Skip to main content

भुताचा जन्म

लेखक सागरसाथी यांनी सोमवार, 19/09/2022 06:59 या दिवशी प्रकाशित केले.
भुताचा जन्म.... शहरातल्या गजबजलेल्या भागातील मी जूनी चाळ अनेकांच्या सुखदुःखाची साक्षीदार होत गेली अनेक वर्ष उभी आहे.

दिंडी (गूढकथा)

लेखक vaibhav deshmukh यांनी रविवार, 18/09/2022 21:51 या दिवशी प्रकाशित केले.
दिंडी (गूढकथा) दिंडी संथ गतीने पुढे सरकत होती. मध्यरात्र उलटून गेली होती. तरी दिंडीचे मार्गक्रमण सुरूच होते. खरेतर आता कुठेतरी सगळ्यांनी मुक्कामाला थांबायला हवे होते. पण आमच्या सगळ्यांच्या अंगात कोणते बळ आले होते कोणास ठाऊक, पण आम्ही पुढे चालतच होतो. पन्नास साठ माणसांचा आमचा समूह, गेल्या बारा - तेरा दिवसांपासून असेच पुढे पुढे जात होतो. मुक्काम पडत होते. जागोजागी आमचे पाल पडत होते. रोज अनेक मैल अंतर आम्ही कमी करत होतो.                 पण आज आम्ही कुठेच मुक्काम केला नाही.

पुणे मिपाकट्टा सप्टेंबर २०२२ वृत्तांत: मिपाकट्टा संपन्न झाला

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 17/09/2022 21:48 या दिवशी प्रकाशित केले.
आज दिनांक : १७ सप्टेंबर, शनिवार रोजी सकाळी १० ते दु. २ च्या दरम्यान ठिकाण पाताळेश्वर लेणी, जंगली महाराज मंदिराशेजारी, जंगली महाराज रोड, शिवाजी नगर, पुणे - 411005 येथे अत्यंत उत्साहात साजरा झाला. एकूण सतरा (१७) मिपाकर, मिपा मालकांसहीत उपस्थित होते. त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत.

रॉजर फेडरर- एक संयमी झंझावात

लेखक वझेबुवा यांनी शनिवार, 17/09/2022 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
अवघ्या टेनिस विश्वाला भुरळ पाडणारा नजाकतदार खेळाडू. गेल्या २० वर्षांत, जे लोक नियमित टेनिस पाहतात किंवा जे लोक केवळ ग्रँडस्लॅम पाहतात त्यापैकी बहुतांश लोकांचा आवडता खेळाडू कोण असे विचारल्यास नक्कीच फेडरर हे उत्तर मिळेल. पीट सॅम्प्रस चं लयाला जाणार साम्राज्य याने बळकावले आणि हा टेनिस जगताचा नवीन सम्राट म्हणून उदयास आला. आधी विम्बल्डन बॉईज मध्ये विजेतेपद नंतर मुख्य विम्बल्डन मध्ये सेमीफायनलला सॅम्प्रसला हरवून हा प्रेक्षकांना खुणावू लागला. आणि मग पुढील वर्षी विजेतेपद पटकावल्यावर याने मागे वळून पाहिलेच नाही.

मिपा कट्टा पुणे २०२२....

लेखक कर्नलतपस्वी यांनी शनिवार, 17/09/2022 08:43 या दिवशी प्रकाशित केले.
सारे रोजचे तरीही..... हवे हवेसे वाटे निशाचे ते जाणे आणी उषाचे भेटणे गवाक्षातून झाके सोनसळी तिरीप पुन्हा नव्याने येतो जगण्या हुरूप सारे रोजचे तरीही..... पालवी फुटते रात्रीच्या स्वप्नानां अधिरते मन कवेत घ्यायाला गेले कालचे विरून निराशेचे सुर मन आभाळी आले ढग आशेचे भरून सारे रोजचे तरीही हवे हवेसे वाटे...... दमून भागून जीव झाला क्लांत पुन्हा घरट्यात येतो घ्याया विश्राम निवांत सारे रोजचे तरीही हवे हवेसे वाटे निशाचे ते येणे..... भगवंताचे देणे चाले असाच चरितार्थ सारे रोजचे तरीही..... कट्ट्यावर येवून साधावा परमार्थ. १७-९-२०२२ पुणे कट्ट्यासाठी हार्दिक शुभेच्छा l

कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ८

लेखक टर्मीनेटर यांनी शनिवार, 17/09/2022 01:01 या दिवशी प्रकाशित केले.
* {box-sizing: border-box;} .mySlides1, .mySlides2, .mySlides3, .mySlides4 {display: none} .mySlides1, .mySlides2, .mySlides3, .mySlides4 img {vertical-align: middle;} .slideshow-container {max-width: 600px; position: relative; margin-left: auto; margin-right: auto; margin-bottom: 50px;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);} .prev, .next {cursor: pointer; position: absolute; top: 101%; width: 40px; padding: 8px; margin-top: 0px; color: white; font-weight: bold; font-size: 18px; transition: 0.3s ease; border-radius: 0 3px 3px 0; user-select

नेताजीचे सहवासात - भाग २ - आ

लेखक शशिकांत ओक यांनी शनिवार, 17/09/2022 00:58 या दिवशी प्रकाशित केले.
३ ८

नेताजींचे सहवासात

लेखक -कॅप्टन पुरुषोत्तम नागेश ओक

नवी दिल्लीतील कर्तव्यपथावर नेताजी सुभाष चंद्र बोस यांची भव्य प्रतिमा विराजमान झाली आहे. त्यानिमित्ताने नेताजींचे काही स्वभाव पैलूंवर प्रकाश

सुभाषचंद्र बोस यांचे ते वीरश्रीपूर्ण भाषण

महायुद्ध संपल्यावर केंव्हा एकदा घरी जाऊन पडतो असे सर्व सैनिकांस वाटू लागते.

परिचित, तरीही अपरिचित ‘दख्खन’

लेखक पराग१२२६३ यांनी शुक्रवार, 16/09/2022 23:54 या दिवशी प्रकाशित केले.
दख्खन दररोज मुंबई-पुणे-मुंबई अशा फेऱ्या मारून सुमारे 3,000 प्रवाशांची ने-आण करत असली तरी तिच्या कारकिर्दीची दखल क्वचितच कोणी घेतली असेल. इतकंच काय तिचा वाढदिवसही कधी असतो, हेसुद्धा कुणाला माहीत नाही. त्यासंबंधीचा अधिकृत पुरावाही सापडत नाही. दख्खनच्या राणीच्या अगदी उलट परिस्थिती आहे ही सगळी.

मुक्त चिंतन

लेखक अन्या बुद्धे यांनी शुक्रवार, 16/09/2022 21:26 या दिवशी प्रकाशित केले.
मुक्त चिंतन काळा कभिन्न कातळ. कणखर, खडबडीत, बऱ्यापैकी तापलेला. मधेच वाळकं गवत. खडकातल्या बारक्या कडा, भेगा यात बोटं खुपसून, पावलांच्या कडा आधारासाठी वापरत आपण रॉकला भिडतो. हळूहळू उंची गाठली जात असते. आणि अचानक सावकाश नकळत आपल्या नजरेचा पसारा आकुंचित होतो. अर्धा इंच रुंदीच्या क्रॅक स्पष्ट दिसू लागतात. बोटं दाबलेल्या खडकाच्या आतली धडधड आपल्या छातीतल्या धडधडीशी जोडली जाते आणि क्षणात तो भरवशाचा नाही म्हणून दुसऱ्या कंगोऱ्याकडे हात सरकतो. पावलाच्या बोटापासून ताणलेल्या हातापर्यंत एक हवा-नको-हवासा ताण येतो. आपली पुढली हालचाल 2 फूट अधिक उंची की खाली कोसळत जाणं यातला फरक सांगणार असतात.