Skip to main content

दे दवांचे प्याले

लेखक चांदणे संदीप यांनी बुधवार, 14/12/2022 14:43 या दिवशी प्रकाशित केले.
कितीदा ओठांवरती अव्यक्त राहिलेले शब्द ते तुझ्या मी, डोळ्यांत वाचलेले जायचे कुठेशी, मी चाललोय कोठे? तुझ्या रूपाने, रूपाली, मला भारलेले माळून दे म्हणालीस, माला तारकांची केशी तुझ्या टपोरे, चंद्रफूल माळलेले भेटता तुला उराशी, श्वासात आग येते क्षण तप्त, दग्ध, तरीही, भान गोठलेले घनगर्द भावनांचा कल्लोळ माजतो ग दे दवांचे प्याले, पाकळ्यांत साठलेले - संदीप चांदणे
काव्यरस

वर्ल्ड टुर इन जस्ट वन अवर....

लेखक कर्नलतपस्वी यांनी बुधवार, 14/12/2022 11:47 या दिवशी प्रकाशित केले.
@सहित्य सम्पदक भट्कन्ती दालन उघडत नाही म्हणून लेख इथे डकवला आहे. Döstädning उर्फ Death Cleaning उर्फ मोकळे हात ! @अनिंद्य, यांनी एका वेगळ्याच विषयाला हात घातला.संवेदनशील वाचकांचे विचारांना चालना देणारे प्रतिसाद आले. विषयाच्या अनुरूप जगायचा,वागायचा प्रयत्न करतोय. बाकी सर्व सोपे वाटले पण पहिल्या व तिसर्‍या पिढीतला गुंता कसा सोडवायचा हे लक्षात येत नाही.

मंदिराबाहेर भेटलेली देवी

लेखक पॉइंट ब्लँक यांनी मंगळवार, 13/12/2022 17:58 या दिवशी प्रकाशित केले.
आज तो ऑफिसमधून घाई गडबडीत परतला. आल्याआल्या कॅमेराची बॅग भरली. घडयाळ बघितलं सहा वाजले होते. मंदिराचा वार्षिक उत्सव चालू व्हायला अर्धा तास होता अजून. प्रसादाचं जेवण असलं तरी सगळे फोटो काढून जेवायला उशीर होणारच . थोडा चहा पोटात गेला तर उत्साह टिकून राहील शेवटपर्यन्त असा विचार करून शेजारच्या हॉटेलात जाऊन चहा घेतला. चहा पिता पिता फोटो कसे काढता येतील ह्याचा विचार केला . चहा पिऊन थेट ममंदिराकडे चालू लागला. जाता जाता नेहमीचे नियम स्वतःला पुन्हा एकदा बजावले - " मन आणि कॅमेरा कुठेही भरकटू द्यायचा नाही.

बदामी १: चालुक्यांचा संक्षिप्त इतिहास आणि बदामी लेणी

लेखक प्रचेतस यांनी मंगळवार, 13/12/2022 09:13 या दिवशी प्रकाशित केले.
प्रास्ताविक कित्येक वर्षांपासून बदामीला जायचं होतं पण योग काही येत नव्हता, तो ह्याच महिन्याच्या सुरुवातीस आला. झालं असं की ऑफिसमधल्या कामांमुळे सुट्ट्यांचं जुगाड काही जमवता येत नव्हतं, नोव्हेंबर महिन्यातले तर सर्व शनिवार, रविवार ऑफिसातच गेले होते, मित्रांनाही वेळेअभावी ठोस काही जमवता येत नव्हतं. तो योग अचानक जुळून आला. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आम्हा तिघांनाही शनिवार रविवार जोडून एकूण ५ दिवस सुट्टी काढता येत होती मग ठिकाणे शॉर्टलिस्ट करायला लागलो. एकंदरीत ४ ठिकाणे निवडली आणि त्यातून एक ठिकाण निवडण्याचं पक्कं केलं.

सिंहगड!

लेखक Bhakti यांनी सोमवार, 12/12/2022 23:58 या दिवशी प्रकाशित केले.
"गड आला पण सिंह गेला","आधी लगीन कोंढाण्याच,मग माझ्या रायबाचं"ह्या ऐतिहासिक सिंहगर्जना लहानपणापासून ऐकून स्फुरण चढत.गड किल्ल्यांचा इतिहास केवळ वाचून नाही तर इथल्या पावन भूमीला स्पर्शून अनुभवला पाहिजे हे समजायला जरा उशीर झाला.पण ठीक आहे एक मुलीला इतिहास आवडतो,तर मुलीला हे लहानपणापासून समजलं तर खुप छान बदल घडेल.त्यामुळे जसे जमेल तसे गड दर्शनकरावं असं ठरवलं.सर्वात सोपा सिंहगड आहे , असं ऐकलं. पुणे दरवाज्यातून चढाई सुरु केली ,तिथेच शरभ चिन्ह आणि तानाजी मालुसरे,नावजी बलकवडे यांनी हा किल्ला शत्रुंकडून जिंकल्याचा उल्लेख आढळला.बलकवडे यांचा उल्लेख पहिल्यांदाच लक्षात आला.पुढे घोड्यांचे टाके,दारू टाके पा

मद्रास कथा- ४

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी रविवार, 11/12/2022 23:04 या दिवशी प्रकाशित केले.
ब्रिटनचे पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड हिंदू, मुस्लिम आणि शीख यांप्रमाणेच दलितांसाठीदेखील स्वतंत्र मतदार संघ असावा ह्या बाजूने होते. भीमराव आंबेडकरांनी नंतर सांगितले की त्यांनी नेपल्सहून पंतप्रधानांना पत्र लिहिले होते आणि ते त्यांच्या सांगण्यावरूनच हे झाले होते. आंबेडकर हे एकमेव व्यक्ती होते ज्यांना तिन्ही गोलमेज परिषदात निमंत्रित करण्यात आले होते आणि तिन्ही गोलमेज परिषदांमध्ये भाग घेतला होता. गांधींनी दुसऱ्या गोलमेज परिषदेला हजेरी लावली आणि या दलित मतदारासंघांचा विरोध केला. दलितांच्या हक्कासाठी आपले जीवन अर्पण करीन, पण त्यांना हिंदूंपासून वेगळे होऊ देणार नाही, अशी शपथही त्यांनी घेतली.

जन्मजात दुखणे येता (2) : हात व पाय

लेखक हेमंतकुमार यांनी रविवार, 11/12/2022 21:49 या दिवशी प्रकाशित केले.
भाग-1 इथे : ……………. या भागापासून जन्मजात शारीरिक दोषांची शरीरभागानुसार उदा. पाहू. या भागात हात व पायाच्या अशा दोषांचे विवेचन करतो. हे दोष मुख्यतः तीन प्रकारचे आहेत: १. हात किंवा पायाचा पूर्ण अभाव अथवा खुरटलेली वाढ. या दोषांचे प्रमाण दर 10,000 जन्मांमध्ये ८ इतके आहे. पायांच्या तुलनेत हातांचे दोष अधिक प्रमाणात दिसतात. खालील प्रकारचे दोष बऱ्यापैकी आढळतात : • Forearm मध्ये रेडियस हे हाड नसणे. • गुडघा ते घोटा या पायाच्या भागातील fibula हे हाड नसणे. कारणमीमांसा: A.

चला मुलांनो आज पाहूया शाळा चांदोबा गुरूजींची

लेखक मार्गी यांनी रविवार, 11/12/2022 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
✪ तेजस्वी ता-यासारखं international space station! ✪ शनीची कडी, गुरूचे उपग्रह आणि तांबूस मंगळ ✪ सुंदर कृत्तिका- ४०० वर्षांपूर्वीचं दृश्य ✪ चंद्राचे खड्डे आणि मैदानं ✪ अहंकाराचे भ्रम दूर करणारं विराट विश्व ✪ नुसत्या डोळ्यांनी दिसणा-या गमती जमती ✪ मुलांचा व पालकांचा उत्साह सर्वांना नमस्कार. सध्या आकाश दर्शनासाठी उत्तम काळ आहे. मध्ये मध्ये येणारे तुरळक ढग सोडले तर रात्री सुंदर आकाश बघता येतं. अनेक ठिकाणी मुलांना आकाशाच्या गमती दाखवण्याची संधी मिळत आहे. आयुर्वेद व्यासपीठ परभणी ह्यांनी मुलांसाठी व मोठ्यांसाठी दि.

गळ्याशपथ.

लेखक आजी यांनी बुधवार, 07/12/2022 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
जगात असा एकही माणूस नसेल की ज्यानं आयुष्यात कधी शपथ घेतली नाही. आपलं म्हणणं खरं असो वा खोटं ते निक्षून, ठासून सांगण्यासाठी लोक शपथ घेतात. कोर्टात धर्मग्रंथावर हात ठेवून शपथ घेतात आणि खरं किंवा खोटं बोलतात. काहीजण खोटी साक्ष देण्याचा पैसे घेऊन धंदाही करतात. प्रत्यक्षात गुन्हा घडताना पाहिल्याचं शपथेवर सांगतात. माॅडर्न मुलं "शपथ" न म्हणता "आय स्वेयर"म्हणतील पण शपथ घेतीलच. तर खेडवळ माणूस "आईच्यान सांगतो" असं म्हणत शपथ घेईल. लहानपणी आम्ही वर्गातल्या आणि खेळातल्या मुली खूप शपथा घ्यायचो. पहिली "गळ्याची शपथ". तीवर विश्वास बसला नाही तर "देवाची शपथ", मग "रक्ताची शपथ".

सिग्नल (भाषांतर)

लेखक स्मिताके यांनी मंगळवार, 06/12/2022 22:07 या दिवशी प्रकाशित केले.
सिग्नल ------------------ मूळ कथा - The Signal By Vsevolod M. Garshin. अवघ्या वीस कथा लिहिणारे रशियन लेखक गार्शिन (१८५५ - १८८८) हे अतिशय हळव्या मनोवृत्तीचे लेखक म्हणून ओळखले जात. १८७७ च्या टर्किश रशियन युद्धकाळात सैन्यात भरती होऊन, ते एका लढाईत जखमी झाले होते. त्या काळात घेतलेला युद्धाचा अनुभव त्यांच्या कथांमधून दिसून येतो. एक वर्स्ट = १.१ किमी एक देसियातीन = जवळपास एक हेक्टर सॅम्हावार 0 ------------------ सेमयॉन इव्हानोव्ह रेल्वेचा रूळ राखणदार होता.