सीडीओ
जागतिक अर्थकारणात (जिचे परिणाम अजूनही बर्याच प्रमाणात अस्तित्वात आहेत) गेली जागतिक मंदी हा एक मोठा अध्याय आहे. त्यात महत्त्वाच्या भूमिका बजावलेल्या "सीडीओ" या खलनायकाचा उल्लेख वारंवार येतो. पण त्याबद्दल सर्वसामान्य जनतेत "भारी पण अगम्य भूत" अशीच भावना आहे. आताही मिपावरच चाललेल्या "निश्चलनीकरण सर्वेक्षण" या लेखातील प्रतिसादांत सीडिओंचा उल्लेख आला. तेथे छोटा प्रतिसाद लिहू म्हणता म्हणता तो मारुतीच्या शेपटीप्रमाणे वाढत गेला ! तेव्हा, तेथे विषयांतर करण्यापेक्षा वेगळा लेख लिहावे असे ठरवले.
गूढ अंधारातील जग -३
गूढ अंधारातील जग -३
पाणबुडीतील आयुष्य
पाणबुडीत आयुष्य फार खडतर असतं. ते म्हणेज अक्षरशः तुम्ही एखाद्या यंत्राच्या आत मध्ये राहण्यासारखे असते जेथे हवा पाणी आणि जागा या तिन्ही गोष्टी दुर्मीळ असतात. कारण पाणबुडीचा आकार जितका लहान करता येईल तितका चांगला (तिला लपणे तितके जास्त सोपे होते) आणि आहे त्या जागेत जास्तीत जास्त अस्त्रे संवेदक(sensors) बॅटरी भरता येतील तितके भरले जाते. त्यातून या खडतर जागेत काम करताना लोकांच्या हातून काम बिनचूक होणे अत्यावश्यक असते अन्यथा सर्वच्या सर्व लोकांच्या जीवाला धोका होऊ शकतो.
संघटनांचे एकीकरण आणि शेतकरी आंदोलनाची धग !
संघटनांचे एकीकरण आणि शेतकरी आंदोलनाची धग !
सध्याचा काळ गुलाबी थंडीचा..या काळात सर्वत्र आल्हादायक आणि शांत वातवरण असते. खरीपाचा हंगाम संपून रब्बीची पेरणी झाल्याने शेतकरी ही या काळात काहीसा 'थंड' असतो. नाही म्हणायला खरिपाचा शेतीमाल विक्री आणि कापसासारखं नगदी पीक घरात येण्याचा काळ असल्याने त्याच्याही हातात दोन पैसे खेळू लागलेले असतात. अर्थात, हे चित्र आता इतिहासजमा झाल्यासारखे असल्याने शेतकऱयांची झोप उडालेली आहे. डोक्यावरील वाढता कर्जाचा डोंगर आणि कवडीमोल भावात विकला जाणारा शेतीमाल पाहून गुलाबी थंडीतही शेतकऱयांच्या अंगाची लाही लाही होत आहे.
Making of photo and status : ७. गोलुमोलु
प्रस्तावना : ज्यांची प्रस्तावना वाचायची राहून गेली असेल, त्यांनी ती वाचण्याकरिता कृपया खाली दिलेल्या लिंकवर हळुवारपणे टिचकी मारावी.
http://www.misalpav.com/node/41232
काय ? कसं काय ? ठिक आहे ना ? येता का सोबतीला ? जाऊ आपलं सावकाश रांगत रांगत जोडीने नाक्यापर्यंत, दुध आणायला.
काय ? कसं काय ? ठिक आहे ना ? येता का सोबतीला ? जाऊ आपलं सावकाश रांगत रांगत जोडीने नाक्यापर्यंत, दुध आणायला.चारठाण्याचे शिल्प वैभव- बरेचसे अप्रसिद्ध
चारठाण्याचे शिल्प वैभव- बरेचसे अप्रसिद्ध
चारठाणा हे माझ्या सासुबाईचे माहेरगाव. म्हणजे त्या तिथे अगदी जन्मल्या किंवा लहानाच्या मोठ्या झाल्या नाहीत पण वडीलांचे मूळ गाव म्हणून जाणे येणे कायम होते, आजही आहे.काकांची शेतीभाती आहे, जुने घर आहे अगदी माळदाचे. माळद हा छप्पराचा एक प्रकार असतो मराठवाड्याच्या तुफान गरमीत माळदाचे घर म्हणजे एअर कंडीशंड... एवढेच नाहीतर ह्या माळदाच्या छतात दागिने, पैसे ते अगदी वेळ पडली तर हैद्राबाद मुक्ती संग्रामातले क्रांतिकारकही लपत. असे ते जाड भक्कम छत. पण ह्या माळदाच्या छतात सापही वस्तीला असतात त्यामुळे जेवताना झोपताना वरून साप अंगावर पडणे अगदी नित्याचे नसले तरी सवयीचे.
राणी एलिझाबेथ, साधी एलिझाबेथ.
राणी एलिझाबेथ, साधी एलिझाबेथ.
[ही एक रूपककथा. लावू तितके अर्थ. करू तसा विचार.]
एक होती राणी एलिझाबेथ. दुसरी होती साधी एलिझाबेथ. दोघींचाही आपापल्या मामांवर भारी जीव होता. मामांचाही त्यांच्यावर. एके दिवशी घरात अचानक गर्दी दिसू लागली. गर्दीतच मामा झोपलेला दिसला. शेलाट्या अंग काठीचा मामा एकदम जाडसर दिसू लागला. त्याच्या अंगा खांद्यावर कसली कसली हारफुलं घातली जाऊ लागली.
साधी एलिझाबेथ मामाजवळ जायचा हट्ट धरते. राणी एलिझाबेथ सगळे प्रोटोकॉल्स सांभाळत, मूक अश्रू गाळीत उभी राहते. जराशाने आपले कोणच ऐकत नाही म्हटल्यावर, साधी एलिझाबेथ रडून रडून हलकल्लोळ माजवते.
पसायदानातील समतोलाचे एक आगळेपण
नियमीतपणे छानशा बोलीभाषेतून बाल कविता करणार्या एका (#) कवि महोदयांच्या सहज म्हणून लिहिलेल्या एका कवितेकडे माझ्या छिद्रन्वेषी स्वभावाने लक्ष वेधले. कवितेतील वेगवेगळ्या पशुपक्षांना आपल्या स्वभाव वैशिष्ट्याचाच कंटाळा आलेला असतो. जसे की मांजर म्हणते की मी म्याऊ म्याऊच कधी पर्यंत म्हणू? कोंबडी म्हणते कुकूचकू करून कंटाळ्चा आलाय, तर कावळा म्हणतो मी काळाच रहाणार का ?
मी कविंना विचारले की न्यूनगंड असू नये असा काही बोध अभिप्रेत आहे का ? संवादातून लक्षात आले की कविच्या बाल कवितेचा उद्देश बोध नव्हे केवळ रंजन होता.
रुद्रम
श्वेतांबरा ही मराठीतली पहिली सिरियल आठवते. ती बघताना त्यांत अनेक त्रुटी असूनही ती उत्सुकतेने शेवटपर्यंत बघितली. फक्त, त्याचा शेवट झाल्यावर, शेवटच्या भागात जो,'अहो रुपम अहो ध्वनिम' चा कार्यक्रम झाला तो हास्यास्पद होता. पुढे फक्त दूरदर्शनची सद्दी होती तोपर्यंत अनेक चांगल्या-बर्या मालिका बघितल्या. नंतर प्रायव्हेट चॅनेल आले आणि काही बर्यापैकी सिरियल बघायला मिळाल्या. शेवटची सिरियल बघितल्याची आठवते ती 'या गोजिरवाण्या घरांत'! पण ती फारच पाणी घालून वाढवायला लागल्यावर बघणे बंद केले. त्यानंतर कुठलीही मराठी किंवा हिंदी सिरियल बघायची नाही हे ठरवून टाकले. तो नियम अगदी यावर्षीपर्यंत कटाक्षाने पाळला.
जपमाळ
हेही बरेच आहे,
तेही बरेच होते,
आपापल्या परीने,
सारे खरेच होते
मोजून पाप माझे
जपमाळ ओवलेली,
मोक्षास गाठण्याला,
तितके पुरेचं होते,
आयुष्य तारकांचे
मोजीत रात्र होती
मोहक असे मनाला
भूलवीत बरेच होते
खाणीत नांदण्याचा
कोळश्यास शाप आहे
नसते ठिसूळ तुकडे
तर तेही हिरेच होते
सरणास भेटताना
गेली नजर मागे
चेहरे ओळखीचे
हसरे सारेच होते
-शैलेंद्र
काव्यरस
मिसळपाव