आठवणींचा पाऊस: रसग्रहण
आठवणींचा पाऊस: रसग्रहण
सततचा पाऊस मनावर मळभ साचवतो. मनातील आठव वर येऊ लागतात. एकटेपण असेल एक उदाससवाणी छाया भर पावसात आपल्या आजूबाजूला तयार होते. ना कसले काम करवत ना काही घडते. आपले कुणी जवळ नसल्याची खंत अधीकच जाणवते.
रात्रभर पडणारा पाऊस अशा वेळी झोप घेऊ देत नाही. सतत आठवणींचे उमाळे फुटत असतात. उत्तररात्री कधीतरी डोळ्याला डोळा लागतो.
अशा वेळी कवी म्हणतो:
रात्रभर पडणारा पाऊस
सकाळी नकोसा होतो
कितीही हलका का असेना
जेव्हा सतत बरसतो
असा हा पाऊस कवीचा रात्रीचा सोबती असतो.
पृथ्वीचे शत्रू
‘No matter what we do, an asteroid is going to wipe us out. So we should party hard and wreck the place!’ – to which Homer replies: ‘Yeah, why should the asteroid have all the fun?’
पृथ्वीची सध्याची (साल २०२०) लोकसंख्या आहे ७९६ कोटी आहे.
लोक बिंदास जीवन जगतायेत.
बिंदास जीवन जगायला माझी काही हरकत नाही. मी कोण हरकत घेणार? कृपया गैरसमज नसावा. मला एवढेच म्हणायचे आहे कि आपला, आपल्या संस्कृतीचा, आपल्या या सुंदर धरतीचा विनाश अटळ आहे. तो कदाचित पुढील दहा वर्षात होऊ शकेल किंवा अजून लाखो वर्षात देखील होणार नाही. कोण आहे असा शत्रू जो आपल्या भोवती घिरट्या घालत आहे? कोविड? प्लेग? भूकंप? हवामान बदल? छ्या.
निसर्गरम्य आंजर्ले (Anjarle, Dapoli)
नोव्हेंबर १५, १६, २०२१
सुरक्षित समुद्रकिनारे, हाकेच्या अंतरावर डोंगर-टेकड्यांवरची हिरवाई, पुरातन देवालये, मत्स्यव्यवसायाचं महत्त्वाचं केंद्र असणारं बंदर, डॉल्फिनची उपस्थिती, जलदुर्ग व किनारी दुर्ग एकाच ठिकाणी, काजूची मोठी बाजारपेठ, कृषी विद्यापीठ अशी अनेक वैशिष्ट्ये मिरवणारा दापोली आणि परिसर नेहमीचं पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय असतो.
आपण सगळेच अश्वत्थामे
लिहीण्याचा उद्देश जे उत्कटतेने वाटते ते लिहावे.चुक,बरोबर,चांगले वाईट हे वाचणाऱ्यांनी ठरवावे.
युगांत(इरावती कर्वे),मृत्युंजय, युगंधर आणी आता अश्वत्थामा ही पुस्तके वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने वाटली,ती म्हणजे महाभारतातील प्रत्येक व्यक्ती आपापल्या कर्माची फळे भोगून मुक्त झाली. प्रत्येकजण आपापल्या जागी बरोबर व दुसर्यांच्या लेखी चुक होता,अश्वत्थामा सुद्धा. अश्वत्थाम्याचे चिरंजीवीत्वाचे वरदान ऐवढे शापित निघेल हा विचार कदाचित नियतीने सुद्धा केला नसावा. म्हणूनच अश्वत्थाम्या नंतर तीने (नियतीने) कुणालाच हे वरदान दिले नसावे. अश्वत्थामा शेवटचा चिरंजीव.
अश्वत्थामा आपल्या कर्माची फळे भोगतोय.
आठवणींचा पाऊस
रात्रभर पडणारा पाऊस
सकाळी नकोसा होतो
कितीही हलका का असेना
जेव्हा सतत बरसतो
संध्याकाळी उदास वातावरणात
मुसळधार कोसळतो
तेव्हा नको त्या आठवणींचा
पूर मात्र मनात येऊन जातो
रात्र उदास जाण्याची चाहूल लागते
मग रात्रभरचा पाऊस नकोसा होतो.
- पाभे
१३/०७/२०२२
काव्यरस
पुस्तक परिचयः एक होता कार्व्हर-- विणा गवाणकर
एक होता कार्व्हर ही लेखिका विणा गवाणकर यांची १९८१ साली प्रकाशित झालेली पहिलीच कादंबरी.. अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय शास्त्रज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांची ही जीवनगाथा...
आपल्या आईवडिलांचे नीट तोंडही पाहू न शकलेल्या कार्व्हर यांची जीवनकहाणी जितकी आपल्याला भावनिक करते तितकीच ती प्रेरणा देऊन जाते. या पुस्तकात लेखिकेने कार्व्हर यांचे हलाखीचे बालपण, त्यांनी जगण्यासाठी व यशस्वी होण्यासाठी केलेली धडपड अतिशय सुरेख रित्या शब्दबद्ध केलेली आहे..
अमेरिकेतील मिझुरी राज्यातील 'डायमंड ग्रोव्ह' पाड्यावर मोझेस कार्व्हर नावाचा एक शेतकरी आपली पत्नी सुझन कार्व्हर सोबत रहायचा.
आठवणींच्या जंगलात-१
खाटेवर पडताच भूल दिल्या सारखी क्षणात झोप लागली......पुढे....
http://misalpav.com/node/50393/backlinks
वाचकांचे, प्रतीसादकांचे धन्यवाद.
काश्मीर खोर्यातील व सीमावर्ती भागातील भुमीपुत्रांना प्रतिकूल परिस्थितीची सवय आसते. सैनिकांना मात्र सर्वथा नवीन वातावरण,स्वतःला प्रकृतीशी मिळते जुळते घेताना विषम परीस्थीतीला तोंड द्यावे लागायचे/लागते. खास करून जेव्हां कडाक्याच्या थंडीत या भागात बदलून येतात त्यांना जास्त त्रास होतो. मी डिसेंबर मधे रिपोर्ट केला होता. "सर मुंडाते ही ओले पडे".
चारोळया: ताज्या घटनांवर
ब्रूटस
सीजर कुणीच नव्हता
सारेच ब्रूटस होते.
खंजीरीच्या पात्यांना
रक्ताची तहान होती.
जो पळतो तो जिंकतो
बाजीरावाने घुडदौड केली
निजामचा पराभव केला.
शिंदेंनी विमानदौड केली
उद्धवचा पराभव केला.
दैवयोग
किती षड्यंत्र केले
किती वेश बदलले
नशिबी मात्र माझ्या
फक्त मंत्रिपद आले.
ज्ञानी
लोक रात्री झोपतात
ज्ञानी रात्री जागतात
गीतेचा संदेश हा
शिंदेंना कळला होता.
आजचा पाऊस वेगळा होता
आसामच्या डोंगर-दर्यातून
मुंबईत कोसळला होता.
मर्सडीज पाण्यात बुडाली
रिक्शा तरंगत होता.
काव्यरस
त्या शेवटच्या प्रवासाच्या आठवणी (भाग-२)
दरम्यान, सकाळचा चहा येऊन गेला होता आणि नाश्ता यायला अजून थोडा वेळ लागणार होता. त्यामुळे गाडीत काहींच्या सहप्रवाशांबरोबर गप्पा चालू होत्या, काहींचे वर्तमानपत्राचे वाचन सुरू होते, तर काहींची डुलकी सुरू होती, तर काहींचे मोबाईलमध्ये डोळे घालून काही पाहणे सुरू होते. पुढे भिगवणमध्ये आत जाताना शताब्दी थोडी हळू धावू लागली. भिगवणनंतर पुढे अजून दुहेरी मार्ग सुरू झालेला नसल्यामुळे इथे नेहमीच डाऊन दिशेला जाताना गाडीचा वेग मंदावत असतो. त्यामुळे मला वाटलं की, हळूच गाडी पुढे जाईल आता, पण तितक्यात वेग आणखी कमी झाला आणि गाडी 3 मिनिटं भिगवणमध्ये फलाटावर विसावली.
मिसळपाव