मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बालूशाही

सूड · · पाककृती
बरेच दिवस काही लिहीलं नाही, म्हणलं चला एखादी पाकृ टाकूया. भले मग कोणी झैरातीचा धागा का म्हणेना !! भारतीय संविधानातला अभिव्यक्तिस्वातंत्र्य वैगरे कसलासा अधिकार घेऊन म्हटलं लिहायला काही हरकत नाही. ;) तर काय म्हणत होतो...हां, पाकृ आहे बालूशाहीची. गोष्टी आयत्या खाण्यापेक्षा त्या करुन पाहायची खुमखुमी भारी. त्यामुळे या पाकृच्या दोन तीन रेशिप्या डोळ्याखालून घालून झाल्या. त्यातल्या सगळ्यातलं मनाला जे पटलं ते उचलून ही पाकृ केलेली आहे, कारण काही रेशिप्यांमध्ये मैद्याच्या निम्मं तूप घालायला सांगितलं होतं. तसा प्रकार केला असता तर बालूशाही नक्की कढईत विरघळली असती. असो, तर साहित्य पुढीलप्रमाणे, मैदा २ वाट्या दही अर्धी वाटी तूप अर्धी वाटी बेकिंग पावडर पाव टीस्पून खाण्याचा सोडा चिमूटभर पाकासाठी एक वाटी साखर थोडं केशर Image removed. मैदा चाळून एका पातेल्यात घेऊन त्यात बेकिंग पावडर आणि खाण्याचा सोडा मिसळून घ्यायचा. नंतर तूप वितळेल इतपत गरम करायचं, फार गरम होता कामा नये मोहन घालायचं नाहीये. आता हे वितळलेलं तूप मैद्यात ओतून नीट मिसळून घ्यायचं. त्यानंतर त्यात दही घालायचं. दही घालून निव्वळ कालवल्यासारखं करायचं, मळायचं नाही. दही घातल्यानंतर हे असं दिसायला हवं. कोरडं वाटतंय म्हणून आणखी थोडं दही घालावं असा विचार पण करु नका. Image removed. आता अर्धा तास त्याच्याकडे ढुंकून बघायचं नाही. पाक करताना एक वाटी साखर बुडेल इतपत पाणी घेऊन एकतारी पाक करायचा. थोडं केशर घालायचं. आता पाऊण तासानंतर पीठाचे छोटे चपटे उंडे, पेढे काय म्हणाल ते करायचे आणि ते करताना तुम्हाला बालूशाहीचा जेवढा आकार अपेक्षित आहे त्याच्या निम्म्या आकाराचे करायचे. कारण बालूशाही तळल्यानंतर बर्‍यापैकी फुलते. त्या गोळ्याला अंगठ्याने मधोमध एक खळगा करायचा. मात्र आता गोळे करताना ते नीट मळून मगच आकार द्या, आता प्रश्न येतो आधी नाही मळलं आता का मळायचं ?? आधी मळून आता पुन्हा ते थोडंफार मळावंच लागणार होतं, मैद्याच्या गोष्टी खुसखुशीत व्हायच्या असतील तर फार मळू नये. ( अर्थात ही एका बालूशाहीच्याच व्हिडोत मिळालेली टीप आहे.) गोळे साधारण असे दिसतील. Image removed. आता कढईत मंद आचेवर तळून काढा. आच वाढवली तर वरवर रंग आला तरी आत कच्चंच राहील. खालच्या चित्रात वर जो एक तळलेला गोळा दिसतोय तो गोळे करताना पीठ वरचेवर मळून केलेला आहे आणि खाली जे दोन आहेत ते गोळे करण्याआधी पीठ नीट मळल्यानंतरचे आहेत. थोडक्यात वरचा बिनसलेला आहे. Image removed. आता ही तळलेली बालूशाही पाकात घालून १०-१५ मिनीटांनी बाहेर काढा. बालूशाही तयार आहे. Image removed. कोणाला याची आणखी चांगली पद्धत माहीत असल्यास जरूर सांगा.

वाचन 13618 प्रतिक्रिया 0