पाकिस्तान - १
दरबार-ए-वतन में जब इक दिन सब जाने वाले जाएँगे
कुछ अपनी सज़ा को पहुँचेंगे, कुछ अपनी जज़ा ले जाएँगे
-फ़ैज अहमद फ़ैज
16 ऑक्टोबर 1951. कंपनी बाग, रावळपिंडी.
त्या दिवशी, लियाकात अली खान एक लाखाच्या जनसमुदायाला संबोधित करण्यासाठी मंचावर जात असताना आपल्या समोर संपूर्ण देश जमलेला पाहत होते. जे स्वप्न त्यांनी, मोहम्मद अली जिना, सुहरावर्दी, अल्लामा इक्बाल आणि इतर अनेकांनी एकत्र पाहिले होते. ब्रिटिश भारतातील मुस्लिमांसाठी एक पाकिस्तान.
पण पाकिस्तान हा शब्द कसा अस्तित्वात आला?
हजारो वर्षांपासून मुस्लिम भारतात राहत होते, पण त्यांच्या जिभेवर हा शब्द कधी आला नव्हता.
मिसळपाव
कोपहेगन मधले ‘अर्बन हाऊस’ हे एक मस्त डॉर्मिटरी - टाईप हॉटेल होतं. काॅमन किचन, खाली छोटा बार, खेळायला टेबल टेनिस, फूटबाॅल वगैरे होतं. इथे मुख्यतः काॅलेजच्या सुट्टीवर आलेले मुलं मुली होते. इथे नवीन समजलं की टॅप वॉटर, म्हणजे बेसीनला येणारं पाणीच लोक पिण्यासाठी वापरतात. वापरायचं वेगळं आणि प्यायचं वेगळं असा काही प्रकार नव्हता. आम्हाला खोली उशीरा मिळणार होती म्हणून आम्ही तिथेच वाट पाहत बसलो.