दुनिया तुझ्यामुळे....
दुनियादारी शिकण्या शिकविण्यात, जन्म सारा चालला
दुनिया तुझ्यामुळे हाय एक, कलंदर वाया चालला
ते न फसवे आता
हास्य ओठी जे दावतो
श्वास होउनी गेल्या आता
रिती ज्या मी पाळतो
न जाणो कधी कसा हा जीव, ऐहिकात रमाया लागला
दुनिया तुझ्यामुळे हाय एक, कलंदर वाया चालला
सुजनाची धुंदी आता
होय मला पारखी
शब्दही लेखणीत यायला
मागतात पालखी
असा कसा फकीराचा पाय, वस्तीत रुताया लागला
दुनिया तुझ्यामुळे हाय एक, कलंदर वाया चालला
दुनिया तूच सांगशी
काय करू अन करू नको
जरी सरणावर पडलो
तरी सांगशील मरू नको
अताशा न देताही मला तुझा, आदेश कळाया लागला
दुनिया तुझ्यामुळे हाय एक, कलंदर वाया चालला,
दुनिया तुझ्यामुळे हाय एक, कलंदर वाया चा
व्हॉट वीमेन वाँट
मेल गिबसन या नटाची प्रमुख भूमिका असलेला आणि त्याच्या सदाबहार अभिनयाने तारून नेलेला सिनेमा - "What Women Want" मी काल डीव्हीडी वरती पाहीला.
शिवमंदिर (अंबरनाथ)
बर्याचदा वीकांताचे प्लान शहराबाहेर भटकण्याचे होतात. आपण राहतो तिथे आसपास बर्याचदा प्रेक्षणीय स्थळं असतात, पण अशी ठिकाणं भटकंतीचे प्लान करताना आपण विसरुन जातो किंवा तिथे काय कधीही जाता येईल म्हणून ते रद्द करतो. असंच विसरलेलं नाही म्हणणार पण लक्षात असूनही जाणं न झालेलं ठिकाण म्हणजे अंबरनाथचं शिवमंदिर.
इथे येण्यासाठी मध्य रेल्वेच्या अंबरनाथ, बदलापूर, कर्जत किंवा खोपोली यापैकी लोकलचा पर्याय आहे. अंबरनाथ पूर्वेला उतरुन रिक्षाने देवळापर्यंत जाता येईल.
आम्ही गेलो ती वेळ नेमकी दुपारची तीन साडेतीनची होती.
प्रत्यक्षातला 'मोहन भार्गव'...
आशुतोष गोवारीकरांच्या तुफान यशस्वी 'लगान' नंतर त्यांनी दुसर्या खानसाहेबांना घेऊन 'स्वदेश' नावाचा एक चित्रपट काढला. 'नासा'त काम करणारा मोहन भार्गव नामक एक तरूण शास्त्रज्ञ भारतात परततो. भारतातल्या 'कोडी' नामक खेड्यात एक पाणचक्कीवर चालणारे विद्युत जनित्र निर्माण करतो आणि त्या गावाला वीज मिळू लागते अशी काहीशी कथा. मुळात लोकांचा अशा स्वप्नवत कथेवर विश्वास बसला नसावा. त्यामुळे तो चित्रपट तितका यशस्वी झाला नाही.
सांगण्याचं कारण हे की महाराष्ट्रात नुकत्याच शमलेल्या जि.प.
मजेदार आय.डी
आमची प्रेरणा- http://www.misalpav.com/node/20732
आपल्या अंतरजालीयं अंतरमनात अनेक आय.डी. भेटतात.असेच आमच्या एका अंतर जालीय ताय.डी ने आंम्हाला काही जुने आय.डी/डु.आय.डी सांगितले होते...
ओळखा बरे...
१)डु-मॅन डू-मॅनी...नक्की खर्या,किती जणी..?
२)इवलासा धागा त्याला प्रतिक्रीया अपार
३)वरुन पाहिलं तर नुसताच शिमगा,खालुन पाहिलं तर नाडिचा लेंगा,या बोअरिंगचे नाव काय सांगा..?
तुमच्या अंतरमनातले आय.डी.पण सांगा...पण थांबा...हे वरचे खरे का..? ;-)
आठवणीतील मृत्यूची तीन रूपे....
आठवणीतील मृत्यूची तीन रूपे....
माझ्या आठवणीतल्या मृत्युच्या प्रसंगापैकी तीन अगदी अतर्क्य अकल्पनीय आहेत.
१. सचिन ३२ वर्षीय होतकरू तरुण. आई वडीलांचा एकुलता एक मुलगा. स्वत:चा व्यवसाय . मा. प्रा. सुमारे ३००००. २ लहान मुली. ६ आणि २ वर्षाच्या. माहेरी गेलेल्या बायको व मुलींना आणण्यासाठी रात्रीच्या बसने सचिन मुंबईला निघाला होता. Reservation मिळाले नाही. आई वडील म्हणाले Reservation मिळाल्या नंतर जा. ते न ऐकता आयत्या वेळी मिळेल असा विचार करून निघाला. शेवटच्या क्षणी मिळाले. शेवटच्या बाकावर जागा .
मजेदार कोडी.....
आपल्या रोजच्या जीवनात अनेक माणसे भेटतात. असेच माझ्या एका मैत्रिणीची आईने आम्हाला काही जुनी ग्रामीण कोडी सांगितली होती. सोडवा बरे.....
१.) हुमान हुमनी नाकात चिमणी.
२.) इवलेसे झाड त्याला घुंगरांचा भार.
३.) वरुन चालतो तांगडतिंगा, खालून चालतो धांगडधिंगा, मधल्या नारीचे नाव काय सांगा?
तुमच्याकडे असलेली कोडी पण सांगा बरे का.
मेणबत्तीवीरांचे अन् टोपीबाजांचे कमी मतदान - लोकशाहीकरता अत्यंत घातक..!
भारतीय राज्यघटनेतील भाग ९अ - कलम २४३ आर (१) अंतर्गत नुकत्याच महाराष्ट्रातील दहा महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या.
मिसळपाव