भाव तिथे देव
सायकलिंगला बाहेर पडते तेव्हा रस्त्यावर रोज नवीन गमती जमती दिसतात. आपल्याकडे एकूणच देवदेवतांचं आणि देवळांचं प्रमाण खूप आहे. इथेही तेच आहे. जागोजागी छोटी मोठी देवळं आहेत. नवीन नवीन बांधली जात आहेत. जात येता ट्रक दिसतात त्यांच्यावरची नावं वाचून तर ज्ञानात भरच पडते. खरंच अशा नावाचा देव आहे ? असा प्रश्न मनात येतो.
रस्त्याच्या कडेची छोटी छोटी देवळं असतात ना त्यात लोकांची मजेशीर गोष्ट अनुभवयाला मिळते. बरेचदा हि हद्दीवरची किंवा वेशीवरची देवळं असतात. फार मोठी नसतात. अगदी छोटंसं देऊळ असत. पण एका गावाची हद्द संपून दुसर्या गावाची हद्द सुरु होते तिथे हि देवळं असल्याने याना महत्व असत.
मिसळपाव