लेखकजमीर इब्राहीम 'आझाद'यांनी शुक्रवार, 16/12/2011 12:12 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदू असोत कोणी, कोणी असोत मुस्लीम....
..
वणव्यात पेटलेली, वस्ती अजून बाकी,
जाळून पीळ गेला.... रस्सी अजून बाकी..!
हिंदू असोत कोणी, कोणी असोत मुस्लीम,
दोस्ती उजाड झाली, बस्ती अजून बाकी..!
लेखकअज्ञातकुलयांनी शुक्रवार, 16/12/2011 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
दुलई धुक्याची अंगावर दंव
निळी ओढणी गूढ नभावर
कौलांवरती वलये धुराची
ऊब पांघरुन जो तो भूवर
झिरमिळ पालव रेशिम इरकल
चित्र नव्हाळे लज्जित कणभर
गोत जिव्हाळा हा सृजनाचा
मकर क्रांतिचा वारू मनभर
चाहुल वा ही हूल म्हाणावी
येते जाते तुडवित अंतर
पाचोळा उधळित स्वप्नांचा
पुन्हा एकदा झुलते अंबर
....................अज्ञात
लेखकमकरन्दबेहेरेयांनी शुक्रवार, 16/12/2011 09:26 या दिवशी प्रकाशित केले.
त्या दीवशी मी तीचे चित्र काढले
रक्ताच्या लाल रंगाने
समोरच्या कॅनव्हॉस वर,
ज्यावर बर्याच अकृत्यांची
गर्दी होती,
त्यातील एका अबलक वारुला
ती आवडली आणि तो तीला घेउन गेला
कुठल्यातरी रम्य अरण्यात दूर दूर
काही सुप्रसिद्ध तारे तारकांच्या साक्षीने
जे जन्मत:च स्वयम्भू होते
मी इतका शोकाकुल झालो की
माझे अश्रु त्या कॅनव्हॉस वर पडले
म्हणून मी घेतले
तारेवर वाळत असलेले कापड
ज्याने मी कॅनव्हॉसवरचे
पाघळलेले रक्त पुसून काढले....
बेहेरे मकरंद
११०२२१६१
लेखकअभिजीत राजवाडेयांनी शुक्रवार, 16/12/2011 04:56 या दिवशी प्रकाशित केले.
२०१३च्या बॉस्टन येथे होणार्या BMM अधिवेशनाच्या संयोजक समितीने घोषवाक्य आणि प्रतीकचिन्हाची स्पर्धा आयोजित केलेली आहे. विजेत्या स्पर्धकाला २०१३ च्या अधिवेशनात विनामूल्य प्रवेश दिला जाईल. तसेच अधिवेशन स्मरणिकेत विजेत्या स्पर्धकाचे छायाचित्र प्रकाशित केले जाईल. ही स्पर्धा उत्तर अमेरिकेतल्या सर्व मराठी/ अमराठी व्यक्तींसाठी खुली आहे. ह्या स्पर्धेत भाग घेण्यास उत्सुक आणि इच्छुक असलेल्यांनी आपले घोषवाक्य आणि/ अथवा प्रतीकचिन्ह, ३१ डिसेंबर २०११ पर्यंत श्रीनिवास साने यांना shriniwas.sane@bmm2013boston.com या इमेलवर पाठवावे.
लेखकप्राजुयांनी शुक्रवार, 16/12/2011 00:49 या दिवशी प्रकाशित केले.
बांधण्या कवितेत सारे मी असा घ्यावा वसा
सहज यावे शब्द आणि भाव उमजावा जसा!
आज कविते ये फ़िरूनी सांध शब्दांनी दुवा
टाक उघड्यावर मनाला, अन जराशी दे हवा
लख्ख झाल्या कल्पनेला दाव आता आरसा
बांधण्या कवितेत सारे मी असा घ्यावा वसा
पावसाच्या हालचाली, गर्द हिरवी वाटही
प्रेम शृंगारात भिजली, तारकांची रातही
अन पहाटेच्या मनावर, गोड उमटावा ठसा
बांधण्या कवितेत सारे मी असा घ्यावा वसा
घाल कविते दान थोडे फ़ाटक्या झोळीत या
अर्थ ओथंबून जावा मांडल्या ओळीत या
वाहुदे जन्मांतरी मजला तुझा हा वारसा
बांधण्या कवितेत सारे मी असा घ्यावा वसा
-प्राजु
लेखकयकुयांनी शुक्रवार, 16/12/2011 00:09 या दिवशी प्रकाशित केले.
सातवी-आठवीत असताना एकदा घरात राजीव दिक्षीतांच्या ''आजादी बचाओ आंदोलन'' च्या वीस कॅसेट्सचा संच (1996-97) दाखल झाला. हिंदी वक्तृत्वाची ओळखच राजीव दिक्षीत यांच्या भाषणातून झाली. कितीतरी दिवस घरात त्या कॅसेट लावल्या जायच्या आणि राजीव दिक्षीतांचे विचार, त्यांचा इतिहासाचा अभ्यास आणि एक स्वातंत्र्यप्राप्त 'देश' म्हणून भारतात होत नसलेल्या गोष्टींची तळमळ शब्दाशब्दातून दिसायची. राजीव दिक्षीतांची भाषणे ही काही फक्त राणा भीमदेवी थाटाची बाजारू भाषणे नव्हती - त्यांच्या प्रत्येक मुद्याला इतिहासातील साधार विवेचन, संदर्भ, विश्लेषणाची जोड असे.
लेखकमकरन्दबेहेरेयांनी शुक्रवार, 16/12/2011 00:07 या दिवशी प्रकाशित केले.
सायंकालीन छटा
आजकाल तीच्या चेहर्यावर
प्रतिबिंबित होत असतात
आणि त्या छटा पाहुन
मला अग्निज्वालांनी
होरपळत असलेल
निर्वात अंतरिक्ष
स्वप्नात दिसते
आणि मी जागा होतो
आणि कुणा मदमत्त जोडप्याला
हवी हवीशी रात्र
मला भयाण वाटु लागते
आणि मी ती स्मशान शांतता
भंग पावु नये म्हणुन
तोंडावर हात ठेवुन
मी आक्रोश करु लागतो
आणि शेवटाच्या विश्वापर्यंत
जाउन येतो
आणि त्याच वेळेला
देवळाच्या गाभार्यात
माझ नाव घुमत असत
आणि विश्वेश मात्र
शांतपणे बसलेला असतो
बेहेरे मकरंद
११०२२०८०
लेखकमकरन्दबेहेरेयांनी गुरुवार, 15/12/2011 23:28 या दिवशी प्रकाशित केले.
हाती कळ्याच माझ्या सजवून साथ गेली
फुलवून त्या कळ्यांना उमलून रात गेली
आता कशास होती संवाद गूज गोष्टी
करुनी मुक्या मुक्याने सहजात बात गेली
होते नभात तेव्हा अगणित लाख तारे
दावून ती दिशाही कोन्यात वात गेली
झाली युगा युगांची शेजेत भेट जेव्हा
लाजून ती निशाही अडवून हात गेली
हरलो कसा कळेना गाफील राहिलो मी
माझी प्रियाच तेव्हा देऊन मात गेली
बेहेरे मकरंद
११०२६०११
लेखकविकासयांनी गुरुवार, 15/12/2011 22:29 या दिवशी प्रकाशित केले.
टाईम मॅगझीन या साप्ताहीकाच्या दर वर्षाअखेरीस प्रसिद्ध केल्या जाणार्या "वर्षातली व्यक्ती" अर्थात "Person of the Year" ला खूप प्रसिद्धी मिळते. १९२७ सालापासून सुरू केलेल्या प्रथेमध्ये केवळ अमेरीकन व्यक्तीच, किंबहूना केवळ व्यक्तीच असते अशातला भाग नाही. १९८२ साली Machine of the year म्हणून संगणकाचे छायाचित्र आले (थँक्स टू अॅपल) तर १९८८ साली Planet of the year असे म्हणत प्रदुषणाने विनाशाकडे वाटचाल होऊ शकते या विचारांचे समर्थन करत "पृथ्वी"स पुढे केले होते.