Skip to main content

अमेरिका-६ रस्ते आणि गाड्या

लेखक निमी यांनी मंगळवार, 15/08/2023 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
*रस्ते आणि गाड्या* दूरदर्शन मुंबईनंतर अन्य महाराष्ट्रात सुरू झालं तेव्हा बातम्या ऐकण्यासोबत बातम्या देणारे-देणाऱ्या दिसू लागल्या. त्याच काळात बातम्यांना हिंदीत समाचार आणि इंग्लिश मध्ये न्यूज म्हणतात हे कळलं. काही दिवसांनी माझ्या बाबांनी विचारलं,' NEWS शब्द कसा तयार झाला माहितीये का?' माझ्या चेहऱ्यावरचे सपशेल शरणागतीचे भाव समजून म्हणाले, 'चारही दिशांची आद्याक्षरे घेऊन म्हणजे North चे N, East चे E, West चे W, South चे S घेऊन NEWS शब्द तयार झालाय. दहावीपर्यंत भूगोलात 'गोल' मिळाला नसला तरी भारतीय आणि वैश्विक भौगोलिक ज्ञान आजतागायत अगाध राखण्याची किमया मला साधली आहे.

माझी ट्रेन माझी प्रेयसी (३)

लेखक हेमंतकुमार यांनी मंगळवार, 15/08/2023 07:13 या दिवशी प्रकाशित केले.
भाग २ इथे .. नमस्कार सर्वांना स्वातंत्र्य वर्धापन दिनाच्या शुभेच्छा ! अजून चार दिवसांनी या धाग्याच्या मागच्या भागाला एक वर्ष पूर्ण होणार आहे. परंतु आजच्या दिनाचे औचित्य साधून हा नवा भाग चालू करत आहे. नव्या वाचकांसाठी : सन 2017 मध्ये चालू झालेले हे सदर रेल्वेविषयक कुठलीही माहिती व अनुभव लिहिण्यासाठी आहे.

नैवेद्य

लेखक आकाश खोत यांनी सोमवार, 14/08/2023 08:39 या दिवशी प्रकाशित केले.
n सिंहगडावर जाताना या ठिकाणी एखाद्या कुठल्यातरी ट्रेकरने शिवरायांच्या मूर्तीसमोर ग्लुकोजच्या गोळ्या नैवेद्य दाखवावा तशा ठेवल्या होत्या. कल्पना तशी गमतीशीर आहे, पण छान आहे. त्यावरून मला काही वर्षांपूर्वीचा एक प्रसंग आठवला.

सध्या काय वाचताय?

लेखक प्रचेतस यांनी रविवार, 13/08/2023 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
बऱ्याच वर्षानी एक कादंबरी एकाच बैठकीत वाचून संपवली- हाकामारी -हृषीकेश गुप्ते. ही तशी जेमतेम १०० पानांची लघुकादंबरी, हल्ली इंटरनेट, व्हाट्सप, टीव्ही मुळे माझे वाचन प्रचंड मंदावले आहे, अगदी मध्यंतरी घेतलेले लॉर्ड्स ऑफ द डेक्कन हे पुस्तक आवडीचे असूनही निवांतपणेच वाचन सुरू होते, ते आज संपवले, आणि परवाच विकत घेतलेले 'हाकामारी' वाचण्यासाठी बाहेर काढून ठेवले, संध्याकाळी खरे तर बाहेर भटकायला जायचे होते पण कंटाळा केला आणि पुस्तक वाचायला घेतले आणि सुरुवातीपासूनच झपाटून गेलो, गुप्ते यांची दंशकाल ही कादंबरी, तसेच गानू आजीची गोष्ट वाचली होती.

जेव्हा त्याची नि माझी चोरून भेट झाली

लेखक बाजीगर यांनी रविवार, 13/08/2023 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
https://www.lokmat.com/pune/sharad-pawar-and-ajit-pawar-4-hours-secret-… जेव्हा त्याची नि माझी चोरून भेट झाली, झाली फुले स्वप्नांची, सीएम पद खरचं आले?!... दूरातल्या चॅनल चे पापाराझी मांडलेले, भिंगात कॅमेराचे ब्रेकींगन्यूज सांडलेले कैफात ही युतीची अन्‌ पालखी निघाली केस मधल्या जरंडेश्वर कारखान्यास गंध होता श्वासातल्या लयीचा आवेग अंध होता वेड्या समर्पणाची वेडी युती मिळाली जेव्हा त्याची नि माझी चोरून भेट झाली, झाली फुले स्वप्नांची, सीएम पद खरचं आले?!... नव्हतेच शब्द तेव्हा, म

अमेरिका ५ - व्हिजिट Nvidia

लेखक निमी यांनी शनिवार, 12/08/2023 21:05 या दिवशी प्रकाशित केले.
21 जून 2023 हा आंतरराष्ट्रीय योग दिवस ! आमचा योग आला याच दिवशी आमच्या मुलीच्या ऑफिसमध्ये पहिल्यांदा येण्याचा! तीचं कॅली मधील, बे तील Nvidia कंपनीचे हे एचक्यू! हे झालं शॉर्ट फॉर्म उत्तर.. समजेल असे उत्तर म्हणजे कॅलिफोर्नियातील बे एरिया भागातील Nvidia कंपनीचं एचक्यू म्हणजे हेडक्वार्टर. आवश्यक सिक्युरिटी चेक करून आम्ही आत आलो. अबब ! भली मोठी 4 मजली छतापर्यंत ओपन दिसणारी बिल्डिंग. पूर्ण छतावर सोलर पॅनल आणि उजेडासाठी ठिकठिकाणी ग्लास पॅनल्स् ! प्रत्येक मजल्यावर चहा-कॉफी-गरम पाणी देणारी पॅन्ट्री एरिया. तळमजल्यावर कॅफे वेगळा. त्यात वेगवेगळ्या देशाचे खाद्यपदार्थ मेन्यू रोज बदलणारे असतात.

एक संध्याकाळ हिमालयाच्या कुशीत ... देकार्त, फोरीए अन् माऊलींसोबत !

लेखक प्रसाद गोडबोले यांनी शनिवार, 12/08/2023 02:12 या दिवशी प्रकाशित केले.
मंदिराशेजारी घर असण्याचे काही फायदे असतात काही तोटे . तोटे म्हणजे बोलायलाच नको. कधीमधी अधुनमधुन काही ना काही ढ्यँड ढ्यँड ढ्यँड चालु असतेच . शिवाय तक्रार करायची सोय नाही. पण कदाचित हाच फायदा आहे . ही ही भोळ्याभाबड्या लोकांची प्रदर्शनप्रचुर भक्ती कम डोंबार्‍याचा खेळ पाहुनही शांत रहाता येणं ही एक साधनाच आहे म्हणा ! पण कधी कधी काहीतरी चांगलं कानावर पडतं अन बरं वाटतं. असेच नेहमीसारखीच दुपार. काहीबाही कोडींग करत बसलेलो. स्पीकरर्वर काही तरी चालु होतेच . पण आवाज कमी होता अन मंजुळही होता त्यामुळे त्याच्याकडे "लक्षपुर्वक दुर्लक्ष" करता येत होते.

हे‌ वाचा: शीतयुद्ध सदानंद

लेखक अनुस्वार यांनी शनिवार, 12/08/2023 01:23 या दिवशी प्रकाशित केले.
 कटाक्ष: लेखक - श्याम मनोहर प्रकाशक - पॉप्युलर प्रकाशन प्रथम आवृत्ती - १९८७, सध्या दुसरी आवृत्ती (२००७) (पुनर्मुद्रण २०२३) पृष्ठ संख्या - १२२ किंमत - ₹१७५ ओळख: या लघु-कादंबरीला अर्पणपत्रिका नाही तसेच प्रस्तावनाही नाही.

अमेरिका ४ - डस्टबिन

लेखक निमी यांनी गुरुवार, 10/08/2023 16:00 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वी प्रत्येक घरी एक सायकल असणं हे सामान्य, दुचाकी असणं हे भारी आणि चारचाकी असणं हे श्रीमंतीच लक्षण होतं. आता घरटी एक चारचाकी, माणशी एक दुचाकी आणि घरातल्या लोकांच्या निम्म्यान सायकली असतात. त्याचप्रमाणे आपल्याकडे भारतात एक-दोन कचऱ्याचे डबे असतात, अर्थात डस्टबिन असतात ! इथे अमेरिकेत मात्र माणशी अंदाजे चार डस्टबीन असतात. किचनजवळ विघटक आणि अविघटक अर्थात डिग्रेडेबल आणि नॉन डिग्रेडेबल गोष्टींसाठी मोठी मोठी डस्टबिन असतात. आपला गुडघा ते कंबर या उंचीची डस्टबिन घरात पाहून वस्तू खातात की फेकतात अशी शंका येते.

चांद्रयान ३

लेखक कर्नलतपस्वी यांनी बुधवार, 09/08/2023 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
चांद माझा हांसरा, उधाण येई सागरा चंद्र उगवला नभी, लाजली वसुंधरा स्मरणातील रुप तुझे जे कवीने रेखले चांदभरल्या रातीतले स्वप्न आज भंगले चंद्रमुखी तू मेघसावळी कसे म्हणू मी.... क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव पडो मरणाचा कसे म्हणू मी..... आता कसे म्हणू मी चंद्र उगवले दोन एक चंद्र अंबरी,एक मंचकावरी कसे म्हणू मी..... ...... ...... होईल वर्षाव लाटण्यांचा. जेव्हां तुझ्या नजीक चांद्रयान तीन पोहचले अन् नव रुप तुझे यान चक्षुंनी पाहिले यान चक्षुंनी जे दाविले,ते मी ही पाहिले.... ओळखीचे रुप तुझे न उरले बघुन पाहता नव रुप तुझे, आले डोळे भरून झेपावतील का लाटा,करतील का कवने? पाहीले खरे जे रूप तुझे चंद्र