आमच्या कडे येनार्या एका इजिप्शियन पाहुण्याचा ( जो आमचा या धंद्यातील भागीदार आणि त्या जागतिक कंपनीचा मालक आहे ) शाल देऊन महाराष्ट्रीय पद्धतीने सत्कार करायचा आहे.
हा सत्कार आमच्या जर्मन कंपनीच्या जागतिक प्रमुखाकडून एका वाहनाच्या अनवेलींग ( अनावरण/ उदघाटन ) कार्यक्रमात करायचा आहे.. पत्रकार .. झगमगाट .तृतीय पृष्ठी..वगैरे असणार आहे..
कार्यक्रम पुण्यनगरीतच ( हल्ली चाकणलाही पुणेच म्हणतात) आहे.. आणि ही भन्नाट कल्पना एका सानुनासिक एकारांत पुणेकराची असल्याने त्याला अनेक तात्विक आयाम आहेत.
प्रश्न असा आहे की...
अशा सत्काराच्या कार्यक्रमाला शाल नेमकी कसली असावी?
आपल्याकडे सत्काराच्या म्हणून मिळणार्या शाली या पंचाच्याच आकाराच्या असतात. दुकानात विचारल्यावर ( दुकान पुण्यातील आहे ) सत्काराच्या शाली या अशाच असतात असे अत्यंत आत्मविश्वासाने सांगण्यात आले.
शाल या विषयावर गुगलून पाहीले पण शाल आणि सत्कार असा विषय मिळत नाही.
शाल ( महावस्त्र) आणि सत्कार हा प्रकार नेमका केव्हा सुरु झाला असावा? त्यामागची भूमिका काय असावी? यातून आदर व्यक्त होतो की प्रेम ? की नुस्ताच शिष्टाचाराचा उपचार ? अन्य प्रांतात / देशात अशी प्रथा आहे का?
या प्रश्नांची उत्तरे मिळाल्यास " शाल नेमकी कसली असावी?" याच्या जवळपास जाता येईल असे वाटते.
माझ्या एका अमराठी मित्राला थोडी चकचकीत असावी असे वाटते ..( निदान फोटु तरी बरे येतील ही त्याची माफक अपेक्षा! )
मिपाकरांनी ही प्रश्नाचे उत्तर धुंडालण्यास मदत करावी.. म्हणून हा चर्चा प्रस्ताव !
वाचने
5203
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
बाठांकडे तपास करावा. रंगांची
तेच सत्काराची शाल असं सांगूच
तेच सत्काराची शाल असं सांगूच
तेच सत्काराची शाल असं सांगूच
सूडराव,
In reply to तेच सत्काराची शाल असं सांगूच by सूड
तर वो !
In reply to सूडराव, by प्रास
शाल अशी हवी की तिचा त्या
शाल अशी हवी की तिचा त्या
पगडी
In reply to शाल अशी हवी की तिचा त्या by सुहास..
पगडी म्हणजे टोपीच ना एक
नक्की हेतु काय आहे या लेखाचा?
अहो,
आमच्या आईचं भजनी मंडळ
शाल मिळाली की थोड्याच दिवसात
हम्म
अन्न, वस्त्र आणि निवारा देऊन सत्कार...
म्हणणे पटले !
In reply to अन्न, वस्त्र आणि निवारा देऊन सत्कार... by बटाटा चिवडा
म्हणणे पटले ! 'म्हणणे पटले'..
In reply to म्हणणे पटले ! by विटेकर
शाल नव्हे महावस्त्र म्हणा
नक्की का?
In reply to शाल नव्हे महावस्त्र म्हणा by मराठी_माणूस
=)) =))
In reply to नक्की का? by आनंदी गोपाळ
हिमरु
धन्यवाद !
??
In reply to धन्यवाद ! by विटेकर