तात्या ......... !
तात्या वारला !
चंद्रशेखर अभ्यंकर असं भारदस्त नाव धारण केलेला हा आडमाप माणूस - वयाने आणि आकाराने माझ्यापेक्षा बराच मोठा होता. मोठा असूनही त्याला कधी अहोजाहो केलं नाही. तो वारला हे भिडेखातर लिहितोय - तात्या मेला अस लिहिलं पाहिजे.
काही वर्षापूर्वी भारतात होतो तेव्हा तात्याच्या अनेक भेटी व्हायच्या. सोशल मीडियातून मला भरगच्च मित्र मिळाले. पुढे वेगवेगळ्या कारणांनी सगळेच दुरावले - त्यातला तात्या प्रमुख ! फेसबुक आणि ऑर्कुट लोकप्रिय व्हायच्या आधी - मिसळ पाव हा नव्या मराठी लेखकांचा अड्डा होता. तात्या त्यातला मुख्य माणूस.
मिसळपाव
समथिंग इज मिसिंग असं वाटतं असतांनाच काही मराठी सिनेमे मन गाभाऱ्याशी पुन्हा नाळ जुळवून देतात.नाळ सिनेमाने आई आणि मुल या नात्याची वेगळीच कथा दाखवली होती.चैत्याचा गोड निरागस वावर ,त्याची आईच्या नजरेत भरण्याची हुरहूर सगळं कसं अलगद तरीही मनात वेगाने घडत होतं.
त्याच चैत्याची मोठी झाल्यावर एकाच नाळाने ज