Skip to main content

अलौकिक!!

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी गुरुवार, 23/03/2023 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी नोकरदार आणि संसारी माणसाची बऱ्याचदा "हम तो बिझी राहते है फालतू के कामो मे" अशीच अवस्था असते. त्यातही विकांताला एक सुंदर कार्यक्रम बघण्याचा योग आला. योगच म्हणावे लागेल, कारण रविवार सकाळ मोकळी मिळणे, घराजवळ कार्यक्रम असणे आणि चक्क फुकट पास मिळणे हे म्हणजे आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो ३ असेच झाले नाही का? तर आमच्या तबल्याच्या क्लासच्या कायप्पा ग्रुपवर एका दानशूर व्यक्तीने ही माहिती कळविली आणि पास हवे असल्यास व्य नि करण्यास सांगितले . लगेच हावरटपणा करून एक पास राखून ठेवायला विनंती केली. कार्यक्रम २ दिवस होता.पण पहिल्या दिवशी मुख्य गायन होते, आणि गाण्यातले मला काही कळत नाही.

दोन शशक- शबरीची बोरे

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी सोमवार, 20/03/2023 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
भाग-१ विकांताला मस्त ट्रेक झाला होता. दमलो होतो आणि घरी जायची ओढ लागली होती. पळस्पे फाट्यावर एस टी बसची वाट बघत उभा होतो. हा शेवटचा टप्पा नेहमीच कंटाळवाणा असतो. तेव्हढ्यात एक आजीबाई बोरे टोपलीत घेऊन विकताना दिसली. तोंडाला चाळा म्हणून तिच्याकडून थोडी बोरे विकत घेतली आणि वीसची नोट आजीबाईला दिली.तेव्हढ्यात माझी बस येताना दिसली म्हणून सॅक सावरत पळालो. आजीबाई पाठीमागे ओरडत होती, "बाळा ,सुट्टे पैसे घे रे" पण बसमध्ये जागा पकडायच्या नादात ५ रुपयाचा विचार कोण करतो? खिडकीत बसायला जागा मिळाली. बस सुरु झाली आणि खिडकीतून सहज मागे वळून पाहिले.

पर्वतावरचा पाषाण - बालकथा

लेखक चांदणे संदीप यांनी सोमवार, 20/03/2023 15:00 या दिवशी प्रकाशित केले.
फार फार वर्षांपूर्वी एका पर्वताच्या माथ्यावर एक भलाथोरला पाषाण राहत होता. त्याच्या आजूबाजूला खूप हिरवळ, झाडे आणि वेली असल्यामुळे तिथले वातावरण नेहमीच प्रफुल्लित असायचे. वसंत ऋतूत तर तिथे कोवळ्या रानफुलांच्या ताटव्यांनी बहार यायची. तो पाषाण तिथल्या सर्व झाडवेली आणि फुलांशी मनमोकळ्या गप्पा मारायचा. त्या सर्वांची एकच भाषा होती, स्पर्शाची. असेच दिवस मजेत चालले होते. सर्वजण सुखाने आजूबाजूला नांदत होते. पण एकदा घडले असे की, त्या पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या एका गावातून काही माणसे पर्वत चढून वर आली आणि त्यांनी त्या पाषाणाला उकरून वर काढला.

महिलादिन-एक चितंन

लेखक कर्नलतपस्वी यांनी शनिवार, 18/03/2023 19:12 या दिवशी प्रकाशित केले.
अस्वीकरण-सदर विडंबन केवळ मनोरंजना साठी लिहीले आहे. वाचल्यानंतर कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या तर त्यासाठी आगोदरच क्षमा मागतो. बोले तो आज जागतीक महिला दिन है l क्या बात करते हो! मै तो हर रोज महिला दिन मनाता हूँ l सुबह उठते ही उसके लिये एक कप चाय बनाता हूँ l सच कहता हूँ... सुबह शाम हर कोई मुझे आयना दिखाती है l फिर भी, हर महिला मेरे लिये मायनारखती है l कविवर्य बा.भ.

मुगाच्या डाळीचे इन्स्टेंट सूप

लेखक विवेकपटाईत यांनी बुधवार, 15/03/2023 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा एका मित्राच्या घरी मुगाच्या डाळीचे सूप प्यायला मिळाले. पातळ घोटलेली मुगाची डाळ त्यावर तूप आणि जिर्‍याची फोडणी. स्वाद चांगला होता. मुगाच्या डाळीत उत्तम प्रथिने असतात. पचायला ही हलकी असते. पण हॉस्पिटलवाल्या डाळीचा ठपका मुगाच्या डाळीवर लागलेला आहे. घरी कमीच बनते. मनात विचार आला आजकाल इन्स्टेंटचा जमाना आहे. पाच मिनिटांच्या आत आपण मुगाच्या डाळीचे सूप बनवू शकतो का? काल सकाळी सौ. ने उपमा केला होता. त्याच वेळी डोक्यातली ट्यूब लाईट पेटली. भाजलेला रवा उकळत्या पाण्यात टाकल्यानंतर दोन मिनिटात उपमा शिजतो.

तू जाताना...

लेखक Deepak Pawar यांनी बुधवार, 15/03/2023 09:59 या दिवशी प्रकाशित केले.
अश्रू जरा ओघळले तू जाताना ना शब्द ओठी फुटले तू जाताना... जलप्रलय यावा तैसा पूर नदीला आभाळ ही कोसळले तू जाताना... ती रात होती पुनवेची तेव्हा ही का चांदणे ना पडले तू जाताना...? हे वेदनेचे काटे रस्त्यातूनी ना फूल कोठे फुलले तू जाताना... उधळून जीवन गेले तेव्हा माझे वादळ जरासे उठले तू जाताना... ही वेस ओलांडूनी गेलीस तसे आधार सारे तुटले तू जाताना... दीपक पवार.
काव्यरस

शशक | नैवेद्यम

लेखक हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर यांनी मंगळवार, 14/03/2023 15:00 या दिवशी प्रकाशित केले.
“व्हॉट आर दे डुईंग नाऊ मामा?” “टोल्ड यु विहान, डिन्ट आय? कॉल मी आई, ओके? नाऊ दे आर ऑफेरिंग नैवेद्यम” “व्हॉट आर दे ऑफरिंग मा..आई?” “आय गेस भाजी-भाकरीए. भाजी इज ऑफ लिफी व्हेजी मे बी फेनुग्रीक, अँड भाकरी इज अ फ्लॅट ब्रेड मेड अप ऑफ मे बी बाजरा ऑर जोवार. सी, सी विठोबा लाईक्स ऑरगॅनिक फूड! या?” “शिल्पा, नॉट विठोबा, विठेश्वर!” “पापा, सॉरी, बाबा, माला आयडिया आली. मास्टरशेफ ज्यु फर्स्ट राऊंड साठी जोवार भाकरी बेस पिझ्झा विथ लिफी, अललॉट ऑफ व्हेजी टॉपिंग्स बनाउ?” “यु आर स्टील आफ्टर दॅट सिली शो? तुझे एम आय टी प्रेप क्लासेस नेक्स्ट वीक से शुरु होणार आहेत ना?

हळीवचे लाडू

लेखक Bhakti यांनी सोमवार, 13/03/2023 20:25 या दिवशी प्रकाशित केले.
पहिलाच प्रयत्न आहे,योग आला म्हणून बनवले :).थंडीमध्ये हे मुख्यतः हे लाडू खाल्ले जातात.हळीव हे पौष्टिक असे तेल-बी आहे. १०० ग्रॅम हळिवात तब्बल १०० मिलिग्रॅम आयर्न असते.