Skip to main content

पहेले 'मार' का पहेला गम!

लेखक मराठे यांनी रविवार, 29/01/2012 07:51 या दिवशी प्रकाशित केले.
'शाळा' नुकतंच वाचून संपवलं. तसंच त्यावरचा चित्रपटही नुकताच प्रदर्शीत झालाय. सगळीकडे चित्रपटाची आणि पुस्तकाची चर्चा चालू आहे. पेपरांमधे आणि आंजावर रिव्यू येत आहेत. एकूण सगळं वातावरण शाळामय झालंय. अशात कित्येकांना आपल्या शाळेची, शिक्षकांची, शाळेतल्या मित्रांची (काही भाग्यवंतांना मैत्रीणींची), खोड्यांची आणि विशेषतः शाळेत खाल्लेल्या माराची आठवण झाली नाही तरच नवल. तर या वाहत्या गंगेत हात धूउन घ्यावेत ह्याच एकमेव हेतुने हा धागा काढतोय. जे सत्तर ऐंशीच्या दशकात शाळेत होते त्यांच्यासाठी शाळेत मार खाणं (शिक्षकांकडून.. इतर पोरांकडून नव्हे) हा अगदी सर्वसाधारण मामला होता. (नंतरचं मला माहित नाही.

शेलू !!

लेखक शरभ यांनी रविवार, 29/01/2012 03:07 या दिवशी प्रकाशित केले.
कॉलेजचे दिवस होते. घरी चाललो होतो. नेहेमीप्रमाणे थाण्यावरुन कर्जत पकडली, २:२८ ची. ही डबल फास्ट लोकल डोंबिवली, कल्याण करत, कल्याणनंतर सर्व स्टेशनवर थांबते. बरोबर मित्रदेखील होता. तो डोंबिवलीचा होता. अशाच गप्पा मारता मारता मित्र म्हणाला- काय रे, हे शेलू कुठे आहे ? मी म्हणालो - तुला बदलापूर माहिती आहे. त्यापुढे वांगणी आणि मग शेलू. आणि मग नेरळ... जिथून माथेरानला जाता येतं...का रे ? तो म्हणाला - अरे सहजचं. आणि डोंबिवली आल्यावर तो उतरून गेला. मी विचार केला- थोडा वेळ आहे तर एक छोटी नॅप मारुन घेऊ. तशी असली नॅप म्हणजे नेहेमीचीच असायची. थोड्यावेळाने डोळे उघडले आणि हात ताणून आळस दिला.

बालूशाही

लेखक सूड यांनी रविवार, 29/01/2012 01:01 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवस काही लिहीलं नाही, म्हणलं चला एखादी पाकृ टाकूया. भले मग कोणी झैरातीचा धागा का म्हणेना !! भारतीय संविधानातला अभिव्यक्तिस्वातंत्र्य वैगरे कसलासा अधिकार घेऊन म्हटलं लिहायला काही हरकत नाही. ;) तर काय म्हणत होतो...हां, पाकृ आहे बालूशाहीची. गोष्टी आयत्या खाण्यापेक्षा त्या करुन पाहायची खुमखुमी भारी. त्यामुळे या पाकृच्या दोन तीन रेशिप्या डोळ्याखालून घालून झाल्या. त्यातल्या सगळ्यातलं मनाला जे पटलं ते उचलून ही पाकृ केलेली आहे, कारण काही रेशिप्यांमध्ये मैद्याच्या निम्मं तूप घालायला सांगितलं होतं. तसा प्रकार केला असता तर बालूशाही नक्की कढईत विरघळली असती.

मी गीता व्हावे......

लेखक मकरन्दबेहेरे यांनी शनिवार, 28/01/2012 22:16 या दिवशी प्रकाशित केले.
तन मन वाणी अंजन डोळे काया व्हावे जीथे तीथे तू जाशी तेव्हा छाया व्हावे गात्रे गात्रे शामल शामल तुंदिल तुंदिल येशोदेने केलेली ती माया व्हावे जन्मोजन्मी ओठावरची सटवी व्हावे काळ्या काळ्या श्रीकृष्णाची राधा व्हावे कौरव पांडव लढण्या जमले कुरुक्षेत्री त्या पार्थाच्या मी नाशामधली बाधा व्हावे जेव्हा जेव्हा भारत "भू"ला येई ग्लानी तेव्हा तेव्हा रायाची मी गीता व्हावे मकरंद २१०२१०९१

माझ्या मना

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 28/01/2012 19:47 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या मना माझ्या मना तू माझ्या मना मला तू तरी समजून घे ना उगा नको तू प्रश्न विचारू उत्तर मला माहीत नसेल ना न ऐकले तुझे अन भेटलो तिला का भेटलो तेव्हा ते मला कळेना दुर ती गेली निघूनी सोडून मला आठवण तिची कधी काढू नको ना होती का काही तिची मजबूरी? ती तरी का सांगेल कोणा? असेल का रे स्थिती तिची अशीच माहीती का तुला? तू मला सांग ना! - पाषाणभेद

लिअँडर पेसचं हार्दिक अभिनंदन!

लेखक बहुगुणी यांनी शनिवार, 28/01/2012 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
ज्येष्ठ भारतीय टेनिस पटू लिअँडर पेस याने पुरूष दुहेरीतील ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा झेकोस्लोव्हाकियाच्या रॅडेक स्टेपॅनेक च्या जोडीने जिंकून अकरावं ग्रॅंड स्लॅम विजेतेपद मिळवलं आहे. ३८ वर्षांचा पेस आणि ३३ वर्षांचा स्टेपॅनेक यांनी अमेरिकेच्या बॉब आणि माईक ब्रायन या जुळ्या भावांचा ७-६ (७/१), ६-२ असा पराभव केला.

ब्लोगबद्दल थोडस ...

लेखक शेफ चेतन यांनी शनिवार, 28/01/2012 18:53 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मिपावरच माझ हे पहिले लेखन.चू.भू.द्या.घ्या. नुकताच मी माझा ब्लोग तयार केला.मी पाहिलेले इंटरनेटवर आणि मिपाकरांचे ब्लोग ह्यांमध्ये अनेक गोष्टी अशा होत्या ज्या मला माझ्या ब्लोगवर ताकाव्याशा वाटल्या.ब्लोग तयार करताना ज्या अडचणी मला आल्या आणि येत आहेत त्यांचे समाधान मिपाकर निश्चित करतील अशी अशा आहे.अडचण्नींची यादी खाली देत आहे. १. मी जी लेबल्स तयार केली आहेत त्या लेबलमध्येहि मला सबलेबल हवी आहेत.ती कशी घ्यायची? २.काहींच्या ब्लोगवर गोल फिरणारी पृथ्वी होती ती कशी घ्यायची. ३.templet नुसार गजेट बदलतात का? ४.मला ब्लोग मधले लेखन आधी टाकलेले प्रथम असे हवे आहे तसे करण्यासाठी काय करावे. ५.

Pollo Alla Cacciatora (ईटॅलियन हंटर चिकन)

लेखक सानिकास्वप्निल यांनी शनिवार, 28/01/2012 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः ५०० ग्राम चिकन तुकडे करुन घेणे (हाडांसकट तुकडे घेतले तरी चालेल ) २ कांदे बारीक चिरून ४-५ टोमॅटो बारीक चिरून ३-४ लसुण पाकळ्या २ वाट्या रंगीत भोपळी मिरच्या बारीक चिरुन (भोपळी मिरच्यांऐवजी मश्रुम, सेलेरी वापरली तरी चालेल ) ७-८ पाने बेसीलची १ टेस्पून रोझमेरी हर्ब बारीक चिरून २-३ टीस्पून काळीमिरीपूड १/२ टीस्पून ड्राईड हर्ब्स मीठ चवीनुसार ३-४ टेस्पून मैदा १/२ -३/४ कप वाईन (तुम्ही कोणतीही वाईन वापरु शकता रेड किंवा व्हाईट) ऑलिव्ह ऑईल

जोडींया स्वर्गमें ...

लेखक सुहास.. यांनी शनिवार, 28/01/2012 15:24 या दिवशी प्रकाशित केले.
हेतु : सहज टीपी नेनेंबाईंनी मध्यंतरी झुल्यावर बसुन एक कमेंट केली होती, कल्पना करतो आहे की त्यावर मान्यवरांच्या कश्या प्रतिक्रिया आल्या असत्या !! ;) अर्थात आमच्या चेपुकर मित्रांनी यातल्या काही वाचल्या असतीलच माधुरी दिक्षीत : सारी जोडींया स्वर्ग मे बनती है. दादा कोंडके : हिच्यामायला !! म्हण्जी देवाला बी ' जोड्या जुळवा ' अस प्रश्न असतो म्हणा की ! बाकी येव्हढ्या जोड्या जुळवताना पार घोडा लागत असेल, म्हणजे हिकडन तिकड फिरायसाठी . ************************************************************************ माधुरी दिक्षीत : सारी जोडींया स्वर्ग मे बनती है. मक्या अनासपुरे : आस्स हाय कां ते !