लग्नानंतरची गुरुकिल्ली
पाऊल टाकता घरात , उघडावे ते कपाट ,
बदलावे सारे कपडे , राहुनी गप मुकाट
चहा झाला तरीही , प्यावासा वाटला तरीही
कप गुमान धुवून घ्यावा , देईल तेव्हढाच प्यावा
इथे तिथे बघावे नंतर , ठेवुनी एक माफक अंतर
हळूच जेवणाबद्दल पुसावे
येता आवाज तो करडा , होईल तेव्हाच खावे
चालेल थोडे कमी असले मीठ , चालेल थोडा असला कमी मसाला
आवाज ना करता गप्प उठावे , हलकेच टाकावे बेसिनला
काडीची चव नसली , तरीही गोडवे खुशाल गावे
हलकेच आठवूनी जेवण ऑफिसातले , दात कोरत बसावे
येता भांड्याचा आवाज फार , हळूच बंद करावे दार , बेडरूमचे
मुलांना जवळ घ्यावे , आणि त्यांच्या अभ्यासात रममाण व्हावे
थोडे दटावावे अभ्यासावरूनी
काव्यरस
मिसळपाव
१. हनुमान मंदिरामागील पुष्करणी, माणिकपुंज
पाटणादेवी-पितळखोरा ट्रेक करायचे ब-याच दिवसांपासून घाटत होते. २४ जानेवारीला ठाण्यातून निघेपर्यंत रात्रीचे साडेदहा वाजले. पुढे पावणेतीनशे किमीचा प्रवास होता. सियाझमध्ये पाच जण आणि डिकी सामान आणि पाण्यानी ठासून भरलेली होती.