Skip to main content

१८२६ सालातील प्रवासीमित्र - भाग १.

लेखक अरविंद कोल्हटकर यांनी बुधवार, 02/05/2018 08:37 या दिवशी प्रकाशित केले.
नाठाळ बकरीप्रमाणे इकडे तोंड घाल, तिकडे थोडा पाला ओरबाड असे जालावर करीत असतांना काही मनोरंजक पुस्तके दिसतात. कॅ. जॉन क्लून्स, १२वी रेजिमेंट, बॉंबे नेटिव इन्फन्ट्री अशा नावाच्या लेखकाने लिहिलेले Itinerary and Directory of Western India, Being a Collection of Routes अशा शीर्षकाचे आणि १८२६ सालामध्ये छापलेले पुस्तक माझ्यासमोर आले. कसलीहि यान्त्रिक वाहने आणि अन्य साधने, तसेच कसलेही रस्ते - पक्के वा कच्चे - नसण्याच्या काळामध्ये पालखी, घोडागाडी आणि क्वचित उंट वापरून १९व्या शतकाच्या पहिल्या अर्ध्या भागात प्रवास कसे गेले जात असतील ह्याची थोडीबहुत कल्पना ह्या पुस्तकावरून येते.

माझा आजोळ बेळगाव २

लेखक स्वप्निल रेडकर यांनी बुधवार, 02/05/2018 00:15 या दिवशी प्रकाशित केले.
बेळगाव म्हटलं कि खूप साऱ्या गोष्टी माझ्या मनाभोवती रुंजी घालू लागतात. कॅलिडोस्कोप सारखा वेगवेगळ्या आठवणी,माणसं ,जागा ,चवी नॉस्टॅल्जिक बनवतात .

भारतीय लोकशाही आणि जातजमातींच्या अस्तित्वाचा गुंता

लेखक मन यांनी मंगळवार, 01/05/2018 21:02 या दिवशी प्रकाशित केले.
काल वसंत व्याख्यानमालेत सुहास पळशिकरांच्या भाषणाला गेलो होतो. छोटेखानी भाषण होतं. तासभराचं असेल. विषयही घिसापिटा वाटेल असा होता. "जातजमातींच्या अस्तित्वाचा गुंता आणि भारतीय लोकशाही ". पण मला भाषण आवडलं. भाषणातला जो cosmetic भाग होता, तोसुद्धा आवडला. पळशीकरांचा आवाज, बोलण्याची लय, स्वच्छ,स्पष्ट शब्दोच्चार आणि अचूक शब्द निवड. इंग्लिश पुस्तकांच्या तुलनेत मराठी पुस्तकांमध्ये खूपदा हा दोष आढळतो की त्यांची छपाई तितकीशी भारी नसते. कागद सुमार/सर्वसाधारण असतो. फॉण्टकडे नीट लक्ष दिलेलं नसतं. भाषणाच्या बाबतीत ह्याचे समांतर मुद्दे म्हणजे आवाज, शब्दोच्चार वगैरे.

ग्रामीण करमणूक-मनोरंजन

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी मंगळवार, 01/05/2018 15:30 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे उत्तर महाराष्ट्र ग्रामीण वासियांची करमणूकीची साधनंही इतर गावांप्रमाणे पारंपरिक होती. अनेक लोकपरंपरा सादर करत आणि त्यांचा आस्वाद घेत गाववासी आपली करमणूक करून घेत असत.

नास्तिक म्हणजे काय ?कुणी नास्तिक असू शकते का?

लेखक आदित्य कोरडे यांनी मंगळवार, 01/05/2018 10:04 या दिवशी प्रकाशित केले.
नास्तिक म्हणजे काय ?कुणी नास्तिक असू शकते का? नास्तिक असणं ही काही सोपी गोष्ट नाही. मुळात आपण नास्तिक आहे कि नाही हे ठरवणे सुद्धा फार अवघड आहे. नास्तिक म्हणजे देवाला न मानणारा किंवा देवा धर्माचे अस्तित्व न मानणारा माणूस, हा प्रचलित पण फार संकुचित अर्थ झाला. देव न मानणे ह्याकरता निरीश्वरवादी ही संज्ञा आहे, तसच अज्ञेयवादी ही संज्ञा देवाच्या किंवा ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल शंका किंवा संशय व्यक्त करणाऱ्यासाठी वापरली जाते. नास्तिक ह्या शब्दाची फोड करून पहावे म्हटले तर देवाचे अस्तित्व नाकारणारा असा अर्थ अनेक ‘जन’ जो काढतात, पण तो ओढून ताणून काढलेला अर्थ वाटतो.

वर्तुळ!

लेखक उपयोजक यांनी मंगळवार, 01/05/2018 07:46 या दिवशी प्रकाशित केले.
नित्या! अारं किती दिवसानं दिसायलास! आनि हिकडं कुटं रे? सुन्या तू पन बदललास लेका! जाड झालाईस चांगलाच! व्हय लेका. आरं पन हितं कुटं बोलत बस्लोय आपन,चल च्या घ्यीऊया.निवांत बोलाय यिल! चा मस्त हाय रे हितला! बर नित्या सांगितल न्हाईस हिकडं कुटं आल्तास? आरे सुन्या ह्या पलिकडच्या कारखान्यात कामाला हाय मी! वर्ष झालं. हा हा बरोबर! मीच हिकडं लई दिवसानं आलो न्हाईतर आधीच गाट पडली असती. ते न्हवं आयटीआय नंतर तू कुटं दिसलाच न्हाईस.काय संपर्क न्हाई.आनि आज तीन वर्षांनं गाट पडली आपली.कुटं हुतास इतकी वर्ष? आरं हुतो हितंच.डिप्लोमा केला लेका! पॉलटेक्निकचा! काय सांगतोस? म्हंजे आता इंजिनेर झालास म्हन की!

माझ्या महाराष्ट्राचं गाणं

लेखक अनन्त्_यात्री यांनी सोमवार, 30/04/2018 22:47 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्राच्या अभिमानास्पद वैशिष्ट्यांना एकत्र गुंफण्याचा माझा प्रयत्न : =================== बेलाग कातळ कड्याची कपार त्यातून खुणवी गरुडाचे घर घाटाचे वेटोळे माळती डोंगर माडा पोफळीशी खेळतो सागर पाटाच्या पाण्याची खळाळ लकेर घामाच्या खताने फुलते शिवार शेताच्या बांधाशी चटणी भाकर कष्टाच्या घासाला तृप्तीचा ढेकर खिलारी जोडीला पोळ्याचा शृंगार भारूडा भुलवी लावणी शृंगार ओवीच्या अंतरी शांतीचा सागर अभंग झंकारे झेलून प्रहार भक्तीने भिजतो चंद्रभागातीर दिंडीच्या रिंगणी विठूचा गजर पडघम ढोलाचा,लेझीम लयदार तडतड ताशाची, वाजंत्री सुस्वर मंजुळ सनई, चौघडा गंभीर कीर्तनाचे रंगी टाळांचा झंकार
काव्यरस

किस्सा ए पारसी

लेखक आदित्य कोरडे यांनी सोमवार, 30/04/2018 18:23 या दिवशी प्रकाशित केले.
किस्सा ए पारसी पारशी लोक म्हटले कि आपल्याला ही गोष्ट अगदी आवर्जून सांगितली जाते कि ते ८व्या कि ९व्या शतकात इराण मधल्या मुसलमानी आक्रमणामुळे पलायन करून गुजरात मधल्या संजाण नावाच्या गावी आले आणि त्यानी तिथल्या राजाकडे( जाधव राणा किंवा यादव राणा )आश्रय मागितला मग त्याने दुधाने भरलेला वाडगा पाठवला – तुमच्या करता इथे जागा नाही हे सुचवायला, तर त्या पारशी लोकांच्या प्रमुखाने त्यात मूठभर साखर टाकली – ह्या साखरेप्रमाणे आम्ही तुमच्यात मिसळून जाऊ आणि उलट गोडवाच वाढवू असे सुचवण्याकरता. आता ही गोष्ट कितपत खरी आहे ते माहिती नाही. पण खरी नसावी.

फसता फसता जमलेली गोष्ट-२

लेखक शाली यांनी सोमवार, 30/04/2018 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
प्रवासाचा ऊद्देश फक्त खादाडी असल्याने ताम्हीणी घाटाला टांग मारुन सरळ एक्सप्रेस-वेने पेण-वडखळ करीत अलीबाग गाठायचे ठरले. माझ्याकडे फरसाण-फळे होतीच. स्वातीनेही दशम्या, चटणी, लोणचे आणि फोडणी घातलेला दहीभात घेतला होता. त्यामुळे नाष्ट्यासाठी हॉटेल शोधायचा वैताग नव्हता. हवाही छान होती. कुमारांचे ‘अवधुता, गगन घटा गहरानी रे’ लावले आणि निघालो. चार तासाचा तर प्रवास होता. त्यामुळे रमत गमत निघालो. एक्सप्रेसवेवर यायच्या अगोदर ईंद्रायणी नर्सरी जवळ गाडी बाजूला घेतली. शेतात मस्त चटई टाकली आणि सकाळचा नाष्टा ऊरकला. कुणाच्या हातात काय जादू असते कळत नाही. आता दही-भातात काय करायचे असते?

तप्त झाली धारा सारी , दहाही दिशा त्या पेटल्या

लेखक खिलजि यांनी सोमवार, 30/04/2018 17:58 या दिवशी प्रकाशित केले.
तप्त झाली धरा सारी दहाही दिशा त्या पेटल्या दिनकराशी हात मिळवुनी उग्र होऊनि परतल्या ॥ मरूत व्यस्त, घाले गस्त थैमान चहूकडे माजले पशु, प्राणी, झाडे, पक्षी नद्या नाले भाजले ॥ रुक्ष झाले वृक्ष सारे सावलीपण महाग ती यत्र तत्र वणवा पेटला स्वस्त झाली आग ती ॥ कोपला तो, झोपला तो भक्ती कमी जी जाहली मोह मायेत प्राण सारे म्हणुनी झाली काहिली ॥ {{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}