मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पाऊले चालती … विडंबन

OBAMA80 · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
पाऊले चालती बीजेपीची वाट सद्य पक्षाची सोडूनिया साथ गांजुनिया भारी इडी चौकशीने पडता हातात बेड्यांची माळ पाऊले चालती … अण्णा आबा नेते कार्यकर्ते ते पाहुनिया सारे फिरविती पाठ पाऊले चालती … येता होकार श्री पक्षश्रेष्ठींचा तसा चौकशीचा व्हावा नायनाट पाऊले चालती … सारे शांत होता पुन्हा लागे ओढ तस्सा वाहू लागे भ्रष्टाचाराचा पाट पाऊले चालती …

वाचने 1598 वाचनखूण प्रतिक्रिया 4