Skip to main content

कवितेचा कीड़ा

लेखक विवेकपटाईत यांनी गुरुवार, 16/02/2012 19:45 या दिवशी प्रकाशित केले.
कवितेचा कीड़ा जेंव्हा डोक्यात शिरतो करितो यमकांची जुळवा-जुळवी ताबा तोंडाचा घेतो फिरतो सैर-भैर तो. कानात बोळे घालूनी भयक्रांत बायको वावरते घरी. पोरे ही म्हणती पपा होतो अभ्यासाचा हर्जा. हातात चोपड़ी पाहुनी मित्रही पळती दूर किती पाहुण्याची लाट आटली निस्तब्ध शांती घरी पसरली. आता रात्रीच्या एकांती बैसुनी माझी मीच ऐकतो कविता. आप्त ही म्हणती 'वैनी' गेले हो पार कामातुनी आता. दाखवाहो 'ह्याना' एकदा नेवून वेड्यांच्या इस्पिताळी. वाया गेला एक 'माणूस' लागून कवितेच्या नादी.

करणी / भानामती खरे कि खोटे

लेखक विवेकखोत यांनी गुरुवार, 16/02/2012 16:18 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी मि. पा वर करणी भानामती हे खरे कि खोटे ह्या वर बराच गोंधळ उडाला होता, डोळ्यामध्ये खडे घालणारी मुलगी, आणि अंधश्रद्धा निर्मुलन वाले ह्याच्या मध्ये बरीच खडाजंगी चालु होती. ह्या सर्व प्रकारामध्ये मि माझा एक - दोन अनुभव ऐकवू इच्छितो. मी साधारणतः ५-६ मध्ये होतो. त्यावेळी मी माझ्या मावशी कडे शिकायला होतो. त्यावेळेस माझ्या मावशीचे मिस्टर अचानक आजारी पडले. हा हा म्हणता आजार बळावत गेला आणि पाहता पाहता ते अंथरुणाला खीळले, हा डॉक्टर तो वैद्य सर्व उपाय करून झाले.

जिलेबी ....

लेखक पियुशा यांनी गुरुवार, 16/02/2012 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
जिलेबी..... चला मि.पा.

गोळाबेरीज

लेखक बाळ सप्रे यांनी गुरुवार, 16/02/2012 14:15 या दिवशी प्रकाशित केले.
गोळाबेरीज पु लं च्या जीवनावर /व्यक्तिरेखांवर आधारीत काहीतरी कलाकॄती (नाट्य/चित्रपट) बनवण्याचा आणखी एक फसलेला प्रयत्न. पु लं चे शब्द इतके चपखल आहेत की एकाही शब्दाला इकडचे तिकडे करता येण शक्य नसत. आणि पटकथेसाठी असं थोडसं करावं लागलं की ऐकताना खटकतं. आणि त्याहून कठिण म्हणजे त्याच्यासारखा आवाज काढणे. अलूरकर/ दूरदर्शन यांच्यामुळे पु. लं चा आवाज इतका डोक्यात बसालाय की दुसर् या कुणाच्याही तोंडून तो ऐकवत नाही. अगदी दिलीप प्रभावळकर सारख्या दिग्ग्जालाही अन्तु बर्व्याच्या जवळपासदेखिल फिरकता आलं नाही.

वकिली सल्ला हवा आहे..

लेखक कॉमन मॅन यांनी गुरुवार, 16/02/2012 11:45 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो नमस्कार, येथे मिपावर कुणी सभासद वकील वा कायदेविषयक जाणकार असल्यास आम्हाला खालील गोष्टीकरता ते काही सल्ला देऊ शकतील, वा त्या बाबत येथे समग्र चर्चा करू शकतील अशी अपेक्षा आहे. तशी ही जुनी गोष्ट आहे, परंतु आमच्या अलिकडेच लक्षात आली म्हणून हा चर्चाप्रस्ताव... चित्रपट अभिनेते युसुफ खान, ऊर्फ दिलीपकुमार यांना १९९७ साली पाकिस्तानातील सर्वोच्च नागरी पुरस्कार - 'निशान ए इम्तियाज' हा दिला गेला असे समजते. परंतु आमच्या माहितीप्रमाणे दिलीपकुमार हे भारतीय नागरीक आहेत व त्यांनी भारतीय राज्यघटनेच्या कलम १८(२) चा भंग केला आहे.

एकल घाट

लेखक अज्ञातकुल यांनी गुरुवार, 16/02/2012 09:24 या दिवशी प्रकाशित केले.
चालते आठवण उतरुन एकल घाट क्षण; विसरुन थांबे उसंत घेइ रहाट जन्मांच्या वेठी भावुकल्या भातुकल्या भेटी येती चंद्रासह उजवे उगवे रमण पहाट बागडे चांदणे; रास खेळती राती कांही न उरे तळहाती सरल्या अंती बहु शंख शिंपले आदळती ओघात कातरला अवघा लाट झेलुनी काठ पलकांतिल गाठी रमल फुलांची माला शमवी हृदयातिल विरही दारुण ज्वाला साकडे घालतो रोज नव्या स्वप्नांसाठी तुम्हि येत रहा नित करुन वाकडी वाट ............................अज्ञात
काव्यरस

पोथ्यांचा अमूल्य खजिना

लेखक निनाद यांनी गुरुवार, 16/02/2012 06:09 या दिवशी प्रकाशित केले.
पोथ्यांचा अमूल्य खजिना एचपीटी कॉलेजमधील भाऊसाहेब वर्तक ग्रंथालयात असा जतन केले आहे हे वाचून अतिशय आनंद झाला. आंतरजालावर शोध घेतांना मला हा दुवा आढळला. ही माहिती इतरांनाही व्हावी म्हणून दुवा आणि लेख येथे देत आहे. अभ्यासकांना त्याची मदत होईल अशी आशा आहे. लेखाच्या शेवटी लेखिकेचा संपर्कही आहे. (श्री शरद यांनी मागे काजळाची शाई वापरून पाण्यातही अभंग सुरक्षित ठेवण्याचा प्रयोग केला होता. त्या प्रयोगाशी हे सुसंगत असल्याने यांना हा दुवा पाठवला होता. त्यांनी तो सर्वांनाच उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले म्हणून देत आहे.

रवी चतुर्वेदी आता पद्मश्री !

लेखक चैतन्य गौरान्गप्रभु यांनी बुधवार, 15/02/2012 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी चार वाजता उठून भारत आणि ऑस्ट्रेलीयाची कसोटी पाहणा-या क्रिकेट चाहत्यांचा या वेळी चांगलाच हेटा झाला. वाईटातल्या वाईट पद्धतीने कसं हरावं याचा नमुनाच भारताच्या संघाने यंदा सादर केला. मात्र ऑस्ट्रेलीयामधील पहाटे उठून पाहिलेले सामने असोत किंवा वेस्ट ईंडिजमधले रात्री जागुन पाहिलेले क्रिकेट असो, ती मजा, ते थ्रील काहीतरी वेगळंच असतं. पुर्वी भारताबाहेरील सामन्यांसाठी रेडिओवर अवलंबुन रहावं लागायचं. "धूप खिली हुई और दर्शकोंमें उत्साह" या वाक्यापाठोपाठ येणारा हजारो प्रेक्षकांचा आवाज असो, किंवा "... अगली गेंद...ऑफइस्टंप के काफी बाहर..