Skip to main content

गोबी मंचुरिअन

लेखक Pearl यांनी गुरुवार, 08/03/2012 02:56 या दिवशी प्रकाशित केले.
गोबी मंचुरिअन हे माझं एकदम आवडतं स्टार्टर (पर्यायी मराठी शब्द सुचवा). ह्या रेसिपीची चव बर्‍याच प्रमाणात रेस्टॉरंट स्टाइल लागते.

भांग अ‍ॅट फर्स्ट (अ‍ॅन्ड लास्ट) टाइम

लेखक सोत्रि यांनी गुरुवार, 08/03/2012 01:49 या दिवशी प्रकाशित केले.
मी ज्या गावात लहानाचा मोठा झालो ते गाव, आगाशी (विरार), सर्व सण अगदी पारंपरिक पद्धतीने साजरे करण्यात माहिर होते. होळी आणि धूळवड हा तर साजरा करण्यासाठीचा आमचा टवाळांचा हक्काचा सण. आगाशीत पूर्वी भरपूर वाडे आणि आळ्या होत्या. मी राहायचो मराठेवाड्यात. होळीला रात्री वाड्यातील सर्व 'सीनियर' मेंबरांबरोबर दारू चढवायची आणि रात्रभर पुरंदरे आळीपासून सुरुवात करून मराठेवाडा, पाध्येवाडा, फडकेवाडा असे वाडे पालथे घालत शेवटी देवआळी अश्या मार्गाने शिव्या घालत, बोंबाबोंब करत शिमगा साजरा केला जायचा. सगळे जुने स्कोर्स व्यवस्थित आणि पद्धतशीर सेटल करण्यासाठी हा सण आमच्या फारच आवडीचा होता.

जागतिक महिला दिन व शिमगा.

लेखक तर्री यांनी बुधवार, 07/03/2012 22:50 या दिवशी प्रकाशित केले.
जागतिक महिला दिन व शिमगा हा एक भयंकर योग जुळून आला आहे. महिला दिना निमित्त शिव्यां ची ऊजळणी करावी तसेच शिमग्या निमित्त महिलांचे सेक्सकमिकरण नाही हो सक्शमिकरण च्यायला सक्षमिकर्ण....जावू दे करायला हवी असे वाट्ते आहे. सगळ्या शिव्या ह्या महिलांच्या शरिराशी , चारिक्टर शी निगडीतच का असतात ? असे एका पुरोगामी महिलेने विचारले असता मला पुरुषांच्या संदर्भातील एकही शिवी आठवली नाही. महिला दिना निमित्त केलेल्या पुरणपोळ्यांचीच ही नशा ! नाही तर शिमग्याच्या भांगेच्या आय चा घो !! बायको सकाळीच ऊठली तिने चहा केला. मी विचारले का ? तर म्हणाली महिलाना सामान दर्जा हवा. तू रोज करतोस चहा .

मन-झोपाळा

लेखक अज्ञातकुल यांनी बुधवार, 07/03/2012 20:25 या दिवशी प्रकाशित केले.
ओघळ पिकल्या पानांचे; सुकले देठ जरी अंकूर अजूनहि ओले; खोडात चिमुकले; गाभारी वारा,.. झाडून नेतसे हिरमुसलेले; गत वय माघारी झुळुकेत चिन्मयी कल्प उमलवे; नवजीवन दरबारी अंकीत कळ्या विलसती कोवळ्या वर्मावर अवतारी गंधाने भारी नवपर्णांकित शुभ्र परांची वारी किलबिल अवघी चौफेर; पिले पक्षिणी परतली माहेरी किमया ही ऋतु-तारुण्यबहर-रत प्रणयआभेची सारी यातना वेदना गळलेल्या; नत पायतळाशी; गोळा पाहून रम्य मय वसंत-शोभा; तृप्त ऋणांकित डोळा मजला ही भेटे अशी मनोरम रत्नजडित मधुशाळा अवकाशाचा अन झुले अंबरी मदनमस्त मन-झोपाळा ................................अज्ञात
काव्यरस

((मामांच्या मनाचे शोक))

लेखक चिम् चिम् मामा यांनी बुधवार, 07/03/2012 18:31 या दिवशी प्रकाशित केले.
((मामांच्या मनाचे शोक)) सदा सर्वदा रस्ता मोकळा असुदे, माझ्या समोर कुठली गाडी नसुदे...! ज्या...ज्या ठिकाणी गाडी जाये माझी, त्या...त्या ठिकाणी ग्रीन सिग्नल रूप तुझे...! मी पार्क करतो गाडी ज्या ठिकाणी, तिथे नो पर्किन्ग ची नको निशाणी...!

एकात एक...

लेखक गवि यांनी बुधवार, 07/03/2012 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
भात लावायचाच ना भांड्यात.. मूठभर डाळ त्यातच टाकू.. होऊन जाईल एकात एक.. भेकरटाप्रमाणे चहाच्या कपावर धरलेलं ओलंगिच्च बिस्कीट.. लपलपत पत्तकन चहात पडण्याची वाट पाहताना पुन्हा चटका मिळणार म्हणून शहारलेलं.. ते पडल्यानंतरही इकडे पेपरात रुतलेली बुबुळं तिथेच भिरभिरत राहतात.. चहासोबत पेपरही संपवू.. होऊन जाईल एकात एक.. आईची एकसष्ट पूर्ण झाली.. विधीबिधीवर विश्वास नाही पण सगळ्यांना बोलवायला हवंय एकदा....गेट टुगेदर.. रविवार बघून एकदाच एकत्र..बाहेरच कुठेतरी थाळी घालू सगळ्यांना..थाळी म्हणजे फिक्स बिल.. नव्या फ्लॅटची पार्टी, गाडीचीही मागताहेत साले कधीचे... आणि एकसष्टीपण..

स्वप्नांस शाप आहे............!

लेखक सांजसंध्या यांनी बुधवार, 07/03/2012 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
रात्रीस छंद आहे, स्वप्नांत राहण्याचा स्वप्नांस शाप आहे, रात्रीस जागण्याचा गेल्या कितीक रात्री, उलटून चांदण्यांच्या झाला सराव आता, अंधार साहण्याचा या सागरास वाटे, आधार चंद्रमेचा चंद्रास धाक आहे, अवसेस भागण्याचा नजरेतले इशारे, ना जाणले तुझ्या मी आहे खडा पहारा, डोळ्यांस पापण्यांचा गंधाळल्या मिठीचा, हा श्वास खास आहे श्वासांस भास आहे, आवेग थांबण्याचा देहात आग आहे, विझवू कशी कुठे ही पाण्यावरीच आहे, आरोप जाळण्याचा लाचार सांज संध्या, धावा करू कुणाचा कृष्णास बंध नाही, हाकेस धांवण्याचा संध्या
काव्यरस

स्टोल

लेखक जयवी यांनी बुधवार, 07/03/2012 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
लेकीची फरमाईश......मला स्टोल हवा......तो सुद्धा काळा.....!! वाढदिवस जवळ येतोय म्हटल्यावर नाही कसं म्हणणार....... दोरा घेऊन आले आणि केली सुरवात :) DSC00497" width="480" height="360" alt="" />

सत्काराची शाल कशी असावी?

लेखक विटेकर यांनी बुधवार, 07/03/2012 09:57 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या कडे येनार्या एका इजिप्शियन पाहुण्याचा ( जो आमचा या धंद्यातील भागीदार आणि त्या जागतिक कंपनीचा मालक आहे ) शाल देऊन महाराष्ट्रीय पद्धतीने सत्कार करायचा आहे. हा सत्कार आमच्या जर्मन कंपनीच्या जागतिक प्रमुखाकडून एका वाहनाच्या अनवेलींग ( अनावरण/ उदघाटन ) कार्यक्रमात करायचा आहे.. पत्रकार .. झगमगाट .तृतीय पृष्ठी..वगैरे असणार आहे.. कार्यक्रम पुण्यनगरीतच ( हल्ली चाकणलाही पुणेच म्हणतात) आहे.. आणि ही भन्नाट कल्पना एका सानुनासिक एकारांत पुणेकराची असल्याने त्याला अनेक तात्विक आयाम आहेत. प्रश्न असा आहे की... अशा सत्काराच्या कार्यक्रमाला शाल नेमकी कसली असावी?