Skip to main content

श्रीगणेशोत्सव - एक ऐतिहासिक कविता

लेखक प्रसाद गोडबोले यांनी मंगळवार, 19/09/2023 00:48 या दिवशी प्रकाशित केले.
श्रीगणेशोत्सवानिमित्त महात्मा फुले ह्यांचा एक सुप्रसिध्द अखंड एक गोष्ट आजकाल प्रकर्षाने जाणवते आहे की आजच्या काळात लोकं जास्त वाचन करीत नाहीत, जुने ऐतिहासिक लेखन वाचत नाहीत. नुसतेच कोठेतरी काहीतरी वाचुन मते बनवतात. इन्स्टाग्राम रील्स आणि व्हॉट्सॅप युनिव्हर्सिटीच्या काळात आपल्या देशातील लोकोत्तर महापुरुष आणि त्यांचे अभिजात लेखन काळाच्या पडद्याआड चालले आहे , हे पाहुन फार खंत वाटते. विशेष करुन शाहु फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात ही समाज सुधारकांची विचारधारा अशी लुप्त होत जाणे हे अत्यंत निराशाजनक आहे.

श्री गणेश लेखमाला २०२३ - ॥ श्रीगणेश स्तवन ॥

लेखक मी-दिपाली यांनी मंगळवार, 19/09/2023 00:22 या दिवशी प्रकाशित केले.
. ॥ श्रीगणेश स्तवन ॥ जय गिरिजात्मज हे गणनायक तू सकळांत कलाधिपती वरदविनायक विघ्नविनाशक तू प्रतिपाळक या जगती ॥ध्रु॥ तिलकविलेपित चंदनगंधित चंद्रविराजित भाळ तुझे मुदित चतुर्भुज रूप मनोहर तेज मुखावर दिव्य सजे सुमुख तुझे स्मरता अवघे खल, पापविचार, दशा हरती वरदविनायक विघ्नविनाशक तू प्रतिपाळक या जगती ॥१॥ मुनिजनपूजित वेदपुरस्कृत लौकिक सर्व दिशांत वसे

श्रीगणेश लेखमाला २०२३ - बाप्पा आणि हुळ्ळुळ्ळु बुळ्ळुळ्ळु

लेखक आजी यांनी मंगळवार, 19/09/2023 00:01 या दिवशी प्रकाशित केले.
गणपती उत्सवाचे दिवस आहेत. वाजतगाजत गणपतीचं आगमन झालंय. कुठे दीड दिवसांचा गणपती असतो, तर कुठे पाच दिवसांचा. कुठे सात दिवसांचा, तर कुठे दहा दिवसांचा. गणेशचतुर्थी ते अनंत चतुर्दशी असा दहा दिवसांचा हा उत्सव असतो. गणपतीची आई गौरी. तीसुद्धा या उत्सवात येते. तिच्या येण्याचा दिवस, जेवणाचा दिवस आणि ती जाण्याचा दिवस,असे तीन दिवस ती असते. काही घरांमध्ये गौरी-गणपती एकदमच जातात. काही ठिकाणी उभ्या गौरी असतात, तर काही ठिकाणी पाणवठ्यावरचे पाच खडे पाण्याने भिजवून ते आंब्याच्या पानांनी सजवलेल्या कलशात ठेवतात. त्याच गौरी. गणपतीबाप्पा आले की की सगळीकडे उत्साह संचारतो. त्याच्यासाठी मखर सजवलं जातं.

नाईन इलेव्हन - Twin To-Worse: भाग १

लेखक टर्मीनेटर यांनी सोमवार, 18/09/2023 19:18 या दिवशी प्रकाशित केले.

लहानपणापासूनच आयुष्यात अनेक दुःखदायक प्रसंगांना सामोरे गेलेल्या सोफीया डंकवर्थच्या आयुष्यात सुमारे पावणेदोन वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या तिच्या पुस्तकाला १७ नोव्हेंबर २०२२ रोजी मानाचा समजला जाणारा 'नॅशनल बुक अवॉर्ड' जाहीर झाल्या दिवसानंतर उण्यापुऱ्या दहा महिन्यांनी आज आणखीन एक अभिमानास्पद आणि आनंददायी असा दिवस आला होता.

योद्धा

लेखक कर्नलतपस्वी यांनी सोमवार, 18/09/2023 08:48 या दिवशी प्रकाशित केले.
दुःख माझे मी कसे,सांभाळीले ठाऊक नाही, घाव जे शिरी सोसले,उरलो कसा ठाऊक नाही. . वेदना झाल्या तरीही,मूक मी का राहिलो, जखमा उरी घेऊनी,फिरलो कसा ठाऊक नाही. . हाक ना आली कुठूनी,साद ही ना पोचली, अंधारलेल्या वाटेवरी,शिरलो कसा ठाऊक नाही. . सुख झाले पाहुणा अन दुःख झाले सोबती, जिंकतानाच नेमके,हरलो कसा ठाऊक नाही. . सावलीतही जाणवे ते,ऊन तापलेले किती, श्वासातल्या धाग्यातूनी,विरलो कसा ठाऊक नाही. . कटिबद्ध होती ती,विपुल शस्त्रसंभार होता नि:शस्त्र मी,अगतीक मी,कसा पुरलो ठाऊक नाही - कवी योगेश