विसंगत धोरणं; शिक्षण व्यवस्थेच्या मुळावर?
प्राथामिक शिक्षणाच्या दर्जाबाबत यापूवी विविध माध्यमातून बरीच चर्चा झाली आहे. शिक्षणाच्या पारंपरिक ढाच्यात सुधारणा करण्यासाठी आजवर अनेक नवनवीन धोरणे राबविण्यात आली. निश्चितच काही सकारात्मक बदल यामुळे शिक्षण क्षेत्रात दिसून येत आहेत. मात्र सततची बदलणारी धोरणे. आणि, उद्देश आणि अंलबजावणी यात झालेली विसंगती, यामुळे सुधारणांपेक्षा संभ्रमाचेचं वातावरण शिक्षण क्षेत्रात अधिक दिसून येते. बदली, बढती, निवृत्ती याबाबत नेहमी बदलणाऱ्या निर्णयांमुळे शिक्षक व्यथित आहे. तर, गुणवत्ता वाढीसाठी केल्या जाणाऱ्या निरनिराळ्या प्रयोगामुळे विध्यार्थी गोंधळात..बरं, धोरण ठरविणारं शिक्षण खातं ही ठाम आहे, असं दिसत नाही.
चौथे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबईत
१८ नोव्हेंबर २०१७ : महाराष्ट्र टाईम्स । मुंबई
चौथे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबईत
सुरमई एनपॅपिलो
बरेच दिवस स्वयंपाकघरात हात साफ केला नव्हता म्हणून आणि शेफ केडी व जॅक ऑफ ऑल यांनी फोटो टाकून टाकून जळवले म्हणून एकदाची किचनमध्ये एंट्री मारलीच..
स्वतः मासे फ्राय करण्याची लज्जत मागच्या वर्षी अनुभवली होती म्हणून मासे हाच प्रकार निवडला आणि आमचे द्रोणाचार्य शेफ केडींना शरण जाऊन "माशांचा एखादा वेगळा प्रकार करायचा आहे. काय करू..?" असे विचारले.
शेफ केडी यांनी "अरे बेटा.. दॅट्स व्हाय यू शूड कॉल मी..!!" असे बोलून चांगली व ताजी भाजी कुठे मिळेल, मासे कुठे मिळतील याची इत्यंभूत माहिती दिली.एनपॅपिलो या प्रकाराची ओळखही करून दिली.
बघ जरा झोळीत माझ्या काय आहे….
बघ जरा झोळीत माझ्या काय आहे….
....रंग-रेषा लांघणारे चित्र आहे
….वाचण्याला चांगदेवी पत्र आहे
….तप्तसूर्यावर उन्हाचे छत्र आहे
….सावळी आदित्यगर्भी रात्र आहे
...मुक्तीच्या पाशात वेडे गात्र आहे
…शत्रूला भुलवेल इतके मैत्र आहे
…फाल्गुनाला खेटुनी बघ चैत्र आहे
…वास्तवाला तोलणारे यंत्र आहे
… प्राणफुंकर घालणारा मंत्र आहे
…अद्भुताचे इन्द्रजाली स्तोत्र आहे
....अंत ना आदि असे घटिपात्र आहे ...
....बघ जरा झोळीत माझ्या काय आहे….
.....बघ जरा कवितेत माझ्या काय आहे
काव्यरस
बॉलीवूडचे तारे - संजय मिश्रा
बॉलीवूडच्या चमचमत्या दुनियेत सुंदर दिसणे खूप जास्त महत्वाचे मानले जाते . गेल्या काही वर्षात मात्र हे सारी समीकरण बदलत चालली आहेत . आलिशान बंगले ,इंपोर्टेड गाड्या , सुटमधे झोपणारे अभिनेते हे फक्त काही निवडक निर्मात्यांच्या चित्रपटामधूनच दिसत आहे . सिनेमा अधिकाधिक सत्य जीवनाच्या जवळ चालला आहे आणि ह्यामुळेच तुमच्या आमच्या सारखे दिसणारे , वावरणारे अभिनेते पडद्यावर ठळकपणे उठून दिसत आहेत .
देवकुंड...............एक स्वर्गीय अनुभव
मी माझ्या भटक्या मित्रांसोबत सकाळी ६ वाजता पुण्याहून देवकुंडच्या दिशेने निघालो. कात्रज, चांदणी चौक, मुळाशी मार्गे ताम्हिणी घाटातून नागमोडी वळणे घेत आम्ही भिरा ह्या बेसपॉईंटला ९ च्या सुमारास पोहचलो. तशी थंडी जास्त नव्हती पण भूक मात्र सपाटून लागली होती त्यामुळे पोटाची भूक शांत करून सोबत एक गाईड घेऊन डोळ्याची आणि मनाची भूक शांत करण्यासाठी आम्ही देवकुंडाच्या प्रवासासाठी निघालो. गेल्या काही काळात झालेल्या दुर्दैवी अपघातांमुळे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी फॉरेस्ट डिपार्टमेंटने सोबत गाईड घेऊन जाणे बंधनकारक केले आहे.
अण्णा
अण्णा
---------
एम.बी.बी.एस. झाल्यावर मी निर्णय घेतला आता आपण प्रॅक्टिस करायची ती एखाद्या खेडेगावात. माझ्या या निर्णयाचं सगळ्यांना आश्चर्य वाटलं. पण मी माझ्या निश्चयावर ठाम होतो. आणि त्यानुसार कोकणातल्या त्या निसर्गरम्य खेड्यात मी डॉक्टरकीला सुरुवात केली. पैसा अर्थातच भरपूर नव्हता. पण पोटापुरतं मिळत होतं. पण विशेष म्हणजे शहराची धावपळ नव्हती. स्वस्थ निवांत आयुष्य चाललं होतं.
अशात एके दिवशी क्लिनिकवर रंगा बोलवायला आला. शेजारच्या वाडीत कुणीतरी वृद्ध गृहस्थ आजारी होते. मी नाव विचारलं.
“अण्णा दळवी”,रंगा म्हणाला.
“अण्णा दळवी?” मला नाव ओळखीचं वाटलं.
“अण्णा दळवी म्हणजे ते प्रसिद्ध लेखक 'श्री.ना.
आरक्षण
"आरक्षण - योग्य कि अयोग्य" या विषयावर चर्चेसाठी मला TV वर बोलावण्यात आलं होतं. चर्चेत प्रत्येक जण आपापल्या भूमिकेतून आरक्षणाविषयी मत मांडत होता. कोणी तात्विक आणि तर्कशुद्ध मत मांडून आरक्षण हे कसे वरवरचे मलम आहे आणि याने प्रश्न सुटण्याऐवजी वाढतच कसे जाणार आहेत असे पटवून देऊ पाहत होता तर कोणी ऐतिहासिक दाखले देऊन आरक्षण हि कशी सामाजिक गरज आहे हे दाखवू पाहत होता. काही चाणाक्ष लोक आरक्षणाचा मुद्दा बरोबर आहे पण त्याची अंमलबजावणी चुकीची आहे असा दोन्ही पक्षांना नाराज न करणारा सावध पवित्रा घेत होते. चर्चेला उधाण आले होते पण निष्पन्न काहीच होत नव्हते. तेवढ्यात एकजण म्हणाला "लै तर्क लावू नका.
मिसळपाव