जावे IT च्या डिपार्टमेंटा
Non IT कंपनीत काम करत असताना IT संबंधित काही काम जर आलं (देव करो आणि अशी वेळ कोणावर न येवो) तर तो कठीण समय आहे असं समजावं. इथं IT म्हणजे तुमचा laptop. त्याचं कुठलंही काम हे IT सोडून दुसरं कुठलंच नसतं. स्वतःच डोकं बडवून झालं की आपापल्या कुलदेवतेचं नाव घेऊन कामाला लागावं लागतं. IT मध्ये जाताना आल इझ वेल अस म्हणून प्रवेश करावा तर सुरुवातीला तुम्हाला कोणीही हुंगत नाही. तिथला प्रत्येक जण आपापल्या 'ह्यात' असतो. मग आधीची ओळख, मनातला आवाज, कुलदेवतेची कृपा, आईचा आशिर्वाद, गतजन्माची पुण्याई आणि चालूजन्माचे कर्मभोग हे सगळे एकत्र आल्यावर तिथला कोणीतरी तुम्हाला विचारतो काय प्रॉब्लेम आहे?
मिसळपाव