Skip to main content

मागे वळून पाहताना

लेखक navinavakhi यांनी बुधवार, 21/12/2011 15:44 या दिवशी प्रकाशित केले.
आज पुन्हा क्षणभर, मी थबकले याच ठिकाणी पूर्वी, मी तुला भेटलेले हलकेच झाली पानांची सळसळ हृदयात माझ्या पुन्हा ती खळबळ इतक्या दिसांनी मी परत जुनेच हसले हरवलेले ते प्रेम, कधीच नव्हते मिळाले तू नि मी, इथूनच, येण्यासाठी निघालो वचने देऊनही, पुन्हा कधीच नाही भेटलो वाट तुझी पाहून मी होते थकले ना कळे तू प्रेम आपले, कुठे हरवले ? किती दिवस न रात्री, मी एकटीनेच पाहिल्या तुझ्याविनाच सर्व आठवणी पुनःपुन्हा आठवल्या दूरवर कुठेच तुझी चाहूल नव्हती सगळे आप्तेष्ट मात्र मला सतावत होती काय त्यांना सांगावे कळेना कुठे तुला शोधावे, उमजेना मी पण मग माझ्यावर चिडले पुन्हा एकदा मनाविरुद्ध लढले जुन्या आठवणींना कोंडून
काव्यरस

"इजय असो"

लेखक विसुनाना यांनी बुधवार, 21/12/2011 14:14 या दिवशी प्रकाशित केले.
रामराम लेको, (म्हंजे शेरी लोकं म्हंत्यात तसं 'नमस्कार मंडळी' असं म्हनायचं असतया न्हवं?) गेला म्हैनाभर आपल्याला काय बोलायला टाईम गावला न्हाय. कसा गावंल? दिवाळी चाल्ली होती ना आमची. काय म्हनला? दिवाळी झाल्याला लै दिसं झाली? नाय वो, आमची दिवाळी तर परवाच्याला सपली. कसं काय सांगा बगू? जाऊंदे. तुमाला नाय समजायचं. अवो, गेला म्हैनाभर आमी म्हंजी आमच्या घरातल्या समद्यांनी लै ऐश केली. म्यातर दर्रोज रातीला मटान आनि कॉट्टर हानत होतो. त्येबी रोच्च्याला दोनशे रुपय घिऊन. वरनं बायकुलापन दर्रोज दोनशे रुपये आनि जेवान गावत होतं. घरातली चूल आनि बाहेरची धुनीभांडी सम्दं बंदच केल्तं तिनं.

बबडू ची कविता !!

लेखक फिझा यांनी बुधवार, 21/12/2011 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या ट्विन्स वर केलेली कविता !!

झोपला का ग?

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी बुधवार, 21/12/2011 12:52 या दिवशी प्रकाशित केले.
झोपला का ग? तेंव्हा आमच घर लहान होत. वन बेडरुम, किचन.. बेडरुम मधे बेड भिंतिला लागुन होता मी त्यावेळी २-३ रीत असेल बाबा भिंतिच्या बाजुला, मी मधे,आई कडेला ,अस झोपायचो. झोपल्यावर आई कडेला ठेवायची मला.. मी रात्री जाम झोपायचो नाहि.. ति मांडिवर घेउन दामटुन झोपवायची.. सारखे दोघेपण झोप झोप करायचे... उद्या सकाळी शाळा आहे अस म्हणायची मधुनच बाबा झोपला का ग? म्हणायचे.. झोपतोय.. आई म्हणायची,"लहान आहे ना, दमतो" मी मानांत हसायचो.... मला माहित होत ते मला सारख झोप झोप का करतात ते..... [कल्पना स्त्रोत.प्रतिसाद.. मित्रवर्य ली] अविनाश....

मदत हवी आहे

लेखक वाटी यांनी बुधवार, 21/12/2011 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
मदत हवी आहे मला येथे माझ्याकडे असलेले महाराष्ट्रातील गड कील्यांचे फोटो कलादालन या विभागात डकवायचे आहेत.

भविष्यात आपली गरज आहे का?

लेखक नगरीनिरंजन यांनी बुधवार, 21/12/2011 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
'पृथ्वी वाचवा' ही घोषणा बर्‍याच लोकांना विनोदी वाटते. मलाही वाटते. शिवाय 'पृथ्वी' वाचवण्यासाठी लोकांना सुचवले जाणारे उपायही बरेच गमतीदार आहेत. उदाहरणार्थ, प्लॅस्टिकच्या पिशव्या न वापरणे, घरातले दिवे विनाकारण लावून न ठेवणे किंवा घरात पाणी जपून वापरणे वगैरे. काहीतरी बिघडलंय आणि हे असे उपाय केल्याने बराच फरक पडेल अशी समजूत असलेले भाबडे लोक ते उपाय प्रामाणिकपणे करतही असतील.

जीवन रत्नाचे!!

लेखक फिझा यांनी बुधवार, 21/12/2011 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
शून्यात सामावलेला समुद्र त्याची एक आठवण ..एक मोती हवेहवेसे वाटणारे ते रत्न पण नकोशा वाटणाऱ्या लाटा वाहून नेणाऱ्या रत्नांचे मोल किनाऱ्याला कधीच नसते वाहून आणलेले ते ओझे असते कुणाच्या आठवणी बनून राहतात ते कुणी व्यवहार करतात त्याचे रेतीवरचे नाव वाहून जाते पाण्यासवे दगड काही शिल्लक राहतात उन्हासवे रत्न पुसत राहते कथा त्याच्या वैभवाची चांदण्यानाही हेवा वाटे त्या स्फटिकाची नसणे असूनही आणि असणे नसूनही लाटांबरोबर वाहत जाणे रत्न बनूनही वेचणा-याच्या प्राक्तनाची लाचारी आणि खेचणा-याच्या नशिबाची जुगारी संपत नाही कधीच त्यांच्या जीवनाची उधारी नवीन किनाऱ्यावर नव्या लाटांना सलाम
काव्यरस

टिचकीत अभिजात इंग्रजी साहित्य - पुस्तक रुपात

लेखक यकु यांनी मंगळवार, 20/12/2011 22:10 या दिवशी प्रकाशित केले.
पुस्तकवेड्‍यांसाठी खुशखबर! इंग्रजीतील पुस्तकांसाठी अंतर्जालावर गुटेनबर्गसारखी अनेक ग्रंथालये आहेत. तसेच, पण इंग्रजीतील मूळ पुस्तके जशीच्या तशी (आणि फुकट, हे महत्त्वाचं ;-) ) ब्राऊझरमध्‍ये वाचण्‍यासाठी उपलब्ध असणारे ऑनलाईन ग्रंथालय सहज दिसले. हा त्याचा दुवा: http://openlibrary.org पुस्तके बर्‍याच ठिकाणी उपलब्ध असतात, पण ती पुस्तकांसारखी पुस्तके नसून नुसती अक्षरांची खिचडी असल्याने वाचायला मजा येत नाही. या संकेतस्‍थळावर मूळ पुस्तकेच स्कॅन करुन अपलोड केलेली आहेत. कोणती कोणती पुस्तके आहेत हे सांगणे अवघड आहे, कारण इ.स.

प्रिय मित्रा

लेखक शरद यांनी मंगळवार, 20/12/2011 19:45 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मित्रा, आज बरेच दिवसांनी "सुहृदगाथा" बाहेर काढले. बराच वेळ मुखपृष्टावरील अवचटांचे अजिंठाचे रेखाटन पहात बसलो. आतल्या कवितांना साजेसे गूढ. रंग सुद्धा आतील कवीतांसारखेच. पुस्तक उघडून पहिले पान पाहिले आणि एक मोठा धक्का बसला. त्यावर तू लिहले आहेस शब्द संपतात तिथून सुरू होणार्‍या दोस्तीला मला एवढेच कळवायच संध्याकाळची प्रत्येक कविता मी बकुळफुलात जपून ठेवलीय २६-१-१९७९ बस. एवढेच. सहीसुद्धा नाही. तुला त्याची गरज वाटली नाही. व त्यावेळी मलाही. पु.शि. रेग्यांचा कविता संग्रह व ग्रेसची आठवण करून देणारा, दोस्तीला बकुळफुलांचा सुगंध देणारा ...

लोकपाल आणि भ्रष्टाचार...

लेखक चिगो यांनी मंगळवार, 20/12/2011 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
ढिसक्लेमर : सगळ्यात पहीलं म्हणजे "चावून चोथा" अश्या विषयावर लिहून मिपाची जागा खातोय, ह्यासाठी "सॉरी शक्तिमान !".. लेखाचा उद्देश्य फक्त लोकपालबद्दल चर्चा करण्याचा आहे. ************************************************************** हां, तर आजकाल लोकपाल वर बरीच चर्चा सुरु आहे. टिव्ही, सरकार, माध्यमं सगळीकडे हेच.. "लोकपाल आणि लोकायुक्त" ह्यांची निर्मिती करण्याचा प्रस्ताव सगळ्यात आधी १९६८ मध्ये देण्यात आला. १९६९ मध्ये इंदिरा सरकारने संसदेत पहिल्यांदा हे बिल मांडले, पण पारीत झाले नाही. त्यानंतर आतापर्यंत जवळपास आठ-दहा वेळा हे बिल संसदेत आले, पण त्याचा कायदा झालेला नाही..