Skip to main content

दोसतार - ४

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 07/04/2018 08:37 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवा : https://misalpav.com/node/42343 हा मोका साधून म्हादू शिपायाने एकदम बोलो भारत माता की ...असे म्हंंटले. त्यावर पोरानी ही हात उंचावून जोरात जय म्हंटले आणि आमचे समूहगीत संपवले. मटंगे बाईनी आम्हाला गायन वर्गात चला अशी खूण केली. पण त्याकडे लक्ष्य न देता काय व्हायचं ते होऊ दे म्हणत आम्ही मुलांमधे जाऊन बसलो. त्या दिवशी कार्यक्रम संपला तसे आम्ही तेथूनच पसार झालो.

विकीपेडिया वरील माहितीचे संकलन...

लेखक शशिकांत ओक यांनी शनिवार, 07/04/2018 07:09 या दिवशी प्रकाशित केले.
विकीपेडिया हा वाचकांच्या सहकार्याने माहिती पुरवणारा संदर्भ कोश आहे असे मानले जाते... विकीपेडियात खालील माहिती वाचनात आली ती बरोबर आहे असे मानावे काय? जर संदर्भ न देता माहिती भरली गेली असेल ती चुकीची किंवा अपुरी असेल तर तिला दुरुस्त करायची काय सोय आहे? ... येथील तज्ज्ञ सदस्यांचे मार्गदर्शन अपेक्षित आहे... https://mr.m.wikipedia.org/wiki/ पावनखिंडीतील_लढाई १) ... सर्वच ३०० जण कामी आले पण मसूदचे प्रचंड नुकसान झाले; जवळपास १४००० सैनिक मारले गेले. प्रत्येक मावळ्या ने ५५-६० मुगल कापून काढले, इतके शुर मावळे, इतिहासात क्वचितच पाहायला मिळतात.... २) ...

म्हतारीचं काॅन्फीडन्सं

लेखक परशुराम सोंडगे यांनी शुक्रवार, 06/04/2018 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
कथा आणि व्यथा म्हतारीचं कॉन्फीडन्स दुपारची वेळ होती. मुलांची मधली सुट्रटी ची वेळ झाली होती. खिचडी तयार झाली होती.घंटी वाजली.तसा मुलांचा लोंढा बाहेर पडला.सारी किलबील सुरू झाली.भातावाली बाई तयार झाल्या होत्या. मुलांची रांग केली. त्यांना काही सूचाना केल्या आणि तिच भींतीला टेकलो.मुलं येत होती .जात होती. तेवढयात एक आजीबाई आल्या.हातात एक डबा होता.त्या काठी टेकून तिथचं शांत बसल्या.त्या खाली जमीनीकडं बघत होत्या.त्यांच लक्ष तिथं नव्हतं.त्यांच्या हातातला डबा पण त्यांनी लपवला होता.बहुतेक मी तो पाहू नये म्हणून त्यांनी तसं केल असावं.

ती जशी जशी जुनी होत गेली

लेखक खिलजि यांनी शुक्रवार, 06/04/2018 18:24 या दिवशी प्रकाशित केले.
ती जशी जशी जुनी होत गेली हळूहळू माझी सोनी बनत गेली वाईनवानी कडुशार होती नंतर मधाचे पाणी बनत गेली रंगढंग बघूनच तर जवळ गेलो होतो खटके उडायचे अधूनमधून पुढे नवीन कहाणी घडत गेली या एकल्या जीवाची ती राणी बनत गेली आधी जे मिळेल ते खायचो नि राहायचो मग हवी होती कशाला बायको ? डोळे सताड उघडे असायचे, राव या डोळ्यांचीच जणू पापणी बनत गेली कधी आत हृदयात बसली ते समजलंच नाही आत सळसळणाऱ्या रक्ताची वाहिनी बनत गेली बायको आधी नकोशी वाटत होती यार आता मात्र माझ्यासाठी अमृत संजीवनी बनत गेलीय ... सिद्धेश्वर विलास पाटणकर
काव्यरस

हे ही खरंय !

लेखक फिझा यांनी शुक्रवार, 06/04/2018 18:03 या दिवशी प्रकाशित केले.
हे ही खरंय ! मनात नेहमी तीच हुरहूर काहूर करून टाकणारी ! तीच आठवण मन व्यापून टाकणारी , रोज आठवण काढायलाच हवी ....... असं नाहीये खरं तर पण रोज आठवण येते ..... हे ही खरंय ! पाण्याने वाहतं असलं पाहिजे त्याने सगळं पुसलं गेलं पाहिजे डोळे, मन, अंगण, आभाळ ते नेहमी भरून वाहीलंच पाहिजे....... असंही नाहीये खरं तर पण रोज आसवे भिजवून जातात ..... हे ही खरंय ! विरह विसरता आला पाहिजे, नवा डाव मांडता आला पाहिजे, आचारात, विचारात, वागण्यात, जगण्यात, नेहमी हसणं जमलंच पाहिजे....... असंही नाहीये खरं तर पण रोज हसून फक्त क्षण साधायचे ......

द टाईमब्रिज अर्थात कालसेतू – १

लेखक सस्नेह यांनी शुक्रवार, 06/04/2018 16:08 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर्स ! फार दिवसांनी पुन्हा एकदा या लेखनप्रकाराला हात लावला आहे. वैज्ञानिक फँटसी किंवा काल्पनिका. यात काही शास्त्रीय सत्ये, बेसिक गृहीतके म्हणून आली आहेत. तथापि ही संपूर्णपणे काल्पनिक कथा आहे. इतकी काल्पनिक की योगायोगानेसुद्धा यासारख्या घटना कुठे घडल्या असण्याची शक्यता नाही. त्यामुळे याला डिस्क्लेमरची गरजच नाही. फक्त आणि केवळ मनोरंजनबुद्धी जागृत ठेवून वाचणे. :) द टाईमब्रिज अर्थात कालसेतू ‘माणसाचे अ‍ॅव्हरेज जीवनमान जर एक हजार वर्षे असते, तर मी म्हणतो ती थिअरी अनुभवासह सिद्ध करता आली असती. सध्या तरी ती कागदावरच आहे...’ पद्या, उर्फ डॉ.

अर्धवट लेखमाला

लेखक मानसी१ यांनी शुक्रवार, 06/04/2018 16:04 या दिवशी प्रकाशित केले.
खालील लेखमाल पुर्ण करता येतिल का? मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा (भाग २) चित्रगुप्त शस्त्रास्त्रांचा बाजार- २ सुबोध खरे सेकंड लाईफ - भाग ७ अक्षरमित्र भन्नाट ७ - परिकथेतील राजकुमार

कधी हसणे,कधी रुसणे...

लेखक सत्यजित... यांनी शुक्रवार, 06/04/2018 13:49 या दिवशी प्रकाशित केले.
कधी हसणे,कधी रुसणे..हजारो बाज गझलेचे... तुला सांगू किती नखरे? किती अंदाज गझलेचे! तिने नजरेत बाणांचा निशाणा बांधला आहे कशी टाळू नजर! डोळे..निशाणेबाज गझलेचे!
काव्यरस

सलमानचे चेटूक आणि आपली अविवेकी मानसिकता.

लेखक Jayant Naik यांनी शुक्रवार, 06/04/2018 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
फेब्रुवारी १९९८ मधील काळवीट मारल्याची घटना . ५ एप्रिल २०१८ मध्ये जोधपुर कोर्टाचा निकाल. सलमान एका खटल्यामध्ये दोषी ठरला. आता परत अपील .. हायकोर्ट आणि नंतर सुप्रीम कोर्ट.अजून २० वर्षे सहज जाणार. २० वर्षे गेलेलीच आहेत ! असे हे सलमानखान या न्याय व्यवस्थेवर काय चेटूक करतो आहे कुणास ठाऊक ? एखाद्या सामान्य माणसा विरुद्ध असा खटला इतकी वर्षे चालला असता का? “Justice delayed is justice denied” वगैरे फक्त पुस्तकात छापायला राखीव ठेवलेली वाक्ये आहेत का ? या खटल्याशी संबंधित लोकांना या सलमान मुळे मिळणारी प्रसिद्धी हवी हवीशी वाटते म्हणून इतकी वर्षे हा खटला चालू आहे का ? नक्की कसले चेटूक आहे हे ?

अनवट किल्ले ३०:चुन्याचा टिळा, कंक्राळा ( Kankrala )

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 06/04/2018 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेला साल्हेरजवळच्या सेलबारी-डोलबारीच्या उत्तुंग रांगा पुर्वेकडे पसरत जातात अन् मालेगावच्या उत्तरेला तुरळक पसरलेल्या गाळणा टेकड्यांच्या रुपाने भेटतात. अशाच एका विखुरलेल्या टेकडीवर कंक्राळे किल्ला उभा आहे. गाळणा गडाचा सोबती म्हणून ओळखला जाणारा कंक्राळा किल्ला नाशिक जिल्ह्यात मालेगाव तालुक्यात आहे. मालेगावहुन २० कि.मी. अंतरावर कंक्राळा गाव आहे. अवशेष संपन्न गाळणा ईतिहास राखून आहे, मात्र काहीसा दुर्लक्षित कंक्राळ्याला फारसे दुर्गप्रेमी भेट देत नाहीत.