Skip to main content

भेट

लेखक santosh waghmare यांनी सोमवार, 26/12/2011 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
ती तरुणी चालली कुणिकड, डोक्यावर घेउनी घागर, पडता कानी बासरीचे ते स्वर, धुंद होऊनी ती चालली बेफिकीर. तहान आणि भुकेचा आता पडला विसर, नाजूक पायी तिच्या ना ठेचाचा असर, त्या स्वरातील हाक आहे ती जाणून, मग बेभान होऊनी ती चालली बेफिकीर. खरच त्या स्वरात आहे खूप माधुर्य, पण तिला तर सख्याची ओढ, ते तर आहे तिच्यासाठी भेटीच माध्यम, मग सख्याच्या ओढीन ती चालली बेफिकीर. आता ना कसल्या थकव्याची जाणीव, नाजूक पद तिचे पडती भर भर, आता त्याच्या भेटीशिवाय तिच्या मनास कसले चैन, मग बैचैन होऊनी ती चालली बेफिकीर. पाण्याच्या बहाण्याने ती सख्यास भेटत, त्रासली ती डोक्यावर घेउनी घागर, पण भेतीसमोर हा त्रास तिला वाटे नगण्य,

तोल हा मनाचा तू जरा सावर रे.

लेखक santosh waghmare यांनी सोमवार, 26/12/2011 21:27 या दिवशी प्रकाशित केले.
तोल हा मनाचा तू जरा सावर रे. दिशाहीन वाहणाऱ्या वाऱ्याला तू जरा आवर रे, तोल हा मनाचा तू जरा सावर रे. झालेल्या व्यथा ते उगाचच आठवत, गतकालातून दुख जणू ते पोखरून काढत, सुखलेल्या जाख्मानाही मग फुटे वेदनेच पाझर रे , तोल हा मनाचा तू जरा सावर रे. बाह्य आकर्षणाला ते सतत भुलत, शोभेच्या फुलालाही नाकाशी धरू लागत, पण मृगजळात तहान नाही भागत रे, तोल हा मनाचा तू जरा सावर रे. प्रेत्येक कर्माच फळ त्याला पटकन हव असत, पिउनी हळद त्याला लगेच गोर व्हायचं असत, पण पिकण्या अगोदर आंबा कसा लागणार गोड रे, तोल हा मनाचा तू जरा सावर रे. समोरच्याकडून ते अधिक अपेक्षा करत, जणू लहानश्या झोळीत ते गावभर बाजार भारत, मग छिद्र पड

ती पण माझ्यावर प्रेम करेल का...?

लेखक अन्नू यांनी सोमवार, 26/12/2011 20:44 या दिवशी प्रकाशित केले.
तिच्या वेड्या हृदयाला, माझे प्रेम कळेल का? मित्रांनो, तुम्हीच सांगा, ती माझ्यावर प्रेम करेल का? पावसाळ्याच्या त्या रात्रीत, ती चिंSS ब भिजली होती; मला आठवते आमची, पहिली भेट तीच होती..! झाडाखाली ऊभी राहून ती, रिक्शाची वाट पाहत होती; अन् माझी वेडी नजर मात्र, तिच्यावरून हटत नव्हती. मनात फक्त एकच विचार..
काव्यरस

बटाटावडा

लेखक स्वाती दिनेश यांनी सोमवार, 26/12/2011 19:11 या दिवशी प्रकाशित केले.
बटाटे वडे आपण सगळेच जण घरीदारी खात आणि करत असतोच, त्यात नवीन असे काहीच नाही. तरीही प्रत्येक ठिकाणची खास चव जिभेवर असतेच, विशेषतः गाडीवरच्या वड्याची.. आणि घरी तस्सा वडा होत नाही असे सगळेच हळहळतात आणि पावलं परत एकदा नाक्यावरच्या गाडीवर नाहीतर टपरीवर वळतात. पण काही वेळा आणि ठिकाणे अशी असतात की तेथे अशा वडापावच्या गाड्या,टपर्‍या नसतात, :( मग वड्याची तल्लफ भागवायला बटाटे उकडत ठेवावे लागतात आणि खाताना परत तेच..

ऐका हो ऐका - 'टीम अण्णांच्या उपोषणाचा इव्हेन्ट उद्यापासून..!

लेखक कॉमन मॅन यांनी सोमवार, 26/12/2011 17:11 या दिवशी प्रकाशित केले.
ऐका हो ऐका... "उद्या मंगळवार दि २७ डिसेंबर पासून मुंबईतल्या एमएमआरडीए मैदानावर टीम अण्णा कंपनीच्या उपोषणाचा इव्हेन्ट साजरा केला जाणार आहे. तरी आपण सर्वांनी आपापले कामधंदे सोडून तिथे जमायचं आहे, 'लोकपाल लोकपाल जनलोकपाल..' इत्यादी देशभक्तिपर गीतं गायची आहेत, 'मी म्हणेन तीच पूर्व-आम्ही संसद मानत नाही' आदी मुक्ताफळे उधळणारे देशातील एकमेव हुशार-कायदेपटू-तज्ञ वगैरे वगैरे असलेल्या रा. रा. अरविंद केजरीवाल, किरण बेदी यांची भाषणं ऐकायची आहेत..! आमचं मत मात्र केजरीवालांपेक्षा अंमळ वेगळं आहे. आम्हाला आमच्या भारतीय राज्यघटनेचा आत्यंतिक आदर आहे.

एका लग्नाची............ (१)

लेखक सुहास.. यांनी सोमवार, 26/12/2011 15:56 या दिवशी प्रकाशित केले.
सत्यकथेवर आधारित, काही पात्रांची नावे बदलली आहेत (अर्थात काही चाणाक्ष मिपाकर ओळखतीलच ;) ) , भाषा संयत करण्याचा प्रयत्न केला आहे, पण आक्षेपार्ह आढळल्यास क्षमस्व ! कोणे एके काळी, जेव्हा लग्न - संस्थेला ' लव्ह मॅरेज' मान्य नव्हते .... " राक्याSSS, ती जेलरची पोरगी आहे " " मुख्य तरुंगाधिकारी !! " " हा येडा झालाय ! " " चढलीय भें** ला ! " " माझी तर उतरलीच, अजुन क्वार्टर मागव ! " पार्टी ऐन रंगात आली होती, आणी राक्या ने प्रस्ताव टाकला की सुमति ला पळवायची !! सुमति !! साक्षात सुमति !!

हरीनाम सप्ताह (स्थळ नागाव अलिबाग) मध्ये मी काढलेल्या रांगोळ्या

लेखक कान्होबा यांनी सोमवार, 26/12/2011 15:30 या दिवशी प्रकाशित केले.
बेळगाव निवासी परमपूज्‍य आई श्री कलावती देवी यांच्‍या कृपाशिर्वादाने पांढरा मारूती मंदीर, हटाळे येथे हरिनाम सप्‍ताह सोमवार दिनांक 12 डिसेंबर 2011 ते रविवार दिनांक 18 डिसेंबर 2011 असा पार पड्ला या सात दिवसात मी काढलेल्या रांगोळ्या दिनांक ११ डिसेंबर काढ्ण्याची वेळ रात्री १० ते २ आदिनारायण परमेस्वर मानवरुपे प्रुथ्वी वर झाला वसुदेव देवकी कुमर भगवान विष्नू दिनांक १

मनातलं जनांत

लेखक गणपा यांनी सोमवार, 26/12/2011 13:20 या दिवशी प्रकाशित केले.
गेले काही वर्षे मी ब्लॉगबद्दल बरचं ऐकुन होतो. मध्यंतरी दोन एक वर्षांपुर्वी 'स्टार-माझा'ने ब्लॉगर्सची स्पर्धा ही भरवली होती आणि आपल्या मित्रांनी त्यात बक्षिसही पटकावली होती. ते सगळ पाहुन फार कौतुक वाटलं सगळ्यांच. आपलाही एखादा ब्लॉग असता तर असा विचार क्षणभर मनात डोकावून गेला. पण ज्याला चार ओळी धड टंकता येत नाहीत त्याचा ब्लॉग? आणि समजा जरी काढला (त्याला पैशे थोडीच लागतात ;) ) तरी त्यात लिहायचं काय? शाळेत सुद्धा ५-१० मार्कांचं पत्रलेखन आणि निबंध ऑप्शनला टाकणारे आम्ही.