सिल्क
तशी त्यांची कॉलेज पासूनची ओळख. पण खऱ्या अर्थाने मैत्री आणि भेटीगाठी गेल्या ५-६ महिन्यांपासून चालू होत्या. भेटणं, बोलणं, फिरायला जाणं हे सर्व २६-२७ वर्षांची मध्यमवर्गीय घरातील मुलं-मुली ज्या भविष्यकालीन हेतूने करतात तसंच चाललेलं होतं.
तिला आता लग्नाची घाई झाली होती. त्याला भेटत असतानाच घरच्यांच्या आग्रहाने ती इतरही मुलांना ऑनलाईन भेटत होती. ते दोघे भेटल्यावर ती त्याला नेहमी विचारायची, आता पुढे काय? अजून किती वेळ घेणारेस तू? खरंतर त्यालाही ती आवडत होती. पण तो उगाच वेळ घेत होता.
‘पंजाब मेल’
मुंबईतील ‘छत्रपती शिवाजी महाराज (ट)’ आणि पंजाबमधील फिरोजपूर कँट यादरम्यान धावणारी ‘पंजाब मेल’ गेल्या 1 जूनला 110 वर्षांची झाली आहे. मुंबईहून ‘पंजाब मेल’ सुरू झाली त्या दिवसाची नक्की तारीख माहीत नाही. पण रेल्वेने ती तारीख 1 जून 1912 असेल असे गृहीत धरले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटनमधून भारतात आलेले अधिकारी आणि अन्य युरोपियन प्रवाशांसाठी ही रेल्वेगाडी सुरू करण्यात आली होती. त्यावेळी ती गाडी तत्कालीन ‘व्हिक्टोरिया टर्मिनस’ (सध्याचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) ते अखंड भारताच्या वायव्य सीमांत प्रांताची राजधानी असलेल्या पेशावरपर्यंत धावत होती.
आम्ही स्टँडच्या पोरी
पाच सहा वर्षे झाली असतील. सातार्याहून मुंबै ला यायचे होते.
सातारा मुंबई थेट बस होती . रात्री साडे दहा ची वेळ असेल.
दहा वाजताच बसस्टँडवर जाऊन पोहोचलो. बसच्या स्टँडच्या शेडमधे तुरळकच उतारू होते.
अचानक तेथे एक बाई आली. वय वर्षे तीशीच्या आतच असेल.केस विस्कटलेले ,साडी अंगावर कोट. थंडी फारशी नव्हती तरीही तीने अंगावर ब्लेझर कोट घातला होता
तीच्या कडे काही सामानही दिसत नव्हते.
तीच्याकडे कोणाचे लक्ष्यही नव्हते.
अचानक काहितरी गलबला ऐकू आला म्हणून चमकून पाहिले. तर ती बाइ मोठमोठ्याने कोणावर तरी भांडत ओरडत होती.
काय समजलास काय रे स्वतःला. ह्या इथे दादागिरी नाय खपवून घेणार. मोठा असशील तर घरी.
एक किस्सा
नमस्कार. मिपावर लिखाणाचा पहिलाच प्रयत्न आहे. चूकभूल सांभाळून घ्या :)
२०१० सालची गोष्ट आहे. मी जपान सरकारतर्फे शिष्यवृत्ती मिळून शिकायला आलो होतो. परदेशी विद्यार्थ्यांसाठी वेगळे वर्ग असायचे. त्या वर्गांमध्ये, परदेशीच पण जे पूर्णवेळ शिकत असतील(डिग्री प्रोग्रॅम) अशा विद्यार्थ्यांना पण परवानगी असायची. तेव्हा एका वर्गामध्ये माझ्याबरोबर एक चिनी विद्यार्थी होता, जो
पूर्णवेळ शिकत होता. वर्गात जनरल हाय हॅलो व्हायचं पण मैत्री अशी नव्हती. त्याचं शिक्षण मार्चमध्ये संपलं होतं आणि त्याला दक्षिण जपानमध्ये नोकरी पण मिळाली होती असं सांगत होता.
शशक का चषक
तो एक बिचारा.......
"तुम्ही मुलखाचे वेंधळेआहात,
काहीच कसं जमत नाही हो तुम्हाला",
इत्यादी विशेषणे त्याच्या पाचवीला पुजलेली. अर्थात हे त्याच्या पत्नीचे मत.
हे काही नवीन नव्हते.लहानपणा पासूनच याची सवय होती त्याला.
आई वडिलांच्या लेखी तो एक सामान्य मुलगा.
शिक्षक सुद्धा, "तु राहू दे ,तुला जमणार नाही", एखाद्या हुशार विद्यार्थ्यांचे उदाहरण देत "काहीतरी शिका",आसा टोमणा मारायचे.
पुढे कशीबशी एक नोकरी मीळाली. कार्यालयात काहीच वेगळे घडले नाही.नोकरी म्हणून छोकरी.
आयुष्यात तो एकच दिवस ,ज्या दिवशी लोकांच्या मते "सर्व अवगुणसंपन्न", असा तो "सर्व गुणसपंन्न" म्हणून ओळखला गेला.
व्यक्ति, प्रकृती आणि प्रवृत्ती – २
व्यक्ति, प्रकृती आणि प्रवृत्ती – २
डिपार्टमेंट मध्ये भेटलेल्या विलक्षण व्यक्तींच्या यादी मध्ये जनमित्र ( मराठीत, ‘वायरमन’ ) जाधव मामांचे नाव वगळणे शक्यच नाही !
माझी त्यांच्याशी काही वर्षे आधी गाठ पडली असती तर खात्यातले माझे करियर नक्कीच आणखी ब्राइट झाले असते. पण जेव्हा मी त्यांची वरिष्ठ अधिकारी म्हणून आले तेव्हा त्यांची रिटायरमेंट साठी दोनच वर्षे राहिली होती. त्यातही दीड वर्षे मला त्यांच्या कडून (वरिष्ठ असूनही) खूप काही शिकायला मिळाले. आपल्या कामात तर जाधवमामा अचूक होतेच, शिवाय मनुष्य स्वभाव आणि व्यवहार ज्ञान यात ते अतिशय पारंगत होते.
श्रीदासबोध : दुश्चितपणा आणि राजाची सुरक्षा.
समर्थांनी छत्रपति संभाजीराजेंना उद्देश्यून एक पत्र लिहले होते त्या पत्राची सुरवात "अखंड सावधान राहावे, दुश्चित कदापि नसावे" या ओळीने केली होती. इथे दुश्चितपणाचा एक अर्थ असावधान, बेफिकीर असा होतो. राजा सुरक्षित असेल तर राज्य सुरक्षित राहते. एका सुरक्षित राज्यातच प्रजा संपन्न आणि सुखी राहू शकते. प्रजेच्या हितासाठी राजाची सुरक्षाही सर्वोपरी असते. राजाच्या सुरक्षेची जवाबदारी राजाचे सुरक्षा सल्लागार, सचिव आणि अंगरक्षक यांच्यावर असते. त्यांना नेहमीच अखंड सावधान राहण्याची गरज असते.
परिक्रमा
नर्मदा परिक्रमेचा आजचा अकरावा दिवस, चालून चालून पाय भेंडाळून गेलेत.. सुरुवातीला एकत्र असलेले आपापल्या सोयीनुसार , वेगानुसार पांगले आहेत.. दोन दिवस निबीड जंगलातला रस्ता आहे . अवचित एखादा वाटसरू दिसला की रस्ता चुकला नाही याचे समाधान मिळते...
संध्याकाळी दगडावर बसून नर्मदामैय्याचे विलोभनीय रूप बघत होतो तेव्हा डूबत्या सूर्यामागून एक उंच आकृती झपझप चालतं डोहाकडे आली ..धोतर , अंगरखा आणि डोईला मारवाड मुंडासे ! वाटसरू तहानलेला असावा.. येऊन गटागटा पाणी पिले , आमच्याकडे लक्ष नसावे बहुधा .. वाटसरू वस्त्रे काढून डोहात शिरला , मुंडासे काढले , केसांच्या दीर्घ जटा अस्ताव्यस्त पसरल्या..
मिसळपाव