Skip to main content

मी ?? म्हातारा ???

लेखक गवि यांनी मंगळवार, 31/01/2012 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
ही पोस्ट आज लिहिलेली नाही.. पण तरी शेअर करावीशी वाटली. का? तर...मी आयुष्यात वट्टात पहिल्यांदा आंतरजालावर लिहायला लागलो तेव्हा माझ्या हातून घडलेलं पहिलं लिखाण.. बर्‍याचदा लिखाणाची सुरुवात नॉस्टाल्जियानेच होते.. तसंच हे.. "मी.. ?? म्हातारा ???" ते आज परत सर्वांसमोर ठेवतो आहे.. ........................ मी कधी कधी "धम्म धम्म" अशी जड पावलं वाजवत भूतकाळात शिरतो. मनाविरुद्ध.. जशी जशी आयुष्याची वर्षं जातात तसा तसा आठवणींचा ढीग जमा होत जातो.

ते दिवस सुंदर होते ...!!

लेखक प्रकाश१११ यांनी मंगळवार, 31/01/2012 15:05 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यात कधीतरी छान दिवस येतात . खूप मनासारख्या घटणा घडत राहतात. कुणाचेतरी आशीर्वाद आपल्यामागे असतात . आणि हे खूप खरे असते. मला अचानकपणे छान नोकरी मिळाली.मिळेल की नाही असे वाटत असताना मिळाली.कुणाचा वशिला नव्हता. डोक्यावर कुणाचा हात नव्हता. तशी ह्या महानगरात कुणाची तशी ओळख नव्हती.गावाच्या मुलाची जशी परिस्थिती तशी माझी होती पण वरच्याचा हात होता. त्याने बोट पकडले होते. आणि मी त्याच्या आधाराने वाट तुडवीत होतो. . मुंबईत छोटासां फ्ल्याट होता काकाचा. ते निवृत्त झाले होते.नि. जरा निवांत जगावे म्हणून ते गावी आले होते. निसर्गात ते मनापासून रमत होते.गावाकडची थंड हवा त्याना हवी होती.

जगात नक्की कोणत्या देशाचे चांगले चालले आहे?

लेखक पुण्याचे वटवाघूळ यांनी मंगळवार, 31/01/2012 13:21 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरांकडून मला सतावत असलेल्या एका प्रश्नाचे उत्तर मिळेल ही अपेक्षा आहे. जगात नक्की कोणत्या देशाचे चांगले चालू आहे आणि तो देश येत्या काही वर्षात वर्चस्व गाजवेल? अमेरिका गेली अनेक वर्षे वर्चस्व गाजवत होती पण २००७-०८ पासून तिथे आर्थिक संकट आले आणि त्यातून ते पुरते सावरलेले दिसत नाहीत. इराक आणि अफगाणिस्तानातील युध्दांमध्ये त्यांचा वारेमाप खर्च झाला आहे.मध्यंतरी त्यांचे क्रेडिट रेटिंगही कमी झाले असे वाचल्याचे आठवते. युरोपात तर प्रश्न मोठाच आहे.अनेक देशांच्या अर्थव्यवस्था मोडकळीस आल्या आहेत. बडा घर आणि पोकळ वासा अशी त्यांची अवस्था.

ब्रेड रोल (पाक कला स्पर्धा)

लेखक बज्जु यांनी मंगळवार, 31/01/2012 11:52 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या ठाण्यातील विष्णुनगर माघी गणेशोत्सव मंडळातर्फे या वर्षी पाककला स्पर्धेत ब्रेड रोल विषय ठेवला होता.

'मखमलाबाद'स्पेशल मिसळ

लेखक प्रास यांनी मंगळवार, 31/01/2012 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही ज्यांना आमचे आंतरजालिय मित्र मानतो, त्या श्रीमान् पाषाणभेद उर्फ दगडफोड्या यांनी मिसळपाववर कोणत्यातरी धाग्यात प्रतिसादादरम्यान मखमलाबादच्या स्वादिष्ट मिसळीचा उल्लेख केलेला होता, तो आमच्या जन्मजात खादाडी वृत्तीमुळे कुठेतरी डोक्यात फिट्ट झालेला. त्यामुळेच की काय, आत्ताच्या २६ जानेवारीला कामानिमित्त नाशिकच्या पेठ रस्त्यावरून जाताना मखमलाबाद फाटा आणि मखमलाबादची दिशादर्शक खूण दिसताच त्या मिसळीच्या उल्लेखाने उचल खाल्ली आणि नकळतच आम्ही त्या दिशेने वळलो.

सरळ रस्ता

लेखक मयुरपिंपळे यांनी सोमवार, 30/01/2012 21:22 या दिवशी प्रकाशित केले.
जीवन म्हणजे एक सरळ रस्ता किती तरी होतात मनाला खस्ता | आनंदाला हि नाही कुठं कट्टा दुःखांनी सुधा मांडला सर्वी कडे सट्टा | रात्र व दिवस ह्यांचा नुसता पोर खेळ ह्यामध्ये सावलीचा ही कुठं नाही बसत मेळ | नाला, नद्यांनी बदलला मार्ग पण रस्ता मात्र सरळ| -- मयुर (नवकवी)
काव्यरस

बनावट औषधांच्या सेवना मुळे पाकिस्तानात १०९ म्रुत्युमुखी.

लेखक तर्री यांनी सोमवार, 30/01/2012 18:17 या दिवशी प्रकाशित केले.
बनावट औषधांच्या सेवना मुळे पाकिस्तानात १०९ जणांना प्राण गमावावे लागले आहेत. बनावट औषधांचा हा महाराक्षस दिवसेंदिवस विक्राळ रूप धारण करणार असे दिसते आहे. आज ही घटना पाकिस्तान पुरती मर्यादित असली तरी , भारत ह्या प्रकारच्या > ह्या हून भयानक अपघाताच्या अगदी काठावर उभा आहे. भारतामध्ये बनावट औषधांची बाजारपेठ ५००० कोटी रुपपायांची आहे. गेल्या काही वर्षात ही बाजारपेठ झपाट्याने वाढते आहे. ह्या बनावट औषधांचे अनेक प्रकार आहेत. १ . कमी प्रमाणात औषध असणे ( मापात पाप ) ,२. अजिबात औषध नसणे ३. दिसायला मुळ ब्रान्ड सारखेच औषध बनवून फसवणूक करणे ४.