बीबीसीआय ला जीआयपीचा डबा - रेल्वे ब्लूपर्स
आपले दिग्दर्शक रेल्वेचे सीन्स दाखवताना अनेकदा तपशीलांकडे दुर्लक्ष करतात. एरव्हीच्या सहज जाणवणार्या अचाटपणापेक्षा हे थोडे वेगळे आहे. रेल्वे सीन्स मधे जर ढोबळ पणे एक गाडी दाखवत आहेत इतक्याच इण्टरेस्ट ने तुम्ही हे सीन्स पाहिलेत तर कदाचित काहीच खटकणार नाही. पण जरा 'रेल फॅन च्या नजरेतून' नीट पाहिलेत अशा सीन्स मधल्या तपशीलाच्या चुका लगेच जाणवतील आणि पटतील.
काही वेळा खूप तपशीलात न शिरता सीन असतो. फक्त एका रॅण्ड्म गाडीच्या टपावरून. तेथे काही गोची असण्याची शक्यता कमी असते. काही जुन्या गाण्यांमधे डब्याच्या आतले सीन्स आहेत.
मिसळपाव
लोकल ट्रेनच्या दरवाजात उभ्या राहिलेल्या मुलाचे जॅकेट पहा, कसे वारा भरल्याने फुग्यासारखे टम्म् फुगले आहे ते !!!