे कसे भुकेले डोळ्यात खोल करुणा स्वामित्व लोपलेले ना गोत; ना किनारा आशेत हरवलेले व्याकूळ काळजाचे; हे; रोप दीनवाणे परसात वेदनेच्या बांधून शकट गेले अस्वस्थ मी भिडस्त माझेच गाइ गाणे ओठी चणे दयेचे, अवघे दुरून पाही डोहात आंसवांच्या चंद्रसवे नहाणे देहास ज्ञात नव्हते निर्वस्त्र हे रहाणे ही जात माणसांची कैसी अशी विखारी बांधे कुणी मनोरे कोणी न पायरीही मातीतले स्वरूप मातीस ना विचारी देठास विषम काटे सुमनेहि पाठमोरी ........................अज्ञात
काव्यरस

"पारंबी" एक वेगळा चित्रपट

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी शुक्रवार, 09/12/2011 03:25 या दिवशी प्रकाशित केले.
आज माझा मित्र सतिश सलागरे यांनी दिग्दर्शित केलेल्या " पारंबी" या चित्रपटाचा प्रिमिअर शो पाहाण्याचा योग आला.. अंधेरीच्या फन रिपब्लिक मध्ये या चित्रपटाचा प्रिमिअर शो होता..अतिशय साधे पण तितकेच विचारप्रवणीय कथानक..खेडेगावातील एक गरिब तरूण शिक्षण घेउन आल्यावर , गावाची परिस्थीती बघून आपलच गाव सुधारण्या प्रयत्न सुरू करतो.. हे करत असतांना त्याला काय अडचणी येतात, त्यातून तो नायक कसा मार्ग काढतो.. अशी साधी कथा.. भूषण प्रधान.

विरू दादा ..२१९...अभिनंदन....!!!

लेखक योगी९०० यांनी गुरुवार, 08/12/2011 19:04 या दिवशी प्रकाशित केले.
विरू दादा चे अभिनंदन..!! धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवागने आज वेस्ट इंडिज विरुद्ध चौथ्या एकदिवसीय सामन्यात विरेंद्र सेहवागने सचिन तेंडुलकरचा २०० धावांचा विक्रम आज मोडला. तुफान फटकेबाजी करत असलेला सेहवाग २१९ धावांवर बाद झाला आणि एक विश्वविक्रम घडला. विश्वविक्रम केल्याबद्दल विरेंद्र सेहवागचे हार्दिक अभिनंदन..!!

पॉप संगीतातलं एक सुरेल रत्न - अ‍ॅबा

लेखक प्रास यांनी गुरुवार, 08/12/2011 19:02 या दिवशी प्रकाशित केले.
सत्तर चं दशक हे पूर्णपणे 'डिस्को'चं दशक होतं. सुरुवात 'बीगीज'ने केलेलीच होती पण त्याला कळस चढवण्यासाठी हातभार लागला 'ABBA'चा. 'अ‍ॅनी-फ्रीड' तथा 'फ्रीडा लिंग्स्टाड', 'बियॉर्न उल्वैस', 'बेनी एन्डरसन' आणि 'अ‍ॅग्नेथा फेल्टस्कुग' या चार जणांच्या नावाच्या आद्याक्षरानी बनवलेला त्यांचा ग्रूप 'ABBA'.

इति प्रेमपुराण संपले

लेखक विदेश यांनी गुरुवार, 08/12/2011 17:28 या दिवशी प्रकाशित केले.
तिच्यावर त्याचे चॉकोप्रेम त्याच्यावर तिचे कॅडप्रेम जागत होता तिच्याचसाठी जगात होती त्याच्याचसाठी दु:ख काहीच ठाऊक नव्हते सुखात दोघे डुंबत होते ! आले कधी जर त्याचे डोळे तिचेच डोळे पाणी गाळे ! हासत खेळत आनंदाने मजेत जीवन चालू होते जिवापाड ते प्रेम तयांचे तहानभूकही विसरायाचे त्या प्रेमाला दृष्ट लागली... सुमुहुर्ताची ओढ लागली ! इति प्रेमपुराण संपले -त्या दोघांचे 'लग्न' लागले !

पावशेर

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 08/12/2011 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
कॉलेजात असताना नवेनवेच काही उर्दू शेर माहीत झाले होते. गृप मधल्या बहुतेक पोराना काहितरी हिंदीत दोन ओळी बोलायचे आणि त्याला शेर मानून त्या सगळ्या शेराना उगाचच वाहवाह देत बसायचे. हे सगळे आंखे दिल इश्क दामन आसू बादल हवा बारीश अशाच विषयावर असायचे. आम्हाला शेर तयार करायचे नियम म्हणजे यमक वगैरे कोणीतरी सांगितले. त्या महात्म्याने आम्हाला शेर दारु प्रेयसी या हमखास विषयावरच तयार होतात असे सांगितले. मग आम्ही दवा दिल दर्द जिगर आसूं ... यार असे बरेचसे शब्द गोळा केले. इंजिनिंरिंग चे असल्यामुळे की काय पण आम्हाला शेरांचे घाऊक प्रॉडक्षन करायचे होते.

वसा

लेखक क्रान्ति यांनी गुरुवार, 08/12/2011 15:56 या दिवशी प्रकाशित केले.
कुणा माहिती काल होतो कसा? मला मीच ना आठवे फारसा ! प्रवाहातल्या ओंडक्यासारखा, किती दूर वाहून आलो असा दगा देतसे सावलीही मला, भरोसा करावा कुणाचा कसा? खुळ्या पावसाच्या वृथा वल्गना इथे कोरडा मी जसाच्या तसा ! खरा चेहरा दाखवू पाहता, चरे पाडले, फेकला आरसा नकोसा जरी वाटला जन्म हा, पुसावा कसा मीच माझा ठसा? उतूही नये जीव, मातू नये फुलावा, फळावा असा दे वसा !
काव्यरस

म्हातारा बसलेला असतो ...!!

लेखक प्रकाश१११ यांनी गुरुवार, 08/12/2011 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
चटेरीपटेरी अंडरप्यांट घालून डोक्यावर टोपीचा द्रोण लेऊन म्हातारा बसलेला असतो संध्याकाळी त्या लाकडी बाकावर सूर्याचे कोवळे उन्ह घेत अंगावर उघडाबंब ...!!
काव्यरस