Skip to main content

मिपाची विडंबिक परिस्थिती ढासळत आहे काय?

लेखक धनंजय यांनी रविवार, 18/12/2011 20:59 या दिवशी प्रकाशित केले.
सटायर-रायटर्स वृत्तसंस्थेचा अलिकडील एका लेख अस्वस्थ करणारा आहे. लेखातील निदान बरोबर असेल, तर मिपाची विडंबिक परिस्थिती अत्यंत नाजूक आहे असे दिसते. {([मूळ लेखा])}चा दुवा येथे देतो. व थोडक्यात त्यातील मुद्दे मांडतो. http://www.misalpav.com/node/20076 कमीकमी होणारे स्तंभन, व हाताबाहेर जाणारी हातभट्टी ह्यांमुळे वाचकाच्या विडंबिक परिस्थितीवर ताण आहेतच. (गेल्या वर्षांत अनेकदा इंटरेस्ट वाढूनही उत्पादनाचा दर्जा सुधारण्याची लक्षणे नाहीत).

ग्लु वाईन

लेखक स्वाती दिनेश यांनी रविवार, 18/12/2011 17:04 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी.. गेले काही दिवस आंतरजालापासून दूर होते. सध्या ख्रिसमसमय माहौल आहे, फ्रांकफुर्टचे ख्रिसमस मार्केट आणि त्यातील चॉकलेट्स, गरमागरम चेस्टनट्स, ब्राटवुर्ष्ट, राकलेट, फाँड्यु आणि ग्लुवाइनचे स्टॉल्स भरभरुन गर्दी करत आहेत.ग्लु वाइनच्या जोडीला चेरी, रास्पबेरी, प्लमच्या वाइन्सही वाफाळत आहेत.खास मुलांकरता आणि अल्कोहोल न पिणार्‍यांकरता नॉनअल्कोहोलिक ग्लु वाइन्सचे स्टॉल्सही आहेत. त्यात आज शेवटचा रविवार!

चिकन निजामी

लेखक सानिकास्वप्निल यांनी रविवार, 18/12/2011 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः १ किलो चिकन साफ करुन, तुकडे करुन घेणे. चिकन पीसेस ना थोडी हळद, लाल-तिखट व थोडे मीठ लावून मॅरीनेट करावे. . २ कांदे उभे चिरून , तळून त्यांची ब्राऊन पेस्ट करुन घेणे. १५-२० लाल सुक्या बोर मिरच्या (आवडीप्रमाणे कमी-जास्त) , २-३ टेस्पून सुके खोबरे, २ टीस्पून खसखस, ४ लवंगा, १-१/२ टीस्पून जीरे, ७-८ अख्खी काळीमिरी किंवा १ टीस्पून काळीमिरीपूड.

मुला मुलींची नावे

लेखक नर्मदेतला गोटा यांनी रविवार, 18/12/2011 00:29 या दिवशी प्रकाशित केले.
'नावात काय आहे' असं म्हणू दे कोणी पण नाव ही माणसाची आयुष्यभराची ओळख असते. ते ठेवताना काय विचार असतो ठेवणार्‍यांचा ? अनेक जण असेही असतात ज्यांना आपले नाव आवडत नाही.

धमाल ऍनिमेशनपट : पुस इन द बुट्स

लेखक सोत्रि यांनी शनिवार, 17/12/2011 23:51 या दिवशी प्रकाशित केले.
आज मुलांबरोबर एक ऍनिमेशनपट बघितला, पुस इन द बुट्स. हा जेव्हा येणार अशा जाहिराती चालू झाल्या तेव्हा मला काही खास आकर्षक वाटत नव्हता हा. श्रेक चित्रपटातून लोकप्रियता मिळालेले एक प्राणीचित्र. त्यावर काय चित्रपट काढणार असे वाटत होते. मुलांच्या आग्रहामुळे बळंच गेलो हा चित्रपट बघायला, तेही 3D मध्ये. मागचा 3D (रा-वन) अनुभव अतिशय भयानक होता. पण चित्रपटाला गेल्याचे सार्थक झाले.

नक्की कोणता मी प्राणी ...!

लेखक विदेश यांनी शनिवार, 17/12/2011 23:41 या दिवशी प्रकाशित केले.
मान हलवता सर मजला 'नंदीबैल' पहा म्हणती - हुषार नाही म्हणून मजला मित्र किती 'गाढव' म्हणती ! डबे शोधतो हळू नेहमी 'बोका' म्हणते आई मला , नुसता चरतो इकडे तिकडे 'घोडा' म्हणती वडील मला ! दादा म्हणतो 'लबाड कोल्हा' पुढेपुढे मी करताना - 'माकड' समजे ताई मला गडबड माझी बघताना ! 'गरीब गाय' म्हणते मला आजी माझी आवडती , जवळ घेउन आजोबा तर माझा 'वाघोबा' म्हणती !

सचिनचा मार्ग 'मोकळा'

लेखक आशु जोग यांनी शनिवार, 17/12/2011 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
आता खेळाडूंनाही मिळणार 'भारतरत्न पुरस्कार' 'सचिनचा भारतरत्नचा मार्ग मोकळा' वाचून कुणालाही आनंद होइल अशी बातमी आहे. नीट विचार केला पाहिजे. एका सचिनसाठी ही नियमांची मोडतोड आहे का ! सध्या सरकार कठीण परिस्थितीतून जाते आहे.

कोंबडी घालणार धुमाकुळ हिंदीत

लेखक चिंतामणी यांनी शनिवार, 17/12/2011 19:39 या दिवशी प्रकाशित केले.
मराठीत गेली काहीवर्षे धुमाकुळ घालणा-या "कोंबडी पळाली" या गाण्याची भुरळ हिंदी चित्रपटसृष्टीलासुद्धा पडली आहे. मुन्नी बदनाम झाली,

सख्या मला सवे तुझ्या

लेखक मकरन्दबेहेरे यांनी शनिवार, 17/12/2011 18:37 या दिवशी प्रकाशित केले.
सख्या मला सवे तुझ्या कवेत रे फिरायचे नभात शुक्रचांदणे अजून ही दिसायचे कशास लाज लाजसी घडी घडीस साजणा मनात काय माझिया, कळेल का प्रिया तुला मिठीतले शहार हे धुक्यात रे जपायचे अजून "श्यामसावळ्या" कुशीत गुंतलास ना बटेत सोनकेवडा अजून माळलास ना नको व्रुथा करु उशीर मावळेल चांद रे तुझ्याच आज अंगणी हरीप्रिया खुणावते भरून टाक भांग ही हळूच कुंकवात रे उठेल आसमंत हा जपून कोर श्वास रे बेहेरे मकरंद ०१२०२१२०
काव्यरस