Skip to main content

कुठे हरवली टूथपावडर ?

लेखक vcdatrange यांनी गुरुवार, 11/07/2024 16:07 या दिवशी प्रकाशित केले.
Porter’s five forces analysis चे स्टडी नोट्स वाचत असताना असाच आमच्या काळातलं एक प्रोडक्ट आठवलं. दात घासण्यासाठी शुभ्र सफेद गोडसर चवीची टूथ पावडर टीनच्या डब्यात यायची. आता केवळ Online विक्रीस उपलब्ध असलेली टूथ पावडर अस्तंगत कधी आणि का झाली? मीठ, खडू किंवा बेकिंग सोडा असलेले घरगुती आणि उत्पादित टूथ पावडर 19 व्या शतकात त्यांच्या लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले. टूथ पावडरची उत्पत्ती हजारो वर्षांपूर्वी झाली असे मानले जाते.

द ग्रेट निकोबार आयलंड (GNI) विकास प्रकल्प आता 'रखडणार' कि 'साकारणार'?

लेखक टर्मीनेटर यांनी बुधवार, 10/07/2024 17:10 या दिवशी प्रकाशित केले.

१७ जून २०२४ रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस (संपर्क) आणि राज्यसभा खासदार जयराम रमेश ह्यांनी जारी केलेल्या निवेदनात 'ग्रेट निकोबार' येथील प्रकल्पांसाठी दिलेल्या सर्व मंजुरी तात्काळ स्थगित करण्याची आणि संबंधित संसदीय समित्यांकडून छाननीसह प्रस्तावित प्रकल्पाचा सखोल आढावा घेण्याची मागणी केल्यावर भारताचा 'द ग्रेट निकोबार आयलंड (GNI) विकास प्रकल्प' हा अति

गझल

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी सोमवार, 08/07/2024 22:27 या दिवशी प्रकाशित केले.
गझल संध्याकाळची वेळ . मोठं रोमँटिक वातावरण ! बाहेर मुसळधार पाऊस. धरतीशी लडिवाळ नाही तर जोरकस सलगी करणाऱ्या आषाढसरी ! त्या सभागृहात कार्यक्रम रंगात आला होता . गझलांचा कार्यक्रम. शांतपणे ,आतल्या अगदी आतल्या जखमा कुरवाळणारा . तुडुंब गर्दी होती. त्यातही तरुणाईची खरी गर्दी . बाकी थोडीफार पिकली पानं होती ; पण ती घरी वेळ जात नाही म्हणून आलेली . कारण तसंच होतं ना. कार्यक्रम शामकुमारचा होता . तरुण , राजबिंडा ,नवोदित गझल गायक . पण तयारी अशी की पार बुजुर्ग वाटावा . त्यामुळेच तर गर्दी होती आणि तरुण मुलांची जास्त अन हो मुलींचीही . असतं वय एखाद्यावर जीव टाकायचं . येड लागायचं .

केरळ कन्याकुमारी लेखमाला: दिवस पहिला- कलाडी ते मुन्नार

लेखक श्वेता२४ यांनी सोमवार, 08/07/2024 20:17 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचा भाग 1)पूर्वतयारी

     सहलीचा पहिला दिवस उजाडला. आज आम्हाला कलाडी या आद्य शंकराचार्यांच्या जन्मगावी भेट देऊन पुढे मुन्नारला पोहोचायचे होते. सकाळी आम्ही लवकर उठून आंघोळी करून आठ वाजेपर्यंत तयार झालो. हॉटेल मालकांनी अर्धा तासात ऑर्डर प्रमाणे नाश्ता बनवून देण्यात येईल म्हणून सांगितले. तथापि आम्हाला तेवढा वेळ नव्हता. त्यामुळे आम्ही चहा मागवला. नुकतीच दिवाळी झाल्यामुळे तसेच सासूबाईंना सकाळची गोळी घ्यायची असल्यामुळे फराळ सोबत ठेवला होता. आम्ही चहा व फराळ करून घेतला.

"प्रेतात्म्यांची जत्रा" पुढे चालू.

लेखक भागो यांनी सोमवार, 08/07/2024 18:13 या दिवशी प्रकाशित केले.
अरे हा एक गोष्ट सांगायची राहून गेली. नायिकेची भूमिका –मेरीची- करणाऱ्या Candace Hilligoss ह्या अभिनेत्रीला ह्या भूमिकेसाठी मेहेनताना म्हणून २००० डॉलर्स फी देण्यात आली. त्या फी वर ती प्रचंड खुश झाली. तिचा नवरा हॉटेलमधे वेटरचे काम करत होता. त्याने तत्काळ नोकरी सोडून दिली. त्याला अभिनेता म्हणून करिअर करायचे होते. त्याला लगेच ब्रॉडवे वर संधी पण मिळाली. हार्वेने चित्रपट पूर्ण तर केला. हार्वेसाठी हा तसा सोप्पा भाग होता. पण आता वितरकाला पकडायचे होते. अश्या “बी-ग्रेड” सिनेमा वितरणाची जबाबदारी कोण घेणार? अखेर तोही मिळाला. हर्ट्झ-लायन नावाच्या कंपनीने ही जबाबदारी अंगावर घेतली.

आपण IDIOT झालो आहोत का?

लेखक kool.amol यांनी सोमवार, 08/07/2024 11:10 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच डॉक्टर्स डे साजरा झाला. डॉक्टर लोकांविषयी आपल्याकडे सर्व प्रकारच्या भावना आणि मतं आहेत. मी स्वतः डॉक्टर नाही. डॉक्टर होण्यासाठी आवश्यक शैक्षणिक गुणवत्ता मी सिद्ध करू शकलो नाही पण माझे मित्र, मैत्रिणी आणि काही नातेवाईक डॉक्टर आहेत. मी जिथे काम करतो त्या टिम मध्ये मी सोडून सगळे डॉक्टर आहेत त्यामुळे ह्या क्षेत्रातल्या बातम्या, चर्चा रोज कानावर पडत असतात. त्यामुळे माझ्याकडे ह्या क्षेत्रातील थोडी माहिती असते. काही दिवसांपूर्वी माझ्या एका सहकारी मैत्रिणीकडून कोणाचा तरी उल्लेख IDIOT syndrome चा बळी असा करण्यात आला.

"प्रेतात्म्यांची जत्रा" एक सिने परीक्षण.

लेखक भागो यांनी सोमवार, 08/07/2024 07:49 या दिवशी प्रकाशित केले.
कार्निवाल ऑफ सोल्स हा एक विचित्र, अविस्मरणीय आणि विशेष म्हणजे अत्यंत कमी खर्चात बनवलेला भीती चित्रपट आहे. ही चर्चमध्ये ऑर्गन वाजवणाऱ्या एका स्त्रीची करूण कहाणी आहे. (चित्रपटात नायक नाहीये. ह्या नायिकेच्याच भोवती हा चित्रपट बेतला आहे.) तिला एका अमानवी चेहेऱ्याने पछाडले आहे. नायिका नुकतीच एका जीवघेण्या अपघातातून वाचली आहे. मरणारच होती पण वाचली. मोटारगाडीतून मैत्रीणींबरोबर प्रवास करताना तिची गाडी पुलाचा कठडा तोडून नदीत पडते. हा ह्या चित्रपटातील सुरवातीचा सीन आहे. सुरवात बघताना प्रेक्षकाला अशी भावना वाटते कि ह्या प्रिंटमध्ये काहीतरी गडबड आहे. आपण मधूनच सिनेमा बघत आहोत.